MB NEWS:मध्यप्रदेशात आर्थिक दुर्बल महिलांसाठी 'लाडली बहना' योजना
पंकजाताई मुंडेंनी प्रदेश बैठकीत केलं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं विशेष अभिनंदन
मध्यप्रदेशात आर्थिक दुर्बल महिलांसाठी 'लाडली बहना' योजना
_दोन दिवसीय बैठकीचा झाला समारोप_
भोपाळ ।दिनांक २८।
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशात आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी 'लाडली बहना' योजना मंजूर करून महिलांचा सन्मान वाढविल्याबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री चौहान यांचं आज प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत विशेष अभिनंदन केलं.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा आज थाटात समारोप झाला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश, प्रभारी मुरलीधर राव, सह प्रभारी पंकजाताई मुंडे, प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, प्रदेश सरचिटणीस हितानंद शर्मा आदींसह वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'लाडली बहना' योजनेला मंजूरी दिली. या योजनेची अधिकृत घोषणा ५ मार्चला होणार असून आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना प्रति माह एक हजार रूपये अनुदान याद्वारे मिळणार आहे. एक चांगली जनहिताची योजना मंजूर करून महिलांचा सन्मान केल्याबद्दल पंकजाताईंनी या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं खास अभिनंदन केलं.
बैठकीस प्रदेश पदाधिकारी तसेच भाजपाचे सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा