पोस्ट्स

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम

इमेज
  इथे पावलोपावली आहेत वाटेत काटे, रडू नको मुली तू शिकून घे कराटे - प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात महिला व बालविकास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन मंगळवारी (ता.११) करण्यात आले होते. या शिबीरात विद्यार्थिनींना ज्युडो व कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबीरास विद्यार्थिनींचा प्रतिसाद मिळाला.                  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्ताने राज्यातील विद्यार्थिनींसाठी राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महिला व बालविकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील या अभियानाची सुरुवात येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व महिला व बालविकास विभाग परळीच्या वतीने मंगळवारी करण्यात आली. राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्

परळीत पुन्हा दिवाळीची तयारी!

इमेज
धनंजय मुंडेंचे गुरुवारी परळीत होणार स्वागत व सत्कार:मंत्री झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात होणार आगमन *कड्यापासून परळीपर्यंत होणार जोरदार स्वागत* *गहिनीनाथगडावर धनंजय मुंडे होणार नतमस्तक* परळीत पुन्हा दिवाळीची तयारी! *परळीत होणाऱ्या धनंजय मुंडेंच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष!* परळी वैद्यनाथ (दि. 11) - उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते बीड जिल्ह्यात येत्या गुरुवारी (तारीख 13) प्रथमच येत असून या निमित्ताने परळी वैद्यनाथ येथे सायंकाळी भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ शहरात पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणे अपेक्षित आहे! कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी (दि. 13) रोजी सकाळी मुंबई येथून निघून दुपारी 12 वा. आष्टी तालुक्यातील कडा येथे पोचतील, कड्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टी-पाटोदा-शिरूर कासार मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाल
इमेज
  भुजबळांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याची फोनवरुन धमकी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       मंत्री छगन भुजबळ   यांच्या पाठोपाठ शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील आणखी एका मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.  नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे   यांना  जीवे मारण्याची धमकी   आली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील संपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला होता. मला 50 लाख रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं दिली आहे. ,याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  मंत्री छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला. त्यापाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकी देण्यात आली आहे. काल (सोमवारी) मध्यरात्री 12 वाजता एका अज्ञात व्यक्तीनं लॅण्डलाईनवर फोन करुन धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मला पन्नास लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडे यांना जीवे मारिन, अशी धमती फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं दिली. धनंजय मुंडे यांच्या  परळी येथील संपर्क कार्यालयात असलेल्या
इमेज
  तेली युवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी युवानेते पवन संगमेश्वर फुटके यांची निवड परळी वैजनाथ दि.१० (प्रतिनिधी)             येथे तेली समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी अध्यक्ष वैजनाथ बेंडे यांनी पवन संगमेश्वर फुटके यांची नुतन तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. या निवडीबद्दल पवन फुटके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.                 येथील तेली समाजाची युवक संघटना आहे. या युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून वैजनाथ बेंडे यांनी गेले अनेक वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या कार्यकालात युवक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, धार्मिक, आरोग्यविषयक कार्य पारपडली. तसेच राज्य स्तरीय तेली समाज पालक परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, दरवर्षी श्री.शनी सिंगणापूर येथे खिचडी वाटप आदी कार्य हाती घेण्यात आली होती. वैयक्तिक कारणामुळे वैजनाथ बेंडे यांनी राजीनामा दिला होता. समाजाच्या वतीने रविवारी गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात वैजनाथ बेंडे यांनी युवानेते पवन फुटके यांची तेली युवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली आ
इमेज
  सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला नऊशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं बीड दि.१० (प्रतिनिधी)- जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सातत्याने कारवाया सुरु आहेत. सोमवारी (दि.१०) सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला नऊशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. विनोद गिरीधर मुनेश्वर (वय-३२) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. आईच्या नावावरील जमीन तक्रारदाराच्या नावावर करण्याबाबत गेवराईच्या न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे सह जिल्हा निबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क भरून पावती व हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी शासकीय फी ६०० रुपये व लाच म्हणून ९०० रुपयांची मागणी विनोद मुनेश्वर यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती. यावेळी जिल्हा सह निबंधक कार्यालयात सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विनोद मुनेश्वरला लाच घेताना पकडले.
इमेज
  आदर्श शिक्षक सौदागर कांदे यांचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे दगडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सौदागर आबाजीराव कांदे यांचा नुकताच मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. लातूर येथील दयानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. याअगोदर सौदागर कांदे यांना बीड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन तर कोल्हापूर येथील एका संस्थेने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. तालुक्यातील दगडवाडी येथील उपक्रमशिल व विद्यार्थीप्रिय शिक्षक सौदागर आबाजीराव कांदे यांचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. लातूर येथे रविवारी झालेल्या एका भव्य सोहळ्यात राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आ.अमित भैय्या देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मीणी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनात महाराज औसेकर, सहकार महर्षी व माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सौ.सुवर्णाताई देशमुख, सौ.गौरवीताई भोसले (देशमुख) शिक्षक
इमेज
  ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 'वृक्षरोपण व संवर्धन' कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आले रोप वाटप परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना..धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसा निमित्त नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे  यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या दि. ८ ते १५ जुलै शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम सप्ताहानिमित्त मिलिंद माध्यमिक विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते रोप वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. १५ जुलै पर्यंत चालणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम सप्ताहाच्या आज दुसर्‍या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाथ शिक्षण संस्थेचे समन्वयक अतुल दुबे, ह. भ. प. आचार्य अर्जुन महाराज शिंदे, जि.प.कन्या शाळेतील जेष्ठ सहशिक्षका सौ.कुलथे  तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.कदरकर सर, प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर, सौ.नाकाडे  मंचावर उपस्थित होते. जि.प.कन्या शाळेतील विद्यार्थीनींनी वृक्षरोपण व संवर्धन कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्या बद्दल मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते विविध पारजातींचे वृक्

बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा लढण्याची शिवसेनेची तयारी : किशोर पोतदार

इमेज
  बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा लढण्याची शिवसेनेची तयारी : किशोर पोतदार  व्यंकटेश शिंदे यांना जिल्हा प्रमुख करा परळी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची एकमुखी मागणी परळी वै (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आज परळी येथे शिवसेनेची बैठक संपन्न झाली यावेळी बोलताना किशोर पोतदार यांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभा लढण्याची आमची तय्यारी असल्याचे वक्तव्य केले तर परळी तालुक्यातील शिवसैनिकांनी व्यंकटेश शिंदे यांना जिल्हा प्रमुख करा अशी मागणी जोर लावून धरली.  परळी - माजलगाव - केज विधानसभेच्या जिल्हाप्रमुख पदाची जागा रिक्त होताच नवीन जिल्हा प्रमुख कोण असा प्रश्न असताना व्यंकटेश शिंदे यांचे नाव जोमाने पुढे आले असता जिल्यातील शिवसैनिकांमध्ये व्यंकटेश शिंदे यांनी जिल्हा प्रमुख व्हावं ही चर्चा खूप होताना दिसून आली. अनिल दादा जगताप यांना आमदार करण्यासाठी सर्व ताकत पणाला लावणार असा निश्चय ही जिल्यातील शिवसैनिकांनी केला या वेळी कृ उ बा उप सभापती शामभाऊ पडोळे, नितीन धांडे, परमेश्वर सातपुते, संजय महाद्वार, स
इमेज
  परळी मोंढा भागातील बेशिस्त वाहतुक व्यवस्था सुरळीत करावी शिवसेनेची मागणी परळी (प्रतिनिधी):- परळी शहरात व मोंढा विभागात वाहतूक कोंडी होत आहे.बेशिस्त वाहतुकीमुळे व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या परळीत दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. मोंढा परिसरात  ताबडतोड वाहतूक सुरळीत करण्यात यावी. या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने परळी शहर पोलीस स्टेशन यांना दि.10 जुलै 2023 रोजी देण्यात आले. शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,   परळी शहरात व मोंढा विभागात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे व त्यामुळे वाहतूक दळणवळणास अडथळा निर्माण होत आहे तसेच परळीत बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक पाचवे ज्योतिर्लिंग श्री.परळी वैजनाथ हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे यामुळे परळीत परराज्यातील तसेच परदेशातील भाविक रोज येत असतात त्यांना सुद्धा या वाहतूक कोंडीचा त्रास होतो तसेच परळीतील नागरिकांना पण याचा त्रास होतो. त्यामुळे शहरातील मुख्य रस्तावरील वाहतुक सुरळीत करण्यात यावी अशी मागणी परळी शहर पोलीस ठाण्याकडे
इमेज
  यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर  पुणे: यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात (Pune) होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार असल्याची माहिती आहे.  1 ऑगस्टला हा पुरस्कार सोहळा होणार असून या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखिल या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. दर वर्षी 1 ऑगस्टला पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.  यंदाचा पुरस्कार पीएम मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे.  ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.  स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं स्वरुप आहे. 1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो. कृषी, आरोग्य, अर्थ, सामाजिक आण
इमेज
  स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज समाज प्रबोधनकार पुरस्काराने सन्मानित परळी । प्रतिनिधी नांदूरशिंगोटे, नाशिक येथे वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे  संत साहित्याचे अभ्यासक तथा श्री सिध्दीविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष  डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांना समाज प्रबोधनकार पुरस्काराने गौरवण्यात  आले. डॉ. गुट्टे महाराजांच्या अध्यात्मिक आणि सामजिक कार्याची दखल घेत  त्यांना समाज प्रबोधनकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.  व्यासपिठावर  आमदार नरेंद्र दराडे, माजीआमदार गोविंद केंद्रे, महंत राधाताई सानप, माजी जि.प अध्यक्ष शीतल सांगळे, बंडूनाना भाबड, लिंबाशेठ नागरगोजे, राहुल जाधवर आदी उपस्थित होते.  डॉ. गुट्टे महाराज  यांचे अध्यात्मिक कार्य वयाच्या १२ व्या वर्षापासून सुरू झाले. प्रवचन, कीर्तन, भागवत, रामायणवर मार्गदर्शना बरोबरच राज्यातील विविध ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, विद्यापीठातर्फे  त्यांना अनेक विषयांवर  व्याख्यानासाठी आमांत्रित करण्यात येते. नाशिक आणि उज्जन येथे कुंभमेळ्यात  सिध्दीविनायक मानव कल्याण मिशनतर्फे स्वतंत्र आखाडा होता. मिशनच्या माध्यमातून  महाराष्ट्रात विवि

बौध्दजन संघर्ष समितीची मागणी

इमेज
  चंद्रशेखर रावण यांना वाय प्लस सुरक्षा प्रदान करा; कॉन्ट्रॅक्टर बंडू मुंडे हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करा : बौध्दजन  संघर्ष समितीची मागणी परळी प्रतिनिधी.   भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर उत्तर प्रदेश मध्ये प्राण घातक हल्ला झाला. त्यांना केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करावी तसेच कनेरवाडी येथील कॉन्ट्रॅक्टर आत्माराम उर्फ बंडू मुंडे यांच्या हत्येची सीआयडी चौकशी करून आरोपींना अटक करण्याची मागणी बौद्धजन संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे आज करण्यात आली. परळी उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत हे निवेदन देण्यात आले.     याबाबत बौद्धजन संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद रावण यांचे जगातील शंभर उदयनमुख नेत्यांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. अशा महत्त्वपूर्ण नेत्यावर उत्तर प्रदेश मध्ये हल्ला झाला. त्यामुळे केंद्र सरकारने या हल्ल्यातील हल्लेखोरांना अटक करावी तसेच चंद्रशेखर रावण यांना कायमस्वरूपी वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान करावी.     याबरोबरच कनेरवाडी येथ

तेली समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा

इमेज
  तेली समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा  आई,वडीलांचा विश्वास कधी तोडू नका- प्राचार्य अतुल दुबे भारतीय संस्कृतीचे पालन करा- अँड अरुण पाठक परळी वैजनाथ दि.०९ (प्रतिनिधी)          येथील तेली समाजाच्या वतीने १० व १२ तसेच समाजात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवारी (दि.०९) करण्यात आले. कार्यक्रमास समाजबांधव,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.            येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री. शनी मंदिराच्या सभागृहात श्री.शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, श्री शनैश्वर प्रतिष्ठान, तेली युवक संघटना, शनैश्वर महिला मंडळ, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी १० व १२ तसेच समाजात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवारी दुपारी ११ वाजता करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य अतुल दुबे, अँड अरुण पाठक, माजी नगरसेविका उमा समशेट्टी, विठ्ठल अप्पा चौधरी, वसंत फुटके, महाराष्ट्र प्रांतिकचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, श्री.शनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रघुनाथ भाग्यवंत, व्यवस्थापक चंद
इमेज
 'एक सही संतापाची’ आंदोलनाला परळी वैजनाथमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून लोकांमध्ये धुमसत असलेल्या संतापाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या ‘एक सही संतापाची’ आंदोलनाला परळी वैजनाथ येथील नागरिकांकडून रवीवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसेने उभारलेल्या फलकावर सह्या करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करीत राजकारण्यांचा निषेध केला.  राज्यात गेल्या काही महिन्यांपासून फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. लोकांनी विश्वासाने निवडून दिलेले आमदार रातोरात पक्ष बदलू लागले आहेत. त्यामुळे विश्वास तरी कोणावर ठेवायचा अशी स्थिती मतदारांची झाली आहे. मनसेच्या या आगळयावेगळय़ा आंदोलनास राज्यभरात लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परळी वैजनाथ येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात मोठे फलक उभारण्यात आले होते. मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली ता.उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड, गणेश राठोड, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, ऋषिकेश बारगजे,हानुमान सातपुते,राहुल गायकवाड,आकाश माने,श
इमेज
  सुषमा अंधारेंच्या पाठबळाने कला केंद्रांमध्ये सुरू आहेत गैरप्रकार, विभक्त पती वाघमारेंचा आरोप बीड :  ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यभरातील कला केंद्र चालक सुषमा अंधारे यांच्या संपर्कात आहेत. पोलीस कारवाई होऊ नये, यासाठी मदत करण्याची गळ घालतात. या ठिकाणी चालणाऱ्या गैर प्रकारांना सुषमा अंधारे यांचे पाठबळ आहे. आणि या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी केली आहे. केज येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या भागीदारीत चालवल्या जाणाऱ्या कला केंद्रावर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी धाड टाकली होती. या ठिकाणी अल्पवयीन मुलींचे शोषण केले जात असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर वैजनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी २५ लाख रुपये घेतले. तसेच कला केंद्र तू चालव मी आहे. पोलीस कारवाई होऊ देत नाही, असं म्हणत सुषमा अंधारेंनी पाठबळही दिले. यामुळेच रत्नाकर शिंदे हे बळीचा बकरा बनले, असा गंभीर आरोप

रक्तदान शिबीर व गुणवंतांचा सत्कार

इमेज
  सावता महाराज समाधी सोहळ्यास दि.10 जुलै पासुन प्रारंभ  परळी (प्रतिनिधी)  संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळीतील संत सावतामाळी मंदिरात दि.10 ते 17 जुलै या कालावधीत समाधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन यानिमीत्त नामवंत किर्तनकारांची किर्तने,रक्तदान शिबीर,गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  सोमवार दि.10 जुलै पासुन सुरु होत असलेल्या या सप्तासात पहाटे 4 ते 6 यावेळेत काकडा,सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वर पारायण,सकाळी 11 ते 1 गाथा भजन,दुपारी 2 ते 4 सावता महाराज चरित्र,सायंकाळी 6 ते 7 धुपारती,रात्री 9 ते 11 हरिकीर्तन होणार असुन यामध्ये ह.भ.प. क्षीरसागर महाराज उखळीकर,ह.भ.प.कृष्णाकांत महाराज सताळकर,ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर,ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर,ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवे,ह.भ.प.अर्जुन महाराज लाड,ह.भ.प.गोवर्धन महाराज यांचे तर दि.17 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प.विठ्ठल महाराज उखळीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.शनिवार दि.15 रोजी नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त ज्ञानेश्वर महाराज उखळीकर यांचे किर्तन होणार आहे.दि.16 जुलै रोजी दुपारी 12 वाज
इमेज
 जैन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा व सुविधा यांना प्राधान्य -डॉ. कुणाल  जैन ............................................. परळीवैजनाथ, अनंत कुलकर्णी परळी येथील जैन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील व शहरातील रुग्णांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा, सुविधा,अचूक रोगनिदान व माफक शुल्क आकारण्याची पद्धत यामुळे रुग्णांची पहिली पसंती मिळत आहे. काही दिवसापूर्वी परळी तालुक्यातील एका तेरा वर्षीय मुलाच्या अंडाशयामध्ये रात्री अचानक अकरा वाजता दुखत असल्यामुळे त्याने स्थानिक च्या डॉक्टर कडून वेदनाशामक गोळ्या घेतल्या होत्या. परंतु दुखणे काही थांबले नसल्यामुळे त्याला पहाटे साडेतीन वाजता परळी वैजनाथ येथील जैन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी ताबडतोब त्याची तपासणी डॉ कुणाल जैन यांनी केली. त्याच्या अंडाशयाला पीळ बसल्यामुळे त्याचे ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल असे सांगितल्यामुळे पहाटे चार वाजता त्याच्या अंडाशयाचे ऑपरेशन करण्यात आले. त्याचे अंडाशय वाचविण्यामध्ये डॉ कुणाल जैन यांना यश आले व पेशंट च्या वेदना कमी करण्यामध्ये ते यशस्वी

निज श्रावणातच करावे श्रावण सोमवारचे उपवास

इमेज
तब्बल १९ वर्षांनी शुभसंयोग: यंदा श्रावण तब्बल २ महिन्यांचा ;  मानले जाते विशेष धार्मिक महत्त्व परळी वैजनाथ.......             धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना हा भक्तीसाठी अनुकूल व समर्पित समजला जातो. यंदा हा पवित्र पर्वकाळ तब्बल २ महिन्यांचा असणार आहे.तब्बल १९ वर्षांनी असा शुभसंयोग येत आहे.यंदा अधिक मास असल्याने श्रावण महिना तब्बल २ महिन्याचा राहणार आहे. यावर्षी ८ श्रावणी सोमवार येत आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून  हा विशेष पर्वकाळ असल्याचे मानले जात आहे.                श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. या पवित्र महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते. तर अधिक महिणा हा भगवान श्रीविष्णूंना समर्पित आहे. हे दोन्हीही शुभसंयोग यावर्षी श्रावण महिन्यातच आले आहेत. अधिक श्रावण आणि निज श्रावण असे दोन महिने श्रावण पर्वकाळ असणार आहे.यावेळी श्रावण महिना जवळपास २ महिने चालणार आहे. कारण यंदा अधिक मास असल्याने श्रावण महिना तब्बल २ महिन्याचा राहील.              हिंदू पंचांगानुसार, यावेळी श्रावण महिना सुमारे २ महिन्यांचा असणार आहे. श्रावण महिना १८ जुलै २०२३ पासून सुरू होईल आणि १५ सप्टेंबर पर्यंत चालेल. म

शेतकऱ्यांना प्रश्नी किसान सभेचा जागर

इमेज
 ■शेतकऱ्यांना प्रश्नी किसान सभेचा जागर ●विविध मागण्याबाबत 12 रोजी आंदोलन:कॉ.एड.अजय बुरांडे बीड / प्रतिनिधी राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असताना संकटात असलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा समोरे जाताना परत अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमिटी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात जिल्हा किसान सभेच्या वतीने बुधवार दि 12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन होणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. एड.अजय बुरांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पीक विमा प्रश्न,अतिवृष्टी अनुदान,शेत मालास हमीभाव यासह अनेक प्रश्नावर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची कार्यवाही करावी यासाठी अखिल भारतीय किसान सभा वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न कायम जागच्या जागीच असल्या कारणाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तात्काळ उकल होऊन त्यांना दिलासा मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान सभा बुधवार दि १२ रोजी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करणार आहोत. किसान सभेकडून करण्यात ये
इमेज
  कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या  गेवराई....  गेवराई शहरातील शेतकरी गणेश जनार्धन मोटे ( वय  46 ) यांचा मृतदेह शनिवार ता. ८ रोजी शहरातील एका विहिरीत आढळून आला. त्यांनी बॅन्केच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असून, ते शुक्रवारी ता.7 रोजी पहाटे घरातून निघून गेले होते.    शनिवार ता. ८ रोजी दुपारी एक वाजता गणेश मोटे यांचा मृतदेह गेवराई शहरा लगत असलेल्या उमेश येलदाळे यांच्या विहिरीत आढळून आला. घटनास्थळाचा पोलीसांनी पंचनामा करून, त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी सायंकाळी सहा वाजता चिंतेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
इमेज
  परळीच्या गुरुजींचा होणार सन्मान:सौदागर कांदे यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळख असलेले सौदागर कांदे यांना महाराष्ट्र राज्य मानव विकास प्रतिष्ठानचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ. प.गहिनीनाथ महाराज औसेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे वैशालीताई देशमुख व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवार, दि.०९ जुलै रोजी दयानंद सभागृहात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सौदागर कांदे हे जिल्हा परिषद दगडवाडी येथे कार्यरत आहेत. एक उपक्रमशिल व अभ्यासू अशी त्यांची ओळख आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, सातत्याने विद्यार्थी विकासासाठी धडपड करणारे उपक्रमशील शिक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. ज्ञानरचनावादातून विद्यार्थ्यांना ते सतत मार्गदर्शन करतात. स्वखर्चातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वाचनालय निर्माण केले आहे. Think sharp फाऊंडेशन कडून E- learning साठी टिव्ही व अभ्यासक्रम उपलब्ध कर
इमेज
  गावठी अग्निशस्त्रासह एकाला पोलिसांनी पकडले परळी वैजनाथ, प्रतिनिधी........         पोलीस स्टेशन संभाजीनगर हद्दीत अवैधरित्या गावठी अग्निशस्त्रासह (पिस्तूल) एकाला पोलिसांनी पकडले आहे.         दि.07/07/2023 रोजी 2.15 वाजता आरोपी चरनसिंग मंगलसिंग बावरी वय 42 वर्षे रा. आंबेडकरनगर परळी वै. हा विनापरवाना बेकायदेशिरीत्या गावठी कट्टा (अग्निशस्त्र ) काडतुससह त्याचे राहते घरासमोर त्याचे ताब्यात बाळगताना मिळुण आला. अंदाजे किंमत 15000 व एक जीवंत काडतुस अंदाजे किंमत 1000 असा एकूण 16000 रु.ऐवज जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास स.फौ. भताने  यांच्याकडे देण्यात आला आहे.

माझं राजकीय करिअर संपवण्याचा डाव कुणाचा ?

इमेज
  माझं राजकीय करिअर संपवण्याचा डाव कुणाचा ? पंकजाताई मुंडे यांनी षडयंत्र रचणाऱ्यांना फटकारले लाखो लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा ; खोटया बातम्यांमुळे लोकं संभ्रमात मला कांही करायचं असेल तर "डंके की चोट पे" करेन मुंबई ।दिनांक ०७। मी सांगलीतील मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली अशा बातम्या येत आहेत. मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतलेली नाही. मी त्यांना वैयक्तिक ओळखतही नाही. माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा?” असा सवाल करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचणारांना चांगलेच फटकारले. लाखो लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, खोटया बातम्यांमुळे लोक संभ्रमात आहेत,  खोटया बातम्या देणाऱ्या वाहिनीच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे आज त्यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.   मागील दोन-तीन दिवसांपासून  सुरू असलेल्या चर्चांवर  पंकजाताई मुंडे यांनी आपली भुमिका स्पष्टपणे  मांडली. त्या म्हणाल्या, “मी आज पत्रकार परिषद बोलवली आहे, कारण मला शेकडो कॉल येत आहेत. २०१९ मध्ये मी भाजपची उमेदवार होते. माझा पराभव झाल

मंत्री झालेल्या भावाचे बहिणीने केले औक्षण

इमेज
  मंत्री झालेल्या आपल्या भावाचे बहिणीने केले औक्षण:धनंजय मुंडे यांचे बहीण पंकजा मुंडे कडून कौटुंबिक स्वागत परळी वैजनाथ, प्रतिनिधी         गेल्या अनेक वर्षात राजकारणात एकमेकांचे विरोधक म्हणून काम केलेल्या मुंडे बहीण भावात गेल्या काही महिन्यांपासून दुरावा कमी झाला व हळूहळू त्यांच्यातील राजकीय दुरावा कमी होत गेला आहे. बहीण भावाचे हे नाते आबाधित असल्याचे वेळोवेळी दोघांनीही स्पष्ट केलेलेच आहे. मात्र आता या नात्यात दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल अशी स्थिती आली आहे. अजित दादा यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या अनुषंगानेच भाजपा राष्ट्रीय सचिव असलेल्या धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी मंत्री झालेल्या आपल्या या भावाचे अतिशय आत्मेतेने कौटुंबिक स्वागत केले असून आज पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे  औक्षण करत व पेढा भरवत अभिनंदन केले. त्याचप्रमाणे पंकजाताई भाजपाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतात या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याबाबतचे फोटो धनंजय मुंडे यांनी ट्विट केले अस

आनंदसोहळा:गावाच्या सुपुत्राला सन्मान

इमेज
  फौजदार बनलेल्या युवकाची गाढे पिंपळगावात बैलगाडीतून जंगी मिरवणूक  परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)          तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा नुकत्याच लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) झाला असून आज गावकऱ्यांनी ढोलताशांच्या गजरात बैलगाडीतून मिरवणूक काढत नागरी सत्कार केला.           गाढे पिंपळगाव हे चार हजार लोकसवस्तीचे परळी पासून १८ किलोमीटरवर असणारे व मुख्य व्यवसाय शेती असणारे गाव आहे. या गावातील अल्पभूधारक शेतकरी अच्युत राडकर यांची तीन एकर जमीन आहे. त्यांचे संपूर्ण घर शेती व्यवसायावर अवलंबून आहे. अच्युत राडकर हे अल्पशिक्षित असून त्यांच्या पत्नी शारदा ही अल्पशिक्षित आहेत. असे असताना शिक्षणाचे महत्त्व समजून घेऊन अच्युत राडकर यांनी स्वतः घरच्या परिस्थितीत मुळे शिक्षण घेता आले नाही म्हणून आपल्या मुलांना शिक्षण द्यायचे हा ध्यास मनाशी बाळगून त्यांना असलेल्या दोन्ही मुलांना पोटाला चिमटा देत तर कधी उसणवारी करत दोन्ही मुलांना शिकवले. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा सचिन हा साँप्टवेअर इंजिनिअर झाला आहे. याचाच पावलावर पाऊल ठेवत तीन वर्षांनी लहान असलेला दत्तात