पोस्ट्स

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ.

इमेज
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ. _________________________________ मोदी सरकारने केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना एक खूशखबर दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या सात टक्के महागाई भत्ता मिळतो. मात्र आता त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाल्यामुळे 9 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याआधी मार्चमध्ये 2 टक्क्यांनी वाढ दिली होती. 1 जानेवारीपासून ती लागू करण्यात आली होती. सातव्या वेतन आयोगात निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ झाली. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर एक जुलैपासून हा निर्णय लागू होईल. देशभरात 48 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आहेत तर 61 लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारक मंडळी आहेत.

भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे - ना. पंकजा मुंडे

इमेज
*भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे* *_ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पार पडला रासपचा स्थापना दिवस_* नवी दिल्ली दि. २९ ---- रासप हा अठरा पगड जाती जमातीला सोबत घेवून काम करणारा पक्ष असून भाजपच्या सत्ता परिवर्तनाच्या लढाईत त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. या पक्षाचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.    रासपचा पंधरावा स्थापना दिन समारोह आज दिल्लीतील काॅन्स्टीट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. रासपचे अध्यक्ष तथा राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर व रासपचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.    रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे माझे बंधू आहेत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात आमचे बहिण-भावाचे नाते अतूट असं आहे, मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या लढाईतून आम्ही खूप कांही शिकलो, त्यांनी दाखविलेल्या साहस आणि संयमाच्या मार्गावर वाटचाल करत पुढे जात असल्याचे ना

ज्योतिर्लिंगक्षेत्र परळीच्या १३३ कोटीच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीची मंजुरी !

इमेज
 बीड. ज्योतिर्लिंगक्षेत्र परळीच्या १३३ कोटीच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीची  मंजुरी ! परळी वैजनाथ /प्रतिनिधी...       पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या शंभर कोटींच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये वर्षभर भाविकांची सतत दर्शनासाठी गर्दी असते. असे असले तरी या देवस्थानचा भीमाशंकर व घृष्णेश्‍वर प्रमाणे अद्यापही विकास झालेला नाही. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांना राहण्यासह इतर अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. येथे श्रावण महिना, महाशिवरात्री यासह इतर वेळीही भाविकांची मोठी गर्दी असते. येथे येणार्‍या भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, देवस्थानचा विकास व्हावा, यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी 133 कोटी 59 लाख 19 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.          यासाठीचा आराखडा जिल्हास्तरीय समितीने मंजूर केला असून तो नगरविकास खात्याकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर उच्चस्तरीय समिती व शिखर समिती या आराखड्यासा

संगीत क्षेत्रात यश..... परळीचा शंकर गुट्टे शिष्यवृत्तीस पात्र

इमेज
परळीचा शंकर गुट्टे शिष्यवृत्तीस पात्र  परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...          अतिशय बिकट परिस्थितीवर मात करीत यशाचे व ध्येयाचे उंच शिखर गाठता येते हे नेहमीच ग्रामीण भागातील सर्वसामान्यांनी सिद्ध केले आहे .अशीच प्रचिती संगीत क्षेत्राला येत आहे .चि. शंकर दामोदर गुट्टे हा परळी तालुक्यातील कासारवाडी या अतिशय दुर्गम भागातून अंबाजोगाईसारख्या विद्येच्या माहेरघरात संगीत शिक्षणासाठी दररोज ये-जा करतो .पं. शिवदासजी देगलूरकर यांच्या "बालगंधर्व संगीत महाविद्यालय व गुरुकुल "येथे श्री.प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सांगीतिक प्रवास चालू आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई या सांगीतिक क्षेत्रातील अतिशय नामवंत संस्थेने संगीतक्षेत्रातील प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली व त्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन केले. त्या स्पर्धेमध्ये चि. शंकरने आपल्या गायनाने रसिकांना व परीक्षकांना मंत्रमुग्ध करत शिष्यवृत्ती मिळवली. याआधीही" झी टीव्हीच्या सारेगमप "या सांगीतिक कार्यक्रमात अंतिम 30 मध्ये जाण्याची किमया शंकरने साधली होती. श्री. बंडोपंत ढाकणे या

फसलेला नोटाबंदी निर्णय म्हणजे ..! विळा मोडून खिळा केला'.

इमेज
RBI च्या आजच्या अहवालातून #नोटाबंदी चा निर्णय फसला हे सिद्ध झाले आहे. 99.3% नोटा परत आल्या. रोजगार बुडाला,उद्योगधंदे, लघुउद्योग बुडाले, शेतकरी,शेतमजुर बुडाला.अर्थव्यवस्था उध्वस्त झाली.ग्रामीण भाषेत सांगायचे तर सरकारने हा विक्षिप्त निर्णय घेऊन 'विळा मोडून खिळा केला'.

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा 23 नोव्हेंबरला

इमेज
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा 23 नोव्हेंबरला * ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 17 सप्टेंबरपासून नागपूर, दि. 28 : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विनामुल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. या प्रशिक्षणात प्रवेशाकरिता संस्थेच्या वतीने शुक्रवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेत प्रवेशाकरिता इच्छूक विद्यार्थी दिनांक 17 सप्टेंबर ते 31 संस्थेच्या संकेतस्थळ www.preiasnagpur.org.in वरुन ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. दिनांक 12 ते 23 नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा पत्र उपलब्ध करून देण्यात येईल. परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंबंधीची माहिती, परिक्षेसंबंधी सूचनेची विस्तृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळ www.preiasnagpur.org.inवर उपलब्ध असल्याचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक

परळी वैजनाथ : आजचे पर्जन्यमान. .....

इमेज
दि. 29- 08 -2018 परळी तालुका पर्जन्यमान सिरसाळा        -  निरंक नागापुर           - 5.00 पिंपळगाव गा.  - निरंक धर्मापुरी           - 7.00 परळी वै .         - 8.00

मंत्रिमंडळ निर्णय : (एकूण-3) ..... दि. 29 ऑगस्ट 2018

इमेज
मंत्रिमंडळ निर्णय : (एकूण-3) दि. 29 ऑगस्ट 2018 शेतीच्या आधुनिकीकरणासाठी राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेस मान्यता शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणारी 100 टक्के राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना यंदाच्या आर्थिक वर्षापासून (2018-19) राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे उच्च तंत्रज्ञानाधारित कृषीयंत्रांचे हब तयार होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी केंद्र शासनासह राज्य शासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांना सहाय्यभूत ठरणारी कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानुसार कृषि अवजारे-यंत्रांच्या खरेदीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासह कृषि अवजारे बँकांनाही अनुदान देण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह अनुसूचित जाती-जमाती आणि महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी 35 टक्के तर इतर बाबींसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येईल. तसेच इतर लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी 25 टक्के तर इतर बाबींसाठी 40 ट

50 हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या भट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक

इमेज
50 हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या भट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक - पर्यावरण मंत्री रामदास कदम मुंबई, दि. 28 : राज्यात पारंपरिक विटांची निर्मिती करत असताना 50 हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील,  असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे सांगितले. आज मंत्रालयात महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या श्री.कदम शिष्टमंडळाने पारंपरिक वीट भट्टीसंदर्भात पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी पर्यावरण मंत्री बोलत होते. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री. कदम म्हणाले, एकावेळी 50 हजारापेक्षा कमी विटांची निर्मिती करत असल्यास त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक नसेल. मात्र 50 हजारापेक्षा जास्त वीट निर्मिती करत असतील तर अशा वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील. तसेच एकावेळी 50 हजारांच

परळीच्या महिला महाविद्यालयाला शासनाचा पुरस्कार

इमेज
 राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय पुरस्कार : परळीचे महिला महाविद्यालय सर्वोत्कृष्ट तर डॉ. प्रा.एल. एस. मुंडे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी परळी वैजनाथ/ प्रतिनिधी ....          महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेसाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी यावर्षी परळीच्या कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची निवड झाली आहे तर याच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा.एल.एस. मुंडे यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.     राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सन 2017-2018 मध्ये निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांचे स्वरूप राज्यस्तरीय आहे. यावर्षीच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी राज्यातून सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक व सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या व्यक्ती व संस्थांची यादी नुकतीच राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.  

29 ऑगष्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे अवाहन

इमेज
29 ऑगष्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे अवाहन बीड, दि.28:- महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार शहरी भागात आढळतो.  जोपर्यंत ग्रामीण  भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहचविले जाणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये क्रीडा विषयक जाणीव व वातावरण निर्माण होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रीडा व खेळाची प्रगती साध्य करणे शक्य होणार नाही.  ही वस्तुस्थिती लक्षात घेता शासनाने सन 1991-92 यावर्षी पासून दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निमार्ण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्हयात दरवर्षी क्रीडा सप्ताह व मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगार) यांचा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास क्रीडा विभागाने सन 1997 पासून मान्यता दिलेली आहे.  त्या अनुषंगाने दि. 29 ऑगस्ट हा क्रीडा दिन व दि. 12 ते 18 डिसेंबर हा कालावधी क्रीडा सप्ताह म्हणून राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येतो.   जिल्हयातील शाळा,

*‘सही पोषण, देश रोशन’*......राज्यात 1 सप्टेंबरपासून ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम*

इमेज
*राज्यात 1 सप्टेंबरपासून ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम* *मोहीमेला जनचळवळीचे स्वरुप देण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन* मुंबई, दि. 28 : कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमाला गती देण्याच्या तसेच जनमानसात विशेषत: पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2018 दरम्यान राज्यात ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला -बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून महाराष्ट्रात या उपक्रमाला जनचळवळीचे स्वरुप देण्यासाठी यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. *‘सही पोषण, देश रोशन’* असे घोषवाक्य या मोहीमेसाठी निश्चित करण्यात आले आहे. बालकांमधील कुपोषण, खुजेपणा, बुटकेपणा, रक्तक्षय कमी करणे, किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्तक्षय कमी करणे, जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करणे आदी उद्दीष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत. महिला आणि बालविकास विभाग हा या मोहीमेचा नोडल विभाग म्हणून काम करणार असून

आर्थिक दुर्बल घटक : शिष्यवृत्तीची रक्क्म झाली दुप्पट

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या शिष्यवृत्तीची रक्क्म झाली दुप्पट  मुंबई, दि. 28 : केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या 6 हजार रुपये शिष्यवृत्तीत वाढ करुन ती आता 12 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजना (National Means cum Merit Scholarship Scheme - NMMSS) सन 2008 पासून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आतापर्यंत दरवर्षी 6 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम वर्षातून 4 वेळा देण्यात येत होती आता मात्र दरवर्षी एकाचवेळी शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येणार आहे. NMMSS परीक्षेत Scholastic Aptitude Test (SAT) आणि Mental Ability Test (MAT) अशा दोन्हींमध्ये मिळून किमान 40 टक्के (32 टक्के अजा/अज विद्यार्थ्यांकरिता) गुण असणे आवश्यक असल्याने यापूर्वीची प्रत्येक विषयात 40 टक्के गुण आवश्यक असण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे. 0000

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांचा परळी दौरा. ....

इमेज
विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.धनंजय मुंडे परळी दौऱ्यावर परळी वै प्रतिनिधी  दि. 28:- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.30 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी  11.00 वाजता लोहा जि. नांदेड येथील श्रीसंत भगवानबाबा जयंतीस उपस्थिती व  नंतर सोयीनुसार लोहा जि. नांदेड येथून परळी वैजनाथ जि. बीडकडे मोटारीने रवाना व परळी जि. बीड येथे आगमन व  मुक्काम. -*-*-*-*-*-*-

परळीत सद्भावना रॅलीने केरळसाठी मदतनिधी संकलन...

