गंगाखेड ची जनाबाई भारताला कळाली पाहिजे,

  आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा




गंगाखेड प्रतिनिधी:- गावचा आणि आपला विकास करायचा असेल तर आपला हक्काचा माणुस लागतो तसेच आई-वडिलांचा हात पाठीवर पडल्यास सर्व सुख मिळते आईची माया म्हणजे चार्जर असून गंगाखेडची संत जनाबाई भारतासह जगाला कळाली पाहिजे, असे श्रोत्यांना सांगताना रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा म्हणाले 


   आज संत जनाबाई मंदिर येथे विठ्ठलराव मुंडे ,माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, माजी सभापती श्रीनिवास मुंडे यांचे वडील कै.ज्ञानदेवराव मुंडे बोर्डेकर यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कीर्तन सेवेत समाधान महाराज शर्मा यांनी श्रोत्यांना आई-वडिलांची पुण्याई बद्दल सांगत होते,


   पुढे बोलताना महाराज म्हणाले की डोळ्याला आतून पाणी येते तोच खरा परमार्थ व तो सहा वर्षाच्या जनाबाईने दाखवून दिला, जगातले चांगले स्पर्श तुमची पाठ व आई वडिलांचा हात, गाईच्या पाठीशा स्पर्श, गुरूच्या पायाचा अंगठा व आपले मस्तक हेच खरे मोठे स्पर्श असून मृत्यूनंतर माळवंदावर अन्ना टाकण्यापेक्षा जिवंतपणे आई-वडिलांची सेवा करा तोच खरा धर्म असून आई-वडिलांना जीवनात थोडेही दुःख कष्ट देऊ नका, त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत. 



भक्तीची मस्ती केली की भक्तीचे नुकसान होते, ज्ञानात मस्ती आली की, ज्ञानाचे वाटुळे होते, परमार्थात फक्त भक्ती भाव लागतो, पण सध्या कलियुगात माणसे जास्त भाव खात होते, सध्याच्या कलियुगात चांगले माणसे कमी झाले असून पाय चोपणाऱ्या माणसाची संख्या वाढली आहे लबाड व ढोंगी तसेच पुढे पुढे करणाऱ्यांची माणसाची चलती चालू आहे तर सत्यवादी व निर्मळ चरित्रेवाण माणसाची किंमत कमी झाली आहे,अजुन ओरिजनल संत सुद्धा कमी झाले आहेत चांगले काम करा व्यसन करू नका, गंगा स्वच्छ ठेवा, आई-वडिलांच्या पुण्यस्मरणाला देवाची आठवण झाली पाहिजे म्हणून असे कीर्तनाचे कार्यक्रम व्हावेत यातच खरे पुण्य आहे. 


   यावेळी कीर्तन सोहळ्यास माजी प्राचार्य आत्माराम टेंगसे सर, संतोष मुरकुटे, विठ्ठलराव रबदडे, अँड.व्यंकटराव तांदळे, श्रीराम मुंडे, फुलवाडकर सर, प्रा.माधव होळंबे सर, माधव शेंडगे, बालासाहेब पारवे, ह.भ.प.बोबडे महाराज परभणी, भगवान महाराज ईसादकर, राजेश जाधवर, नितीन नागरगोजे, होळंबे सर, नागनाथ लटपटे सर, लक्ष्मण लटपटे, शिवाजी तांदळे, संतोष टोले, लिंबाजी लटपटे, वाडेवाले सर, बाळू मुंडे, बाळु बेंद्रे, अजय भिसे, बालाजी कल्याणी, प्रशांत फड, राम टोले, वाघमारे सर, राजेभाऊ पाटील, सुर्यवंशी सर, सुनिल ठाकूर, प्रशांत मुंडे, डॉ.बाळासाहेब सुर्यवंशी, दीपक फड, गोटु भालके, यांच्यासह कीर्तनात श्रोतेगण मोठ्या संख्येने उपस्थित होते..

यावेळी विठ्ठलराव मुंडे, रामप्रभू मुंडे, श्रीनिवास मुंडे हे त्यांच्या वडिलांचे बारा वर्षांपासून पुण्यतिथी साजरी करतात तसेच मुंडे कुटुंबीयांनी संत जनाबाईचा तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी जनाबाईच्या मंदिराचा मोठा विकास केला आहे, संत जनाबाईच्या बाजूला असलेले सर्व वीट भट्ट्या त्यांनी उपोषण करून उठवले, गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने अन्नछत्रालय बांधकाम त्यांच्या काळात झाले, त्यांना त्यांच्या कुटुंबियांना देव पांडुरंग कधीही कमी पडू देणार नाही यांचे वरचेवर प्रगतीच होईल देवाचे काम केल्याने आयुष्यात कमी काही पडणार नाही असे रामप्रभू मुंडे यांच्या बद्दल भक्ती भावाने महाराजांनी गौरव उद्गार काढले.

-----------------------------------------------------

Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*





Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !