पोस्ट्स

MB NEWS:कवी साळेगावकरांच्या 'प्रसन्न प्रहार' विडंबन काव्यसंग्रहाचे शुक्रवारी कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते प्रकाशन

इमेज
  कवी साळेगावकरांच्या 'प्रसन्न प्रहार'  विडंबन काव्यसंग्रहाचे शुक्रवारी कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते प्रकाशन माजलगाव: आपल्या खुमासदार शैलीने सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर विडंबन करून अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या 'प्रसन्न प्रहार' या विडंबन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे ॠषितुल्य ख्यातनाम व्यक्तिमत्व हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते माजलगाव येथे संपन्न होणार आहे. दि.3 मार्च 2023 रोजी वैष्णवी मंगल कार्यालय माजलगाव येथे सायं.5.30 वा.संपन्न होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून माजी आमदार डी.के. देशमुख, प्रमुख अतिथी प्रसिद्ध कवी श्रावण गिरी, सूत्र संवादक राजेसाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या प्रकाशन सोहळ्यास व कवी नायगावकरांच्या खुमासदार हास्यरसाच्या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व रसिकांनी उपस्थित राहावे असे अवाहन आयोजक गझलकार दिवाकर जोशी, कवी संजय सपाटे , सौ.माधुरी साळेगावकर, डॉ. स्वानंद कुलकर्णी, पत्रकार हिमांशू देशमुख, कवी प्रवीण काळे, अभिजित गिरी यांनी केले आहे

MB NEWS:मोह्याची कन्या झाली मंडळाधिकारी

इमेज
  मोह्याची कन्या झाली मंडळाधिकारी अभिनंदनचा वर्षाव शिरसाळा प्रतिनिधी परळी तालुक्यातील मोहा येथील माहेरवाशीन असलेल्या कन्येची अंबाजोगाई तहसील महसूल मंडळात मंडळाधिकारी पदी पदोन्नती झाली. मोहा सह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. मोहा येथील निवृत्त सहशिक्षक शंभू लिंग स्वामी यांची मुलगी श्रीमती माधुरी कुमार स्वामी ही परळी तहसील येथे तलाठी पदावर रुजू झाली होती.9 वर्ष सेवा बजावल्यानंतर अंबाजोगाई येथील तहसील ला तलाठी पदावर कार्यरत असताना नुकतीच माधुरीची मंडळाधिकारी पदावर पदोन्नती झाली. ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत महसूल मंडळात कार्यरत होत चांगली कामगिरी केली आहे. तलाठी पदावर असताना अंबाजोगाई तहसील अंतर्गत  धावडी तलाठी सज्जातील शेतकऱ्यांची कामे कर्तव्य तत्परतेने पार पाडली आहेत. पदोन्नतीने उजनी महसूल मंडळात मंडळ अधिकारी पदावर काम करताना आपणास आनंद होत असल्याची प्रतिक्रिया माधुरी स्वामींनी दिली आहे. माधुरी स्वामी यांच्या पदोन्नती निमित्त अखिल भारतीय वीरशैव महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख विजय जंगम, वैजनाथ स्वामी, संतोष स्वामी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

MB NEWS:मध्यप्रदेशात आर्थिक दुर्बल महिलांसाठी 'लाडली बहना' योजना

इमेज
  पंकजाताई मुंडेंनी प्रदेश बैठकीत  केलं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं विशेष अभिनंदन मध्यप्रदेशात आर्थिक दुर्बल महिलांसाठी 'लाडली बहना' योजना _दोन दिवसीय बैठकीचा झाला समारोप_  भोपाळ ।दिनांक २८। मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशात आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी 'लाडली बहना' योजना मंजूर करून महिलांचा सन्मान वाढविल्याबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री चौहान यांचं आज प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत विशेष अभिनंदन केलं.    दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा आज थाटात समारोप झाला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश, प्रभारी मुरलीधर राव, सह प्रभारी पंकजाताई मुंडे, प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, प्रदेश सरचिटणीस हितानंद शर्मा आदींसह वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.    मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'लाडली बहना' योजनेला मंजूरी दिली. या योजनेची अधिकृत घोषणा ५ मार्चला होणार असून आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना प्रति माह एक हजार रूपये

MB NEWS:महिला महाविद्यालयात मराठी राजभाषादिन समारोह संपन्न

इमेज
  उच्च दर्जाची अभिव्यक्ती ही केवळ मातृभाषेतूनच होऊ शकते - प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे महिला महाविद्यालयात मराठी राजभाषादिन समारोह संपन्न  परळी वैजनाथ.....             येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सतत वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत असतात . त्यात आज महाविद्यालयातील मराठीविभागातर्फे मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते .        मराठी भाषेचा हिरा म्हणून ज्यांना संबोधिले जाते असे श्री वि . वा . शिरवाडकर अर्थात् कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषादिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले . मराठीचे वैभव वाढवणारा असा एक दिग्गज कादंबरीकार , नाटककार व कवी ज्यांची थोरवी देश-विदेशातही गायली जाते .अशा महापुरुषाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा मराठी राजभाषा गौरवदिन साजरा होतो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे .       संस्थेचे अध्यक्ष मा .संजयजी देशमुख हे या प्रसंगी अध्यक्ष लाभले . या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून संत रामदास महाविद्यालय ,  घनसावंगी येथील नाट्यशास्त्र विभागातील प्रा

MB NEWS::प्रतिक्स मेकअप स्टुडिओचा गुरुवारी पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार उदघाटन समारंभ

इमेज
  प्रतिक्स मेकअप स्टुडिओचा गुरुवारी पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार  उदघाटन समारंभ परळी वैजनाथ         शहरात नव्यानेच सुरू होत असलेल्या हेअर, स्कीन आणि मेकअप अशा विविध सेवा एकाच छताखाली असलेल्या प्रतिक्स मेकअप स्टुडिओचे उद्या गुरुवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या शुभ हस्ते उदघाटन होणार आहे. या समारोहला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे मेकअप स्टुडिओचे संचालक प्रतिक ज्ञानोबा सुरवसे, सौ. प्रतिभा सुरवसे आणि नगरसेविका सौ. उमाताई समसेट्टी यांनी केले आहे.         उद्या गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता समसेट्टी निवास, प्रेमपन्ना नगर, आयसीआयसीआय बँकेच्या समोर हा उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे.         शहराच्या सौंदर्य क्षेत्रात यामुळे मोठी भर पडणार आहे. प्रतिक्स मेकअप स्टुडिओचे संचालक प्रतिक सुरवसे यांनी तब्बल तीन वर्षे पुणे येथे मेकअप, स्कीन आणि विविध सौंदर्य शास्त्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. हेअरस्टाईल संबंधित अतिशय आधुनिक प्रशिक्षण हे मुंबईमध्ये सुमारे एक वर्ष प्रशिक्षण घेतले आहे. एवढेच नव्हे तर गेल्या काही वर्ष

MB NEWS:इंडिकाच्या धडकेत एकाचा मृत्यू

इमेज
  इंडिकाच्या धडकेत एकाचा मृत्यू नांदुर फाटा :- बीड तालुक्यातील धावज्याचीवाडी पाटीवर केज  येथुन बीडकडे ब्रिझा MH 02 EE 6727गाडी धावज्याचीवाडी पाटीवर आली असता समोर रस्ता ओलांडताना ब्रिझा गाडीने समोरासमोर धडक दिल्याने आश्रुबा हरीभाऊ भोसल वय 70 वर्षे याना धडक दिल्याने विस ते तिस फुट लांब रस्त्यावर पडल्याने डोक्यात व नाका तोंडातून रक्त आले हा अपघात रात्री 7 वा घडला आश्रुब भोसले हे नांदुर फाट्यावरून आपल्या घराकडे जात असताना घरासमोर आल्यावर रस्ता ओलांडताना गाडीने धडक दिली गाडीने धडक बसताच गाडीसह गाडी चालकाने घटना स्थळांउन सुसाट वेगाने पळ काढला याच गावातील दोन तरूणांनी त्या गाडीचा पाठलाग करत नेकनुर जवळ पकडण्यात आली या अपघातानंतर नातेवाईक येताच त्यांना दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला या घटनेमुळे धावज्याची वाडी गावामध्ये शोककळा पसरली आहे. Click: ● *देणारांचे हात हजारो.! | 'त्या चिमुकलीच्या' उपचारासाठी निधी | परळीकर सरसावले | आपणही करा मदत (बॅकिंग डिटेल्स description मध्ये पहा.)* #mbnews #subscribe #like #share #comments