इमेज
 एन एस एस व एन सी सी च्यावतीने राष्ट्रीय एकात्मता सद्भावना - केरळ मदत निधी रॅली !  परळी वै: प्रतिनिधी. ... येथील राष्ट्रीय सेवा योजना .व एन सी सी विभाग वैद्यनाथ कॉलेज व कै लक्ष्मीबाई देशमुख महिला कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना राष्ट्रीय एकात्मता .केरळ पुरग्रस्त मदत निधीसाठी रासेयो विभागाच्या मुलींनी राखी बांधून सद्भावना संदेश शहर दिला . या रॅलीचे उद्द्याटन वैद्यनाथ कॉलेज येथे नायब तहसिलदार बी एल रुपनर , उपप्राचार्य डॉ जे व्ही जगतकर , उपप्राचार्य डॉ . लक्ष्मण मुंडे डॉ डी व्ही मेश्राम, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता काळे, तालुका पत्रकार संघाचे धनजय अरबुने, पत्रकार मोहन व्हावळे, आत्मसिंग शेटे, अंधश्रध्दा निर्मलन समिती कार्यध्यक्ष प्रा दशरथ रोडे, पत्रकार महादेव गीते, संयोजक प्रा डॉ माधव रोडे, प्रा . गणेश चव्हाण,प्रा डॉ वीरश्री आर्या, प्रा उत्तम कांदे, प्रा सदानंद लोखंडे, प्रा प्रविण फुटके आदि उपस्थिती होते.         एन एस एस व एन सी सी विभाग मुलींनी परळी शहरातुन भव्य रॅली व्दारे वाहन चालक , बस , ट्रक, ऑटोरिक्षा,कार, तसेच शहरातील दुकानादार व्यापारी, नागरिक, पोलिस कर

बाजार समिती कर्मचाऱ्यांना आनंदाची वार्ता. ....

इमेज
*बाजार समित्यांच्या कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावण्याचा अहवाल दाखल*  राज्यातील 307 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सुमारे 7 हजार 51 कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीने आपला अहवाल शासनाकडे दाखल केलेला आहे. शासनाने फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर स्वस्त धान्य दुकानांमधून वितरीत होणार्‍या शेतमालावरील बाजार फी बंद केली आहे.  खाजगी बाजारांची स्थापना, व्यापार्‍यांना थेट परवाने, कंत्राटी शेती इत्यादी बाबींमधून बाजार समित्यांना मिळत असणार्‍या सेसचे उत्पन्नावर विपरित परिणाम झाल्याने सर्व कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, असा राज्य बाजार समिती सहकारी संघाचा अभिप्राय अहवालात नमूद केला आहे.  समितीच्या शिफारशीमधील पर्याय क्रमांक 1 नुसार समित्यांचे सर्व कर्मचारी शासन सेवेत सामावून घेऊन वेतन, भत्ते शासनाकडून देण्यात यावेत. सन 2017-18 च्या मंजूर अर्थसंकल्पानुसार एकूण आस्थापना खर्च 311.13 कोटी इतका होणे अपेक्षित असून या खर्चात दरवर्षी 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. यामुळे कर्मचारी निर्भयपणे काम कर

नाकर्ते शासन व आडमुठेपणा करणार्‍या बँकेच्या धोरणाविरोधात शेतकरी रस्त्यावर

इमेज
परळीत शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत धरणे आंदोलन! ● मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समिती रस्त्यावर ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..                शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत  परळीच्या तहसिलदारांमार्फत शासनाला यापूर्वी  निवेदन देण्यात आले असून, यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या जिव्हाळ्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या समितीने आज दि.28 ऑगस्ट रोजी विविध मागण्यांसाठी परळीच्या स्टेट बँक ऑफ इंडीया समोर धरणे आंदोलन केले.             शेतकर्‍यांच्या समितीने यापूर्वीच  निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी करा, कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा, सर्व बँकांची कृषी कर्ज वाटपाचे करारपत्रक मराठी भाषेत करा, पीक कर्ज वाटपाचा लक्षांक 100% करा, पीक कर्ज वाटपाच्या प्रति हेक्टर स्केल ऑफ फायनान्समध्ये वाढ करण्यात यावी, आरबीआयच्या सुचनेप्रमाणे 1 लाखापर्यंतचा बोजा शेतकर्‍यांच्या सातबारावर टाकू नये व टाकण्यात आलेला बोजा तात्काळ कमी करण्यात यावा, कर्जमाफी जाहिर केलेल्या तार

परळी तालुक्यात दोन दिवशीय शालेय कुस्तीस्पर्धा

इमेज
*परळी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या तारखेत  कुस्ती स्पर्धा खालील तारखेला होईल याची नोंद घ्यावी* कुस्ती स्पर्धा दिनांक:-03 -09-2018 रोजी वयोगट 14,17,19(मुली) व 14 वर्षे (मुले) सकाळी 9 वाजता वजन घेऊन नंतर कुस्तीस्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. *दिनांक-04-09-2018रोजी वयोगट-17,19वर्षे(मुले) सकाळी 9 वाजता वजन घेऊन नंतर कुस्तीस्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. *ठिकाण-आर्य समाज मंदिर परळी वै.* *वेळ-सकाळी10:00वा.* पंच म्हणून सुभाष नानेकर, प्रा.अतुल दुबे, प्रा.जगदीश कावरे, आनकाडे सर जास्तीत जास्त शालेय कुस्तीस्पर्धा मध्ये मुले व मुलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष पै.मुरलीधर मुंडे यांनी केले आहे.

आजचे........परळी तालुका पर्जन्यमान

इमेज
दि. 28- 08 -2018 परळी तालुका पर्जन्यमान सिरसाळा        -  निरंक नागापुर           - निरंक पिंपळगाव गा.  - निरंक धर्मापुरी           -  निरंक परळी वै .         - निरंक

काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे. ..महिला सक्षमीकरणाबाबत. ..

इमेज
*महिलांच्या सबलीकरणातूनच येईल ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी*- *ना.पंकजा मुंडे अलिबाग,जि. रायगडदि.27-                  ग्रामीण भागात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातून निर्माण होणाऱ्या सबलीकरणातूनच आर्थिक समृद्धी येईल, त्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि मिलाप च्या माध्यमातून महिला बचत गटांच्या चळवळीला पाठबळ देऊन येत्या दोन वर्षात पाच लाख महिला बचत गट स्थापन करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला बालविकास मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज खारघर येथे केले.          खारघर नवी मुंबई येथील  उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिलाप (Mahaasmita Innovative Livelihood Acceleration Programm) या  नाविण्यपूर्ण  उपजिवीका  गतिवर्धक कार्यक्रमाचे व ग्रामविकास  विकास विभागाने बांधलेल्या  30 दुकान गाळ्यांच्या लोकार्पण  सोहळा आज राज्याच्या  ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यास खा.श्रीरंग बारणे, आ.निरंजन डावखरे, आ.प्रशांत ठाकूर,पनवेल महापालि

🅾...तर आपल्या व्हाट्सॲपवरील डेटा डिलीट होणार

               ⭕ मुंबई - व्हॉट्स अॅप लवकरच आपल्या युजर्सचा डेटा डिलीट करणार आहे. यामध्ये तुमचे मेसेज(चॅटिंग), फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंतचा डेटा हवा असल्यास तुम्हाला १२ नोव्हेंबरपूर्वी बॅकअप घ्यावा लागणार आहे. कारण व्हॉट्स अॅप आपल्या बॅकअप पद्धतीत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्स अॅपमधील डेटा आता तुमच्या डिव्हाइसवर नाही तर गुगल ड्राइव्हवर सेव्ह होईल. व्हॉट्स अॅप आणि गुगलमध्ये झालेल्या डीलनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Video........ 💐💐 परळी वैजनाथ..... दर्शन. 💐💐

इमेज
परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. अंबेजोगाई पासून

कसे आहे ?......परळी तालुका पर्जन्यमान ..

इमेज
दि. 27- 08 -2018 परळी तालुका पर्जन्यमान सिरसाळा        - 16.00 नागापुर           - 16.00 पिंपळगाव गा.  - 14.00 धर्मापुरी           -  12.00 परळी वै .         - 22.00

राज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर*

इमेज
*राज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर* *मुंबई, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करता येईल.* *मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे* – *प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध - शनिवार, दि. 1 सप्टेंबर 2018; दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी - शनिवार, दि. 1 सप्टेंबर ते बुधवार, दि. 31 ऑक्टोबर 2018; दावे व हरकती निकालात काढणे - शुक्रवार, दि. 30 नाव्हेंबर 2018 पूर्वी; डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई - गुरुवार, दि. 3 जानेवारी 2019 पूर्वी; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध - शुक्रवार, दि. 4 जानेवारी 2019.* *दि. 1 जानेवारी 2019 रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय 18 वर्ष

तिसरा श्रावणी सोमवार : वैद्यनाथाचा छबीना व शयनारती .....

इमेज