भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे - ना. पंकजा मुंडे


*भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे*
*_ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पार पडला रासपचा स्थापना दिवस_*

नवी दिल्ली दि. २९ ---- रासप हा अठरा पगड जाती जमातीला सोबत घेवून काम करणारा पक्ष असून भाजपच्या सत्ता परिवर्तनाच्या लढाईत त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. या पक्षाचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

   रासपचा पंधरावा स्थापना दिन समारोह आज दिल्लीतील काॅन्स्टीट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. रासपचे अध्यक्ष तथा राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर व रासपचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

   रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे माझे बंधू आहेत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात आमचे बहिण-भावाचे नाते अतूट असं आहे, मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या लढाईतून आम्ही खूप कांही शिकलो, त्यांनी दाखविलेल्या साहस आणि संयमाच्या मार्गावर वाटचाल करत पुढे जात असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. रासपने माझा घोंगडी व काठी देवून केलेला सत्कार हा  साहस व आपल्या सारख्या तमाम बांधवांच्या प्रेमाचे प्रतिक आहे असे सांगून त्या म्हणाल्या की, रासप हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करणारी संघटना आहे, अनेक सामाजिक प्रश्नांवर जानकर यांनी लढा दिला. आयुष्यभर अविवाहित राहून फक्त आईचा आशीर्वाद घेवून ते समाजाच्या भल्यासाठी घराबाहेर पडले. आपले सर्व आयुष्य त्यांनी यासाठी समर्पित केले आहे त्यांचे काम खरोखरीच धाडसी व कौतुकास्पद आहे. रासप हा भाजपचा चांगला मित्र आहे, सत्ता परिवर्तनात त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे, धनगर समाज हा लढवय्या समाज आहे, जानकरांसारखे कणखर नेतृत्व त्यांना लाभल्याने त्यांचे प्रश्न निश्चित मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करून त्यांनी रासपच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !