इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

संगीत क्षेत्रात यश..... परळीचा शंकर गुट्टे शिष्यवृत्तीस पात्र

परळीचा शंकर गुट्टे शिष्यवृत्तीस पात्र

 परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...

         अतिशय बिकट परिस्थितीवर मात करीत यशाचे व ध्येयाचे उंच शिखर गाठता येते हे नेहमीच ग्रामीण भागातील सर्वसामान्यांनी सिद्ध केले आहे .अशीच प्रचिती संगीत क्षेत्राला येत आहे .चि. शंकर दामोदर गुट्टे हा परळी तालुक्यातील कासारवाडी या अतिशय दुर्गम भागातून अंबाजोगाईसारख्या विद्येच्या माहेरघरात संगीत शिक्षणासाठी दररोज ये-जा करतो .पं. शिवदासजी देगलूरकर यांच्या "बालगंधर्व संगीत महाविद्यालय व गुरुकुल "येथे श्री.प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सांगीतिक प्रवास चालू आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई या सांगीतिक क्षेत्रातील अतिशय नामवंत संस्थेने संगीतक्षेत्रातील प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली व त्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन केले. त्या स्पर्धेमध्ये चि. शंकरने आपल्या गायनाने रसिकांना व परीक्षकांना मंत्रमुग्ध करत शिष्यवृत्ती मिळवली. याआधीही" झी टीव्हीच्या सारेगमप "या सांगीतिक कार्यक्रमात अंतिम 30 मध्ये जाण्याची किमया शंकरने साधली होती. श्री. बंडोपंत ढाकणे या त्याच्या प्राथमिक सांगीतिक गुरूंनी त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून अंबाजोगाई येथील पं. शिवदास देगलूरकर यांच्या "बालगंधर्व संगीत महाविद्यालय व गुरुकुल" येथे पुढील उच्च शिक्षणासाठी आणले येथे प्राध्यापक श्री. प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन वर्षात प्रवेशिका पूर्ण ते मध्यमा पूर्ण शिक्षण घेत घेत अनेक नामवंत स्पर्धांमध्ये आपला ठसा त्याने उमटवला आहे .सध्या तो मध्यमा पूर्ण चे शिक्षण घेत असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची शिष्यवृत्ती म्हणजे त्याच्या कर्तबगारी मध्ये मानाचा तुरा समजला जात आहे .म्हणून समाजातील सर्व स्तरांमधून शंकर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या त्याच्या यशाबद्दल पं.श्री. शिवदासजी देगलूरकर,सौ. शालिनी देगलूरकर, श्रीमती उर्मिला गुट्टे ,श्री. बंडोपंत ढाकणे ,श्री. प्रसाद कुलकर्णी ,श्री. मुरलीधर साखरे ,श्री .सौदागर साखरे, श्री .सुरज गुट्टे यांनीही अभिनंदन केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!