MB NEWS:आगामी निवडणूकीत २०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य

इमेज
  मध्यप्रदेश भाजपाची भोपाळमध्ये दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक ;  पंकजाताई मुंडेंची उपस्थिती आगामी निवडणूकीत २०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ; बुथ सशक्तीकरण, संघटनात्मक बाबींवरही बैठकीत चर्चा भोपाळ ।दिनांक २७। मध्यप्रदेशात आगामी काळात होऊ घातलेल्या  निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविण्यासाठी प्रदेश  भाजपाच्या वतीने भोपाळमध्ये दोन दिवसीय बैठक सध्या पार पडत आहे. भाजपच्या सह प्रभारी तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे बैठकीस उपस्थित राहण्यासाठी कालपासून  भोपाळमध्ये आहेत.     भोपाळ येथील प्रदेश कार्यालयात रविवारी भाजपची बैठक संपन्न झाली. बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे.  बैठकीस उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई मुंडे काल सकाळीच भोपाळमध्ये दाखल झाल्या. राजा भोज विमानतळावर  प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती सिमा सिंह व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. दुपारी बैठकीला दीप प्रज्वलनाने सुरवात झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ सशक्तीकरण अंतर्गत, बूथ विस्तारक अभियान-2 चा आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यात ज्या १०३ जागांवर पराभव झाला होता, त्या आकांक्षी प्रभारी समवेत बैठकीत चर्चा झाली.

MB NEWS:आठवड्यातून एकदा तरी अवांतर पुस्तक वाचावे -प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड

इमेज
  आठवड्यातून एकदा तरी अवांतर पुस्तक वाचावे - प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड भेल सेकंडरी स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          येथील भेल सेकंडरी स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक व्याख्याते प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी मार्गदर्शन केले. आठवड्यातून एकदा तरी अवांतर पुस्तक वाचावे म्हणजे मस्तक समृद्ध होते असे प्रतिपादन प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी केले.            भेल सेकंडरी स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक तयार केली. कविता सादर केल्या व मनोगत व्यक्त केली. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांना हसवत, खेळवत अंतर्मुख केले. आठवड्यातून एकदा तरी अवांतर पुस्तक वाचावे असा मोलाचा सल्ला दिला.           हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागाने सहभाग घेतला, प्रास्ताविक श्री. उदय देशमुख सर यांनी सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमोद गौरशेटे लाभले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.स्वराली मिसाळ, श्रावणी च

MB NEWS:भाषा संवर्धन काळाची गरज प्रा.डॉ.राजू धायगुडे

इमेज
  भाषा संवर्धन काळाची गरज प्रा.डॉ.राजू धायगुडे    म.शि.प्र.मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय परळी वैजनाथ येथे मराठी भाषा  दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवगण महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजू धायगुडे उपस्थित होते.यावेळी त्यांनी भाषेचा गौरव करत असताना भाषा संवर्धन करने व सर्व  मराठी भाषिकांना मराठी भाषेचे संवर्धन करून प्रचार व प्रसार त्याचे आव्हान त्यांनी केले व मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी तिचे संवर्धन करणे काळाची गरज आहे असे सांगितले. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे मॅडम यांनी मराठी भाषेतील साहित्य व मराठी साहित्याचा संपूर्ण जगावरती प्रभाव कसा आहे हे साहित्यिकांच्या साहित्याचा माध्यमातून स्पष्ट केले, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.के. हंडीबाग आभार डॉ.एल आर मुंडे यांनी केले.         हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.श्रीहरी गुट्टे श्री.अजय सोळंके,डॉ.विलास चौधरी,प्रा.अघाव सर,प्रा.चाटे, प्रा.लव्हाळे,प्रा.टी.एस.देशमुख, प्रा.बनसोडे यांनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्

MB NEWS:शिबीराला मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती

इमेज
  महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंगळवार 28 फेब्रुवारी रोजी  मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर - डाॅ.संतोष मुंडे शिबीराला मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर उद्या दिनांक.28 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराला मान्यवरांची  प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांनी सांगितले आहे.        अपंगांचे कैवारी म्हणून ओळख असलेल्या व विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध आरोग्य शिबिरे व उपक्रम राबवणारे प्रसंगी दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांच्यावतीने उद्या मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी  डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हॉस्पिटल, अरुणोदय

MB NEWS:केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड -एक सर्वसमावेशक नेतृत्व

इमेज
  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड -एक सर्वसमावेशक नेतृत्व ना. डॉ. भागवत किशनराव कराड , केंद्रीय वित्त राज्यमंत्री भारत सरकार १६५ , नवी दिल्ली- ११०००१ असा कार्यालयीन पत्ता असलेल्या डॉ भागवत कराड यांचा जन्म मराठवाडा विभागातील जिल्हा लातूर आणि अहमदपूर तालुक्यातील चिखली या गावी दि . १६ जुलै १ ९ ५६ या वर्षी झाला आई गयाबाई वडील किशनराव यांनी कष्टमय जीवन व्यतीत केले. त्यांना एकूण दहा अपत्ये झाली पण काही मुले अल्पायुषी ठरली . त्यांची मुले डॉ .भागवत व दिपक , अंगद आणि दोन कन्या दिपाली व उज्जवला यांना शालेय शिक्षण देत संगोपन केले. घरात वारकरी सांप्रदयाचे महान राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या आध्यात्मिक सुधारणावादी विचारांचे वातावरण होते.                                                               शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ भागवत कराड यांनी गरीबी , सर्वसामान्याच्या वेदना, दुःख बालपणापासूनच अनुभवल्या व पाहिल्या आहेत. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शाळेपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले.पण लहान वयात शिक्षण शिकून मोठे व्हायचे स्वप्न उराशी होते. म्हणूनच पुढील शिक्षणासा

MB NEWS:गर्लफ्रेंडला मेसेज करण्याऱ्या मित्राची हत्या, प्रायव्हेट पार्ट कापले; नंतर...

इमेज
  गर्लफ्रेंडला मेसेज करण्याऱ्या मित्राची हत्या, प्रायव्हेट पार्ट कापले; नंतर... Hyderabad Crime:  तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला मेसेज पाठवल्याबद्दल आणि कॉल केल्यामुळे त्याच्या मित्राची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी शनिवारी केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने मित्राचा शिरच्छेद केला, त्याचे हृदय आणि प्रायव्हेट भाग कापले. या आरोपीने मृताची बोटे कापली आणि नंतर आत्मसमर्पण करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीच्या जबानीवरुन गुन्हा दाखल करुन सविस्तर तपास सुरु केला आहे. त्याचबरोबर, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिहर कृष्णा असे आरोपीचे नाव असून, नवीन असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आणि हरिहर कृष्णा यांनी दिलसुखनगर येथील एकाच कॉलेजमध्ये इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले होते. घटनेच्या केंद्रस्थानी असलेली तरुणीही त्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती. दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडले, मात्र तरुणीने पहिल्यांदा नवी

MB NEWS: सढळ हाताने मदत करा

इमेज
  कन्येच्या वैद्यकीय उपचारासाठी परळीकर काढणार सोमवारी भव्य मदत फेरी *_कु.सान्वी शिवदीप चौंडेसाठी परळीकर एकवटणार; मोठ्या संख्येने सहभागी व्हा_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीची भूमीकन्या कु.सान्वी शिवदीप चौंडे हिस अतिशय दुर्मिळ असा आजार झाला आहे. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत असून, त्यावरील शस्त्रक्रियेसाठी जवळपास २५ ते ३० लक्ष रुपयांचा खर्च येतो आहे. कु.सान्वीचे कुटुंब अत्यंत सामान्य असून वडील प्रेस कामगार आहेत. जेमतेम अर्थव्यवस्था असलेल्या या कुटुंबाला हा खर्च पेलणारा नाही. परळीची कन्या म्हणून तिच्या उपचारासाठी निधी गोळा करण्यासाठी शहरातून भव्य अशी मदत फेरी काढण्यात येणार आहे. सोमवार दि.२७ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही फेरी निघेल. थालोसेनिया हा अत्यंत दुर्मिळ असा गंभीर आजार असल्याचे डॉक्टर सांगतात. लाखांत एकालाच होणारा हा आजार आहे. यावरील उपचार सुद्धा फार गुंतागुंतीचे आहेत. शस्त्रक्रियेचा खर्चही अफाट आणि सर्वसामान्य कुटुंबाला न पेलवणारा असा आहे. कु.सान्वी शिवदीप चौंडे या सात वर्षीय चिमुकलीला हा आजार जडला आहे. मागील अने

