इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:सांब स्वामी महाराजांच्या जयघोषात निटूर नगरी झाली भक्तीमय

 गुरू श्रद्धेचे स्थान,गुरु असे महान, सकल जगी ; उपाचार्यरत्न सांब शिवयोगीश्वर महाराज 



- सांब स्वामी महाराजांच्या जयघोषात निटूर नगरी झाली भक्तीमय 

निटूर / लातूर  : प्रतिनिधी

सुख दुःख प्रश्न गुरु जवळ मांडा. सर्व प्रश्नांची उत्तरे गुरूकडे असतात. गुरुच्या सानिध्याने तुमच्यातील राग ,लोभ, मोह, माया,द्वेष कमी होत असतो, गुरु स्वत्वाची जाण ,गुरु श्रद्धेच स्थान! गुरु असे महान !सकल जगी !!कारण गुरु हे माऊली असतात.आई नंतर गुरूंनाच आपण माऊली म्हणतो तपोनिधी सांब महाराज पशू आणि मानवावर सारखेच प्रेम करत असत.ते प्रत्यक्षात मृत्युंजय होते.विद्येच्या जोरावर त्यांनी हजारो रूग्णांना प्लेग सारख्या महाभयंकर आजारातून बरे केले..आज इथून जाताना सद्विचार,आचार घेऊन जा.अंतःकरणातून भक्ती करा.

असे आवाहन उपाचार्यरत्न सांब शिवयोगीश्वर महाराज यांनी आशिर्वचनश दरम्यान  उपस्थित महीला पुरूष भाविकांना केले.

षटस्थल ब्रह्मी १०८ श्री तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांचा १३३ वा जन्मोत्सव शनिवार दि.२५ फेब्रुवारी जन्मोत्सव दिनी आशिर्वचन दरम्यान ते निलंगा तालुक्यातील निटूर येथे बोलत होते.हा जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी भव्य  स्वरूपात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज की जय, उपाचार्यरत्न बालतपस्वी द्वितीय सांब शिवयोगीश्वर महाराज की जय, जय गुरूराज माऊली जय सांब माऊली या जयघोषात निटूर नगरी भक्तीमय वातावरणात दणाणून गेली होती.दरम्यान रस्त्यावर सडा रांगोळी काढून सुशोभीकरण करण्यात आले होते.ढोल,ताशा,झांज,टाळ,मृदंग च्या गजरात तपोनिधी सांब शिवयोगीश्वर महाराज यांच्या मूर्ती व जीवन चरित्र ग्रंथाची अड्डपालखीतून मिरवणूक काढण्यात आली.नंदी ध्वजाचे मिरवणुकीत मुख्य आकर्षण राहीले.रोषणाई,फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.महीला, पुरूषांनी भक्तीभावाने फुगडी खेळत मिरवणुकीत रंगत आणली.उपाचार्यरत्न सांब शिवयोगीश्वर महाराज यांचा तुला भार करण्यात आला.तसेच थोरले सांब स्वामी महाराज यांचा  पाळणा कार्यक्रम झाला.

मिरवणुकीत हजारोच्या संख्येने महीला पुरूष भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर महाप्रसादाने सांबकथेची सांगता झाली.कांताप्पा बुडगे, प्रभुअप्पा बोळेगावे, अजित मठपती, रवी मठपती, विठ्ठल बुडगे,बालाजी अंबेगावे,सोहम मठपती,परमेश्वर बुडगे,विठ्ठल डांगे,त्र्यंबक तत्तापुरे,कुमार डांगे, केदार मठपती,भागवत सुतार,सरपंच पती अनिल सोमवंशी,शिवराज सोमवंशी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!