इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:आगामी निवडणूकीत २०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य

 मध्यप्रदेश भाजपाची भोपाळमध्ये दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक ;  पंकजाताई मुंडेंची उपस्थिती




आगामी निवडणूकीत २०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ; बुथ सशक्तीकरण, संघटनात्मक बाबींवरही बैठकीत चर्चा


भोपाळ ।दिनांक २७।

मध्यप्रदेशात आगामी काळात होऊ घातलेल्या  निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविण्यासाठी प्रदेश  भाजपाच्या वतीने भोपाळमध्ये दोन दिवसीय बैठक सध्या पार पडत आहे. भाजपच्या सह प्रभारी तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे बैठकीस उपस्थित राहण्यासाठी कालपासून  भोपाळमध्ये आहेत. 


   भोपाळ येथील प्रदेश कार्यालयात रविवारी भाजपची बैठक संपन्न झाली. बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे.  बैठकीस उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई मुंडे काल सकाळीच भोपाळमध्ये दाखल झाल्या. राजा भोज विमानतळावर  प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती सिमा सिंह व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. दुपारी बैठकीला दीप प्रज्वलनाने सुरवात झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ सशक्तीकरण अंतर्गत, बूथ विस्तारक अभियान-2 चा आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यात ज्या १०३ जागांवर पराभव झाला होता, त्या आकांक्षी प्रभारी समवेत बैठकीत चर्चा झाली. आगामी निवडणुकीत दोनशे पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. पक्षाच्या संघटनात्मक बाबींवरही यावेळी चर्चा झाली. 


बैठकीस प्रभारी पी मुरलीधर राव, सह प्रभारी पंकजाताई मुंडे, प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, खा. डाॅ. राम शंकर, संघटन सरचिटणीस हितानंद शर्मा आदींसह वरिष्ठ नेते उपस्थित होते.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!