पोस्ट्स

ठिक ठिकाणी केली आरती ; गणेश मंडळाच्या वतीने झाले जंगी स्वागत

इमेज
  पंकजाताई मुंडे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या पांच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन ठिक ठिकाणी केली आरती ; गणेश मंडळाच्या वतीने झाले जंगी स्वागत पुणे ।दिनांक २५।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील मानाच्या पांच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन घेतले. ठिक ठिकाणी त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. गणेश मंडळाच्या वतीने यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.    पुण्यातील गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. गणेशाच्या भव्य दिव्य मुर्तींचे तसेच देखाव्यांचे याठिकाणी आकर्षण असते. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पंकजाताई मुंडे यांनी आजच्या पुणे दौ-यात सायंकाळी मानाच्या पांच गणपतीपैकी पहिल्या कसबा पेठेतील गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम मंडळ, तुळशीबाग, मंडई,  दगडूसेठ हलवाई, एकलव्य होस्टेल, साने गुरूजी तरूण मंडळ, साई मित्र  मंडळ आदी गणेश मंडळांना भेटी देवून श्रींची आरती केली. तत्पूर्वी दुपारी जंगली महाराज रस्त्यावरील अतिथी मुलींचे वस्तीगृह येथे गणेशाची आरती त्यांच्या हस्ते झाली. आ. माधुरीताई मिसाळ, दत्तात्रय खाडे, मुरल
इमेज
  आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे श्री गणेश होमाचे आयोजन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वैदिक धर्म संस्था बेंगलोर व परळी वैजनाथ येथील आर्ट ऑफ लिविंग परिवारा तर्फे श्री गणेश चतुर्थी निमित्त मंगळवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता विद्यानगर भागातील शंभू महादेव मंदिरात श्री गणपती होमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती होम हा कोणताही उपक्रम सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी केला जाणारा विधी आहे. गणपती होम केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि आपण जीवनात यश मिळवून दीर्घायुष्य, संततीचे सुख आणि अखंड सौभाग्य प्राप्त करू शकतो असा विश्वास भाविकांना आहे. होम आचरण करून गणेशाची पूजा केल्याने समृद्धी, आरोग्य आणि आनंदी घरगुती जीवन प्राप्त होऊ शकते. श्री गणेश होम भक्तांना चांगल्या आरोग्याचा लाभ देखील देते ज्यांना चिंता, नैराश्य आणि अपघातादरम्यान झालेल्या दुखापतींसारख्या आजारांचा सामना करावा लागतो त्यांना मनःशांती मिळते अशी धारणा आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्त , आर्ट ऑफ लिव्हिंग चे सर्व प्रशिक्षक , युवाचार्य आणि साधकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारा तर्फे करण्यात आले

धनंजय मुंडेंनी बीड मतदारसंघात दिलेला शब्द पाळला; 4 महत्वाच्या रस्त्यांना 25 कोटी रुपये निधी मंजूर

इमेज
धनंजय मुंडेंनी बीड मतदारसंघात दिलेला शब्द पाळला;  4 महत्वाच्या रस्त्यांना 25 कोटी रुपये निधी मंजूर बीड (दि. 24) - कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड मतदारसंघातील विकास कामांच्या बाबतीत दिलेला शब्द पाळला असून आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बीड मतदार संघातील चार अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते बळीराम गवते यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान या रस्त्यांच्या कामाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून चार रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येईल.  यामध्ये बीड मतदारसंघातील राज्य मार्ग 211- बीड - नागझरी - बेंडसुर - भायाळा - वैद्यकिन्ही - वैजाळा - पाचेगाव - पाचंग्री रस्त्याच्या एका टप्प्याच्या सुधारणा व रुंदीकरणासाठी 8 कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यातील सुधारणा व रुंदीकरणासाठी 7 कोटी रुपये त्याचबरोबर उमरज जहांगीर ते केतुरा रस्ता सुधारण

गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते झालं प्रकाशन

इमेज
  गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे  जिल्हाधिकार्यांच्या हस्ते झालं प्रकाशन  परळी (प्रतिनिधी)       परळी व पंचक्रोशीतील देवस्थाने व ऐतिहासिक स्थळांचे अभ्यासक गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे शुक्रवारी (ता.२२) बीड च्या जिल्हाधिकारी सौ.दिपाताई मुंडे-मुधोळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यास परळी व पंचक्रोशीतील अनेक भाविक नागरीक उपस्थित होते. परळी येथील वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीत सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी (ता.२२) सकाळी अकरा वाजता श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मसाप परळीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर मराठवाडा शिक्षक संघाचे सचिव राजकुमार कदम, पी.एस.घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोपाळ आंधळे यांच्या श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकात परळी पंचक्रोशीतील दुर्लक्षित परंतु धार्मिक दृष्ट्या मोठे महत्व असलेल्या देवस्थान व स्थळांची संपुर्ण माहिती आहे. याचबरोबर परळी तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्य

जुन्या पावर हाऊसची क्षमता होणार दुप्पट, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर व अन्य मागण्याही मंजूर

इमेज
  धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्याला यश, परळी तालुक्यात महावितरणच्या 150 कोटींच्या कामांना मंजुरी परळी वैद्यनाथ तालुक्यातील पौळ पिंप्री, नागपिंप्री, ईरिगेशन कॉलनी व हेळंब या सबस्टेशन उभारणीस महावितरण कडून मंजुरी जुन्या पावर हाऊसची क्षमता होणार दुप्पट, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर व अन्य मागण्याही मंजूर परळी वैद्यनाथ (दि. 23) - कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी वैद्यनाथ तालुक्यातील महावितरण कडील वीज पुरवठ्या संदर्भातील विविध सबस्टेशन उभारणी, सुरू असलेल्या सबस्टेशनची क्षमता वाढविणे आदी मागण्यांना यश आले असुन, परळी तालुक्यातील पौळ पिंप्री, नागपिंप्री, ईरिगेशन कॉलनी व हेळंब या चार ठिकाणी 1×5 MVA क्षमतेचे सबस्टेशन उभारणीस व क्षमता वाढीच्या अशा एकूण 150 कोटींच्या कामांना महावितरणने मंजुरी दिली आहे.  परळी शहराला वीज पुरवठा करणाऱ्या जुन्या पावर हाऊसच्या क्षमतेत देखील 5 MVA वरून 10 MVA अशी दुप्पट वाढ करण्यास मंजुरी देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.  परळी तालुक्यातील संगम, गोवर्धन, मोहा, काळरात्री देवी, सिरसाळा, जलालपूर व सारडगाव या सबस्टेशनच्या ठिकाणी अतिरिक्त पावर

वैद्यनाथ कॉलेज मधील व्यायाम करण्याची बंद असलेली उपकरणे सुरू करा - ज्येष्ठ नागरिकांची मागणी

इमेज
  वैद्यनाथ कॉलेज मधील व्यायाम करण्याची बंद असलेली उपकरणे सुरू करा - ज्येष्ठ नागरिकांची मागणी  परळी / प्रतिनिधी      वैद्यनाथ कॉलेज मध्ये व्यायाम करण्यासाठी असलेली उपकरणे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. बंद असलेली उपकरणे सुरू करण्याची मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे.       परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयात विद्यार्थी व जेष्ठ नागरीकांच्या सोयीसाठी व्यायाम करण्याची वेगवेगळी उपकरणे बसविण्यात आली होती. त्याचा जेष्ठ नागरिक वापर करीत होते. परळी शहरात व्यायाम करण्याची उपकरणे मोकळ्या जागेत नसल्याने अनेकजण सकाळी व संध्याकाळी वैद्यनाथ कॉलेज मध्ये जाऊन व्यायाम करीत होते. परंतु मागील काही महिन्यांपासून व्यायाम करण्याची उपकरणे बंद पडलेली आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्यावर व्यायाम करता येत नाही. वैद्यनाथ महाविद्यालयाने बंद असलेली व्यायाम करण्याची साधने तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. ----------------------------------------------------- Click: ■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द* Click: *गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अ
इमेज
  गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन   परळी (प्रतिनिधी) परळी व पंचक्रोशीतील देवस्थाने,ऐतिहासिक स्थळांचे अभ्यासक गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे उद्या दि.22 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सौ.दिपाताई मुंडे-मुधोळ यांच्या हस्ते प्रकाशन होत असुन   या प्रकाशन सोहळ्यास परळी व पंचक्रोशीतील भाविक नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोपाळ यांनी केले आहे. वैद्यनाथ औद्योगिक वसाहत सांस्कृतिक सभागृह,नाथ रोड परळी येथे शुक्रवार दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा.होत असलेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मसाप परळीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी प्रमुख पाहुणे म्हणुन मसापचे सचिव प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड,उपाध्यक्ष प्राचार्य अरुण पवार,बंडु अघाव,अनंत मुंडे,प्रा.संजय अघाव आदींची उपस्थिती रहाणार आहे.गोपाळ आंधळे यांच्या श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकात परळी पंचक्रोशीतील दुर्लक्षित परंतु धार्मिक दृष्ट्या मोठे महत्व असलेल्या देवस्थान,स्थळांची संपुर्ण माहिती आहे.याचबरोबर परळी तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे,बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथ
इमेज
दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत..रद्द करण्यात आलेल्या गाड्या : 1.  नांदेड येथून सुटणारी गाडी गाडी क्र. 17620 नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेस दिनांक 22 सप्टेंबर, 2023 ला रद्द करण्यात आली आहे. 2.  औरंगाबाद येथून सुटणारी गाडी क्र. 17619 औरंगाबाद-नांदेड एक्स्प्रेस दिनांक 25 सप्टेंबर, 2023 ला रद्द करण्यात आली आहे. 3.   औरंगाबाद येथून सुटणारी गाडी क्र. 17621 औरंगाबाद-तिरुपती एक्स्प्रेस दिनांक 22 सप्टेंबर, 2023 ला रद्द करण्यात आली आहे. 4.  तिरुपती येथून सुटणारी गाडी क्र. 17622 तिरुपती-औरंगाबाद एक्स्प्रेस दिनांक 23 सप्टेंबर, 2023 ला रद्द करण्यात आली आहे. ----------------------------------------------------- Click: ■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द* Click: *गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे* Click: ■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार* Click: ■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा* Click: ■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत

गंगाखेड ची जनाबाई भारताला कळाली पाहिजे,

इमेज
  आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा गंगाखेड प्रतिनिधी:- गावचा आणि आपला विकास करायचा असेल तर आपला हक्काचा माणुस लागतो तसेच आई-वडिलांचा हात पाठीवर पडल्यास सर्व सुख मिळते आईची माया म्हणजे चार्जर असून गंगाखेडची संत जनाबाई भारतासह जगाला कळाली पाहिजे, असे श्रोत्यांना सांगताना रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा म्हणाले     आज संत जनाबाई मंदिर येथे विठ्ठलराव मुंडे ,माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, माजी सभापती श्रीनिवास मुंडे यांचे वडील कै.ज्ञानदेवराव मुंडे बोर्डेकर यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कीर्तन सेवेत समाधान महाराज शर्मा यांनी श्रोत्यांना आई-वडिलांची पुण्याई बद्दल सांगत होते,    पुढे बोलताना महाराज म्हणाले की डोळ्याला आतून पाणी येते तोच खरा परमार्थ व तो सहा वर्षाच्या जनाबाईने दाखवून दिला, जगातले चांगले स्पर्श तुमची पाठ व आई वडिलांचा हात, गाईच्या पाठीशा स्पर्श, गुरूच्या पायाचा अंगठा व आपले मस्तक हेच खरे मोठे स्पर्श असून मृत्यूनंतर माळवंदावर अन्ना टाकण्यापेक्षा जिवंतपणे आई-वडिलांची सेवा करा तोच खरा धर्म असून आई-वडिलांना जीवनात थोडेही दुःख
इमेज
  यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेटच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ त्यांच्या वतीने सन 2023 - 24 च्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून या क्रीडा स्पर्धेमध्ये वयोगट 19 क्रिकेट स्पर्धेत नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेटच्या संघाने विरोधी संघांचा धुवा उडवत परळी तालुक्यात प्रथम येत जिल्हास्तरीय होत असलेल्या क्रिकेट स्पर्धेत स्थान मिळवलेले आहे या यशा बद्दल नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.धनंजय मुंडे ,नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा क्रीडा विभागप्रमुख प्रा.अतुल
इमेज
  हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)          हिंदी भाषा घर घर पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले. हिंदी साहित्यकांचे काम देशासाठी स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे असल्याचे प्रतिपादन डॉ पांडुरंग चिलगर यांनी केले. येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.                 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि.२१) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, हिंदी विभागप्रमुख डॉ लक्ष्मण मुंडे, डॉ राजर्षी कल्याणकर, प्रा.प्रविण फुटके यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ चिलगर म्हणाले की, हिंदी भाषा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिंदी के दमपर आगे बढ सकते है. राष्ट्र भाषेवर श्रध्दा असणे आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात जि