जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

परळीत सद्भावना रॅलीने केरळसाठी मदतनिधी संकलन...

 एन एस एस व एन सी सी च्यावतीने
राष्ट्रीय एकात्मता सद्भावना - केरळ मदत निधी रॅली !

 परळी वै: प्रतिनिधी. ...
येथील राष्ट्रीय सेवा योजना .व एन सी सी विभाग वैद्यनाथ कॉलेज व कै लक्ष्मीबाई देशमुख महिला कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना राष्ट्रीय एकात्मता .केरळ पुरग्रस्त मदत निधीसाठी रासेयो विभागाच्या मुलींनी राखी बांधून सद्भावना संदेश शहर दिला . या रॅलीचे उद्द्याटन वैद्यनाथ कॉलेज येथे नायब तहसिलदार बी एल रुपनर , उपप्राचार्य डॉ जे व्ही जगतकर , उपप्राचार्य डॉ . लक्ष्मण मुंडे डॉ डी व्ही मेश्राम, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता काळे, तालुका पत्रकार संघाचे धनजय अरबुने, पत्रकार मोहन व्हावळे, आत्मसिंग शेटे, अंधश्रध्दा निर्मलन समिती कार्यध्यक्ष प्रा दशरथ रोडे, पत्रकार महादेव गीते, संयोजक प्रा डॉ माधव रोडे, प्रा . गणेश चव्हाण,प्रा डॉ वीरश्री आर्या, प्रा उत्तम कांदे, प्रा सदानंद लोखंडे, प्रा प्रविण फुटके आदि उपस्थिती होते.
        एन एस एस व एन सी सी विभाग मुलींनी परळी शहरातुन भव्य रॅली व्दारे वाहन चालक , बस , ट्रक, ऑटोरिक्षा,कार, तसेच शहरातील दुकानादार व्यापारी, नागरिक, पोलिस कर्मचारी, मजुर श्रमिक, हातगाडे, फळविक्रीते, यांना राखी बांधुन सद्भावनाचा संदेश देत परळी शहरातील शिवाजी चौक, बस स्टॅन्ड , एकमिनार चौक, मोंढा रोड, राणी लक्ष्मीबाई टॉवर, जिजामाता उद्यान , नेहरू चौक मार्ग शहर पोलिस ठाणे परळी  येथे समारोप झाला. या रॅलीद्वारे जनतेला राणी लक्ष्मीबाई टॉवर  येथे जवाहर एज्युकेशन सोसायटीचे सचिव दत्ताअप्पा ईटके गुरूजी, ज . ए सो कोषध्यक्ष सुरेश अग्रवाल, सहसचिव डॉ सुरेश चौधरी,कै लक्ष्मीबाई देशमुख कॉलेज संस्थेचे अध्यक्ष संजय  देशमुख, ओबीसीचे नेते विलास ताटे, पत्रकार दत्ता  काळे  अॅड अर्जुन सोंळके अदिनी शुभ संदेश दिला . त्यानंतर रॅली नेहरू चौक मार्ग रॅलीचा समारोप शहर पोलिस ठाणे येथे  पोलिस निरिक्षक देविदास शेळके, पोलिस निरिक्षक उमेश कस्तुरे, जवाहर एज्युकेशन सोसायटी सचिव दत्ता अप्पा ईटके गुरूजी, जिल्हा समन्वयक एन एस एस उपप्राचार्य लक्ष्मण मुंडे, अदि उपस्थिती होते . 
           या रॅली आयोजन एन एस एसचे प्रा डॉ माधव रोडे, एन सी सी प्रा गणेश चव्हाण , एन एस एस डॉ वीरश्री आर्या, प्रा प्रविण फुटके, प्रा विजय बेंडसुरे, प्रा सदानंद लोंखडे आदि उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?