जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

29 ऑगष्ट मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे अवाहन

29 ऑगष्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन
क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचे अवाहन
बीड, दि.28:- महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार शहरी भागात आढळतो.  जोपर्यंत ग्रामीण  भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहचविले जाणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये क्रीडा विषयक जाणीव व वातावरण निर्माण होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रीडा व खेळाची प्रगती साध्य करणे शक्य होणार नाही.  ही वस्तुस्थिती लक्षात घेता शासनाने सन 1991-92 यावर्षी पासून दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निमार्ण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्हयात दरवर्षी क्रीडा सप्ताह व मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगार) यांचा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास क्रीडा विभागाने सन 1997 पासून मान्यता दिलेली आहे.  त्या अनुषंगाने दि. 29 ऑगस्ट हा क्रीडा दिन व दि. 12 ते 18 डिसेंबर हा कालावधी क्रीडा सप्ताह म्हणून राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येतो.
  जिल्हयातील शाळा, विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, विविध क्रीडा संस्था यांनी 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगार) यांचा जन्म दिन क्रीडा दिन  म्हणून पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करुन व्यापक स्वरुपात साजरा करावा. दि. 29 ऑगस्ट 2015 रोजी  राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपल्या कार्यक्षेत्रात चर्चासत्रे आयोजित करणे. उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करणे. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करणे. क्रीडा वातावरण निर्मितीसाठी अनुषंगीक उपक्रम राबविणे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत दिनांक 29 ऑगस्ट 2018 रोजी क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकूल, बीड येथे सकाळी 11.00 वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात येणार असुन त्यांच्या जिवनावर व्याख्यान देण्यात येणार आहे.  तसेच सन 2017-18 या वर्षात शालेय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्या करीता जिल्हयातील अशा सर्व खेळाडूंनी आपल्या वैयक्तीक अर्जासोबत सहभाग व प्राविण्य मिळविलेल्या प्रमाणपत्राची प्रत कार्यालयात दि. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत सादर करणे आवश्यक राहील.
जिल्हयातील जास्तीत जास्त शाळा, विद्यालये, क. महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य/ मुख्याध्यापक, क्रीडा मंडळे, युवक मंडळे, विविध संस्था यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन करुन त्याचा अहवाल जिल्हा क्रीडा कार्यालयास सादर करावा. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बीड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?