जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

ठिक ठिकाणी केली आरती ; गणेश मंडळाच्या वतीने झाले जंगी स्वागत

 पंकजाताई मुंडे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या पांच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन










ठिक ठिकाणी केली आरती ; गणेश मंडळाच्या वतीने झाले जंगी स्वागत


पुणे ।दिनांक २५। 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील मानाच्या पांच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन घेतले. ठिक ठिकाणी त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. गणेश मंडळाच्या वतीने यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. 


  पुण्यातील गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. गणेशाच्या भव्य दिव्य मुर्तींचे तसेच देखाव्यांचे याठिकाणी आकर्षण असते. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पंकजाताई मुंडे यांनी आजच्या पुणे दौ-यात सायंकाळी मानाच्या पांच गणपतीपैकी पहिल्या कसबा पेठेतील गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम मंडळ, तुळशीबाग, मंडई,  दगडूसेठ हलवाई, एकलव्य होस्टेल, साने गुरूजी तरूण मंडळ, साई मित्र  मंडळ आदी गणेश मंडळांना भेटी देवून श्रींची आरती केली. तत्पूर्वी दुपारी जंगली महाराज रस्त्यावरील अतिथी मुलींचे वस्तीगृह येथे गणेशाची आरती त्यांच्या हस्ते झाली. आ. माधुरीताई मिसाळ, दत्तात्रय खाडे, मुरलीधर मोहोळ, सदाशिव खाडे, धिरज घाटे, अशोक मुंडे व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात आगमन होताच पंकजाताई मुंडे यांचे पदाधिकारी  व कार्यकर्त्यांनी ठिक ठिकाणी जोरदार स्वागत केले.

••••

-----------------------------------------------------

Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*





Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?