जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

धनंजय मुंडेंनी बीड मतदारसंघात दिलेला शब्द पाळला; 4 महत्वाच्या रस्त्यांना 25 कोटी रुपये निधी मंजूर

धनंजय मुंडेंनी बीड मतदारसंघात दिलेला शब्द पाळला;  4 महत्वाच्या रस्त्यांना 25 कोटी रुपये निधी मंजूर






बीड (दि. 24) - कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड मतदारसंघातील विकास कामांच्या बाबतीत दिलेला शब्द पाळला असून आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बीड मतदार संघातील चार अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते बळीराम गवते यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान या रस्त्यांच्या कामाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून चार रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येईल. 


यामध्ये बीड मतदारसंघातील राज्य मार्ग 211- बीड - नागझरी - बेंडसुर - भायाळा - वैद्यकिन्ही - वैजाळा - पाचेगाव - पाचंग्री रस्त्याच्या एका टप्प्याच्या सुधारणा व रुंदीकरणासाठी 8 कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यातील सुधारणा व रुंदीकरणासाठी 7 कोटी रुपये त्याचबरोबर उमरज जहांगीर ते केतुरा रस्ता सुधारणा कामासाठी 4 कोटी रुपये आणि म्हसोबा फाटा - पिंपरगव्हाण ते आर टी ओ रस्ता सुधारणा करण्यासाठी 6 कोटी असे एकूण 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 


बळीराम गवते व सहकाऱ्यांनी बीड मतदारसंघातील जनतेच्या वतीने ना.धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?