जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

बाजार समिती कर्मचाऱ्यांना आनंदाची वार्ता. ....



*बाजार समित्यांच्या कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावण्याचा अहवाल दाखल*

 राज्यातील 307 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सुमारे 7 हजार 51 कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीने आपला अहवाल शासनाकडे दाखल केलेला आहे.

शासनाने फळे व भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर स्वस्त धान्य दुकानांमधून वितरीत होणार्‍या शेतमालावरील बाजार फी बंद केली आहे.

 खाजगी बाजारांची स्थापना, व्यापार्‍यांना थेट परवाने, कंत्राटी शेती इत्यादी बाबींमधून बाजार समित्यांना मिळत असणार्‍या सेसचे उत्पन्नावर विपरित परिणाम झाल्याने सर्व कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, असा राज्य बाजार समिती सहकारी संघाचा अभिप्राय अहवालात नमूद केला आहे.

 समितीच्या शिफारशीमधील पर्याय क्रमांक 1 नुसार समित्यांचे सर्व कर्मचारी शासन सेवेत सामावून घेऊन वेतन, भत्ते शासनाकडून देण्यात यावेत. सन 2017-18 च्या मंजूर अर्थसंकल्पानुसार एकूण आस्थापना खर्च 311.13 कोटी इतका होणे अपेक्षित असून या खर्चात दरवर्षी 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. यामुळे कर्मचारी निर्भयपणे काम करुन राजकीय दबावाला बळी पडणार नाहीत. कर्मचारी कोणत्याही बाजार समितीत बदलास पात्र राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?