MB NEWS:कर्ज कसे फेडायचे ?विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या

 कर्ज कसे फेडायचे ?विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई.....

  सततची नापिकी त्यात खासगी सावकाराचे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे ? या चिंतेतून एका 42 वर्षे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दि.25 रोजी  सकाळी तालुक्यातील रांजणी येथे उघडकीस आली. 

     गेवराई तालुक्यातील रांजणी येथील अशोक सुखदेव औंढकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रात्री त्यांनी  लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच बिट अमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अशोक औंढकर यांच्याकडे खासगी सावकारासह बँकेचे कर्ज आहे. ते कर्ज कसे फेडायचे? या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून होते. रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, आई- वडिल, एक बहिण असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार