MB NEWS:शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांना पितृशोक

 जगदीश लालाजी परदेशी यांचे दुख:द निधन; आज अंत्यसंस्कार




शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांना पितृशोक


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी


येथील उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता  निधन झाले. शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांचे ते वडील होत.


बसवेश्वर कॉलनी भागातील रहिवासी तथा उपजिल्हा रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश लालाजी परदेशी यांचे आज शनिवारी निधन झाले. मृत्यू समयी ते 78 वर्ष वयाचे होते. जगदीश परदेशी हे अत्यंत मनमिळावू व सुस्वाभावी असल्याने सर्व परिचित होते. विविध धार्मिक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असत. शिवसेनेचे कार्यकर्ते मोहन परदेशी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. दरम्यान जगदीश बालाजी परदेशी यांच्या पार्थिवावर आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता बसवेश्वर कॉलनी समता नगर रेणुका माता मंदिर जवळ या त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा सार्वजनिक स्मशान भूमी येथे निघणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !