भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा 23 नोव्हेंबरला




भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा 23 नोव्हेंबरला
* ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 17 सप्टेंबरपासून
नागपूर, दि. 28 : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विनामुल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. या प्रशिक्षणात प्रवेशाकरिता संस्थेच्या वतीने शुक्रवार, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेत प्रवेशाकरिता इच्छूक विद्यार्थी दिनांक 17 सप्टेंबर ते 31 संस्थेच्या संकेतस्थळ www.preiasnagpur.org.in वरुन ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. दिनांक 12 ते 23 नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा पत्र उपलब्ध करून देण्यात येईल.
परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंबंधीची माहिती, परिक्षेसंबंधी सूचनेची विस्तृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळ www.preiasnagpur.org.inवर उपलब्ध असल्याचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !