जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

50 हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या भट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक


50 हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या भट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक - पर्यावरण मंत्री रामदास कदम


मुंबई, दि. 28 : राज्यात पारंपरिक विटांची निर्मिती करत असताना 50 हजारांपेक्षा जास्त वीट निर्मिती करणाऱ्या वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील,  असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे सांगितले.
आज मंत्रालयात महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या श्री.कदम शिष्टमंडळाने पारंपरिक वीट भट्टीसंदर्भात पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी पर्यावरण मंत्री बोलत होते. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. कदम म्हणाले, एकावेळी 50 हजारापेक्षा कमी विटांची निर्मिती करत असल्यास त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक नसेल. मात्र 50 हजारापेक्षा जास्त वीट निर्मिती करत असतील तर अशा वीट भट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमती पत्र बंधनकारक राहील. तसेच एकावेळी 50 हजारांची निर्मिती केल्यानंतर तीन दिवसांनंतरच दुसरी वीट भट्टी लावण्यात यावी. वीट भट्टीचे ठिकाण एक हजार लोकसंख्या असलेल्या वस्तीपासून आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून  कमीत कमी 200 मीटर अंतराच्या पुढे असावे, असेही पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?