गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते झालं प्रकाशन
गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते झालं प्रकाशन
परळी (प्रतिनिधी)
परळी व पंचक्रोशीतील देवस्थाने व ऐतिहासिक स्थळांचे अभ्यासक गोपाळ आंधळे लिखीत श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे शुक्रवारी (ता.२२) बीड च्या जिल्हाधिकारी सौ.दिपाताई मुंडे-मुधोळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यास परळी व पंचक्रोशीतील अनेक भाविक नागरीक उपस्थित होते.
परळी येथील वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीत सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी (ता.२२) सकाळी अकरा वाजता श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मसाप परळीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर मराठवाडा शिक्षक संघाचे सचिव राजकुमार कदम, पी.एस.घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोपाळ आंधळे यांच्या श्री वैद्यनाथ कथासार पुस्तकात परळी पंचक्रोशीतील दुर्लक्षित परंतु धार्मिक दृष्ट्या मोठे महत्व असलेल्या देवस्थान व स्थळांची संपुर्ण माहिती आहे. याचबरोबर परळी तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाबद्दल संदर्भासह माहिती असल्याने हे पुस्तक परळी व परिसराचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक व भाविकांसाठी उपयुक्त आहे. या पुस्तकाची किंमत केवळ १७० रुपये आहे. श्री वैद्यनाथ कथासार पुस्तक प्रकाशन सोहळ्यास भाविक, नागरीक उपस्थित राहिल्याबद्दल लेखक, मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारचे मालक गोपाळ आंधळे यांनी आभार व्यक्त केले.
-----------------------------------------------------
Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*
Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*
Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*
Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*
Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*
Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*
Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*
Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*
Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*
Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !
Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी
Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या
Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल
Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*
Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...
----------------------------------------------------
----------------------------------------------------
Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*
Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*
Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा