इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS::प्रतिक्स मेकअप स्टुडिओचा गुरुवारी पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार उदघाटन समारंभ

 प्रतिक्स मेकअप स्टुडिओचा गुरुवारी पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शानदार  उदघाटन समारंभ




परळी वैजनाथ 

       शहरात नव्यानेच सुरू होत असलेल्या हेअर, स्कीन आणि मेकअप अशा विविध सेवा एकाच छताखाली असलेल्या प्रतिक्स मेकअप स्टुडिओचे उद्या गुरुवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या शुभ हस्ते उदघाटन होणार आहे. या समारोहला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे मेकअप स्टुडिओचे संचालक प्रतिक ज्ञानोबा सुरवसे, सौ. प्रतिभा सुरवसे आणि नगरसेविका सौ. उमाताई समसेट्टी यांनी केले आहे. 

       उद्या गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता समसेट्टी निवास, प्रेमपन्ना नगर, आयसीआयसीआय बँकेच्या समोर हा उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. 

       शहराच्या सौंदर्य क्षेत्रात यामुळे मोठी भर पडणार आहे. प्रतिक्स मेकअप स्टुडिओचे संचालक प्रतिक सुरवसे यांनी तब्बल तीन वर्षे पुणे येथे मेकअप, स्कीन आणि विविध सौंदर्य शास्त्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. हेअरस्टाईल संबंधित अतिशय आधुनिक प्रशिक्षण हे मुंबईमध्ये सुमारे एक वर्ष प्रशिक्षण घेतले आहे. एवढेच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून प्रतिक सुरवसे हे त्यांच्या आईच्या ब्युटी पार्लरमध्ये चांगले काम करीत आहेत. अतिशय कमी वयात त्यांना याच क्षेत्रात काम करण्यासाठी बाहेर देशात संधी आली होती परंतु कोरोनामुळे अडचण आली. 

       आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा आपल्याच भागात उपयोग व्हावा या उद्देशाने प्रतिक सुरवसे यांनी परळी प्रतिक्स मेकअप स्टुडिओ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या क्षेत्रात पुरूषांनी उतरून काम करणे हे कौतुकास्पद आहे. प्रतिक्स मेकअप स्टुडिओमुळे शहराच्या सौंदर्य क्षेत्रात अतिशय मोलाची भर पडणार आहे. या उदघाटन सोहळ्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिक्स मेकअप स्टुडिओचे संचालक प्रतिक सुरवसे, सौ. प्रतिभा सुरवसे, नगरसेविका सौ. उमाताई समसेट्टी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या