इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:महिला महाविद्यालयात मराठी राजभाषादिन समारोह संपन्न

 उच्च दर्जाची अभिव्यक्ती ही केवळ मातृभाषेतूनच होऊ शकते - प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे




महिला महाविद्यालयात मराठी राजभाषादिन समारोह संपन्न


 परळी वैजनाथ.....

            येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सतत वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत असतात . त्यात आज महाविद्यालयातील मराठीविभागातर्फे मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते .

       मराठी भाषेचा हिरा म्हणून ज्यांना संबोधिले जाते असे श्री वि . वा . शिरवाडकर अर्थात् कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषादिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले . मराठीचे वैभव वाढवणारा असा एक दिग्गज कादंबरीकार , नाटककार व कवी ज्यांची थोरवी देश-विदेशातही गायली जाते .अशा महापुरुषाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा मराठी राजभाषा गौरवदिन साजरा होतो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे .

      संस्थेचे अध्यक्ष मा .संजयजी देशमुख हे या प्रसंगी अध्यक्ष लाभले . या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून संत रामदास महाविद्यालय ,  घनसावंगी येथील नाट्यशास्त्र विभागातील प्रा . डॉ . सिद्धार्थ तायडे  हे उपस्थित होते . यावेळी त्यांनी - "मराठी ही आपली मातृभाषा असून उच्च दर्जाची अभिव्यक्ती ही केवळ मातृभाषेतूनच होऊ शकते. " असे सांगून मराठीच्या उन्नतीसाठी सर्वानीच प्रयत्न करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.आज काल बोलीभाषेतून झालेली चित्रपटांची निर्मिती ही जगावर अधिराज्य करते आहे .असे उद्गार त्यांनी त्यांच्या उद्बोधनात काढले .

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा .डॉ .एल.एस. मुंडे सर यांनी ही याप्रसंगी आपले अनमोल विचार मांडले .

 सरतेशेवटी संस्थाध्यक्ष मा.श्री संजयजी देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात मराठी भाषेची महती सांगून भाषेच्या उन्नतीसाठी आपण महाविद्यालयात विभिन्न प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करूया असे विचार प्रतिपादन केले .यानंतर सभागृहात गर्जा महाराष्ट्र माझा  या महाराष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले .

      महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर प्रा . डॉ . श्याम नेरकर यांनी आभार मानले .या प्रसंगी संस्थेच्या संचालिका प्रा .डॉ . देशपांडे विद्या , प्रा. कल्याणकर राजश्री ,प्रा.डॉ . कचरे संगीता , प्रा .डॉ . मुंडे वर्षा , प्रा .डॉ . जोशी राजकुमार , प्रा .डॉ . अरूण चव्हाण , प्रा .डॉ . दिग्रसकर प्रवीण , प्रा .फुटके प्रवीण , प्रा . जावळे संदीप, प्रा . कोकाट सिद्धेश्वर , प्रा.डॉ. गोविंद कुलकर्णी, प्रा . श्रीकृष्ण राठोड, प्रा .डॉ. मनीषा रोकडे ,प्रा .डॉ . अर्धापुरे पूर्वा , प्रा .डॉ .शहाणे रंजना ,प्रा .डॉ . गुट्टे पंढरी , प्रा .डॉ . शिवनारायण वाघमारे यांची उपस्थिती होती . तसेच या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!