जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

परळीच्या महिला महाविद्यालयाला शासनाचा पुरस्कार

 राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय पुरस्कार :
परळीचे महिला महाविद्यालय सर्वोत्कृष्ट तर डॉ. प्रा.एल. एस. मुंडे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी ....
         महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेसाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी यावर्षी परळीच्या कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची निवड झाली आहे तर याच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा.एल.एस. मुंडे यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.
    राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सन 2017-2018 मध्ये निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांचे स्वरूप राज्यस्तरीय आहे. यावर्षीच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी राज्यातून सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक व सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या व्यक्ती व संस्थांची यादी नुकतीच राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
          यामध्ये या अतिशय प्रतिष्ठेच्या व राज्यस्तरीय पुरस्कारासाठी परळी येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरले आहे.  तर उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कारासाठी सुद्धा याच महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.प्रा.एल.एस. मुंडे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान परळी साठी ही गौरवाची बाब असून राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाविद्यालय व कार्यक्रमाधिकारी यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड होणे हे परळीचा सन्मान करणारी बाब आहे.
      या पुरस्कारांसाठी संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख,  प्राचार्या डाॅ. आर. जे. परळीकर, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख संचालक सौ.छायाताई देशमुख, प्रा.डॉ. विद्याताई देशमुख, संचालकासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?