इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

ज्योतिर्लिंगक्षेत्र परळीच्या १३३ कोटीच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीची मंजुरी !

 बीड.
ज्योतिर्लिंगक्षेत्र परळीच्या १३३ कोटीच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीची  मंजुरी !
परळी वैजनाथ /प्रतिनिधी...
      पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या शंभर कोटींच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीने मंजुरी दिली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये वर्षभर भाविकांची सतत दर्शनासाठी गर्दी असते. असे असले तरी या देवस्थानचा भीमाशंकर व घृष्णेश्‍वर प्रमाणे अद्यापही विकास झालेला नाही. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांना राहण्यासह इतर अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. येथे श्रावण महिना, महाशिवरात्री यासह इतर वेळीही भाविकांची मोठी गर्दी असते. येथे येणार्‍या भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, देवस्थानचा विकास व्हावा, यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी 133 कोटी 59 लाख 19 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
         यासाठीचा आराखडा जिल्हास्तरीय समितीने मंजूर केला असून तो नगरविकास खात्याकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर उच्चस्तरीय समिती व शिखर समिती या आराखड्यासाठी मंजुरीचे काम करणार आहे.
●●●●●●●●
परळी येथील विकासासाठी 133 कोटींपेक्षा अधिक निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम खाते, वीज वितरण, नगरपालिका, पर्यटन विभाग आदी विभागांतर्गत परळी येथे कामे होणार आहेत. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. - बालाजी आगवाने, जिल्हा नियोजन अधिकारी, बीड.
●●●●●●●
माहिती स्त्रोत : दिनेश गुळवे,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!