MB NEWS:दुर्दैवी आपघात: आजोबाला दवाखान्यात घेऊन जाताना काळाचा घाला

इमेज
  दुर्दैवी आपघात: आजोबाला दवाखान्यात घेऊन जाताना काळाचा घाला    गंगाखेड.....राजुर मर्डसगाव मार्गे गंगाखेड येथे येणारी मोटरसायकल व कळंब नांदेड या बसचा समोरासमोर अपघात झाल्याने मोटार सायकल वर असणारे आजोबा व नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.     पालम तालुक्यातील रावराजुर येथील शिवाजी किसनराव शिंदे वय 75 यांना दवाखान्यात उपचारासाठी नातू श्रीनिवास कल्याणराव शिंदे वय 19 हा मोटरसायकल वर गंगाखेड येथे घेऊन जात असताना कळंब नांदेड ही बस गंगाखेड वरून पालम कडे जात असताना मोटर सायकल असणारे दोघेजण बसच्या उजव्या चाकाखाली आल्याने अपघातात मृत्यू झाल्याची घटना सकाळी 9:30 ते 9:45 दरम्यान घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, पोलीस उपनिरीक्षक बुधोडकर यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळावरून दोन्ही मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात सेवाविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. 

MB NEWS:कर्ज कसे फेडायचे ?विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
  कर्ज कसे फेडायचे ?विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या गेवराई.....   सततची नापिकी त्यात खासगी सावकाराचे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे ? या चिंतेतून एका 42 वर्षे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दि.25 रोजी  सकाळी तालुक्यातील रांजणी येथे उघडकीस आली.       गेवराई तालुक्यातील रांजणी येथील अशोक सुखदेव औंढकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रात्री त्यांनी  लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच बिट अमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अशोक औंढकर यांच्याकडे खासगी सावकारासह बँकेचे कर्ज आहे. ते कर्ज कसे फेडायचे? या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून होते. रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, आई- वडिल, एक बहिण असा परिवार आहे.

MB NEWS:युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

इमेज
  युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या  गेवराई,  तालुक्यातील मालेगाव येथील सतीश चंद्रभान जराड वय.३० या शेतकऱ्याने आज दि.२५ रोजी दुपारी स्वतःचे शेतात जाऊन विश प्रशासन करून आत्महत्या केली.    तालुक्यातील मालेगाव येथील सतीश चंद्रभान जराड वय वर्ष  ३०   शेतकऱ्यांनी आज दिनांक २५ रोजी दुपारी स्वतः शेतात जाऊन विश  प्रशासन करून आत्महत्या केली असून आत्महत्या चे कारण मात्र समजू शकले नाही याप्रकरणी आत्महत्याचे झाल्याचे समजताचचकलंबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उमापूर या ठिकाणी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अकस्मात गुन्ह्याची नोंद चकलांबा पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

MB NEWS:सांब स्वामी महाराजांच्या जयघोषात निटूर नगरी झाली भक्तीमय

इमेज
  गुरू श्रद्धेचे स्थान,गुरु असे महान, सकल जगी ; उपाचार्यरत्न सांब शिवयोगीश्वर महाराज  - सांब स्वामी महाराजांच्या जयघोषात निटूर नगरी झाली भक्तीमय  निटूर / लातूर  : प्रतिनिधी सुख दुःख प्रश्न गुरु जवळ मांडा. सर्व प्रश्नांची उत्तरे गुरूकडे असतात. गुरुच्या सानिध्याने तुमच्यातील राग ,लोभ, मोह, माया,द्वेष कमी होत असतो, गुरु स्वत्वाची जाण ,गुरु श्रद्धेच स्थान! गुरु असे महान !सकल जगी !!कारण गुरु हे माऊली असतात.आई नंतर गुरूंनाच आपण माऊली म्हणतो तपोनिधी सांब महाराज पशू आणि मानवावर सारखेच प्रेम करत असत.ते प्रत्यक्षात मृत्युंजय होते.विद्येच्या जोरावर त्यांनी हजारो रूग्णांना प्लेग सारख्या महाभयंकर आजारातून बरे केले..आज इथून जाताना सद्विचार,आचार घेऊन जा.अंतःकरणातून भक्ती करा. असे आवाहन उपाचार्यरत्न सांब शिवयोगीश्वर महाराज यांनी आशिर्वचनश दरम्यान  उपस्थित महीला पुरूष भाविकांना केले. षटस्थल ब्रह्मी १०८ श्री तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांचा १३३ वा जन्मोत्सव शनिवार दि.२५ फेब्रुवारी जन्मोत्सव दिनी आशिर्वचन दरम्यान ते निलंगा तालुक्यातील निटूर येथे बोलत होते.हा जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी भव्य

MB NEWS:कामगार साहित्य संमेलन मिरज

इमेज
  माणसातील सृजनशक्ती असे पर्यंत साहित्यही असणार  संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण कामगार साहित्य संमेलन मिरज नमस्कार! महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कामगार मंत्री व पालकमंत्री सांगली जिल्हा आणि कामगार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.नामदार डॉ.श्री.सुरेश (भाऊ) खाडे साहेब, संमेलनाचे उद्घाटक नवभारत या वैचारिक नियतकालिकाचे विद्यमान संपादक, इतिहास अभ्यासक आणि माझे स्नेही डॉ. राजाभाऊ दीक्षित, कामगार विभागाच्या प्रधान सचिव मा.विनिता वेद-सिंगल, कामगार कल्याण आयुक्त मा.रविराज इळवे व मंचावरील सर्व मान्यवर आणि मित्र मैत्रिणीनो. आजच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित साहित्य संमेलन अध्यक्षपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल धन्यवाद. पण यासाठी माझी निवड का केली हे मात्र मला अजून कळत नाही. मात्र मला निमंत्रण देण्यासाठी प्रथम दूरध्वनीवरुन संपर्क साधणारे आणि नंतर घरी येऊन निमंत्रित करणारे मा.रविराज इळवे साहेब यांच्या परम सौजन्यशील बोलण्या वागण्याने मी सहजपणे होकार दिला. हे संमेलन कामगारांच्या साहित्यासंदर्भात आहे हे सूत्र धरुनच मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. पण साहित्य, मग ते कोण

MB NEWS:शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांना पितृशोक

इमेज
  जगदीश लालाजी परदेशी यांचे दुख:द निधन; आज अंत्यसंस्कार शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांना पितृशोक परळी वैजनाथ/ प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता  निधन झाले. शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांचे ते वडील होत. बसवेश्वर कॉलनी भागातील रहिवासी तथा उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे आज शनिवारी निधन झाले. मृत्यू समयी ते 78 वर्ष वयाचे होते. जगदीश परदेशी हे अत्यंत मनमिळावू व सुस्वाभावी असल्याने सर्व परिचित होते. विविध धार्मिक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असत. शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. दरम्यान जगदीश बालाजी परदेशी यांच्या पार्थिवावर आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता बसवेश्वर कॉलनी समता नगर रेणुका माता मंदिर जवळ या त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा सार्वजनिक स्मशान भूमी येथे निघणार आहे.

MB NEWS:यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथ मार्फत रविवारी सामूहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन

इमेज
  यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथ मार्फत रविवारी सामूहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी)दि.२४- यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथच्या वतीने रविवार दि.२६ रोजी सामुहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन करण्यात आले आहे.बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराजांच्या आज्ञेने यज्ञसेवा परिवार परळी वैजनाथ मार्फत मासिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन केले जाते. रविवार दि.२६ रोजी दुपारी ४.३० वा. देशपांडे गल्लीत असलेल्या मनोहरपंत बडवे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हवनासाठी बसणाऱ्या भक्तांनी सोबत कोणतीही हवन सामग्री आणू नये याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे.या सामूहिक श्रीसूक्त हवनासाठी शिष्य वर्ग व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.