सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला नऊशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं



बीड दि.१० (प्रतिनिधी)- जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सातत्याने कारवाया सुरु आहेत. सोमवारी (दि.१०) सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला नऊशे रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.


विनोद गिरीधर मुनेश्वर (वय-३२) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. आईच्या नावावरील जमीन तक्रारदाराच्या नावावर करण्याबाबत गेवराईच्या न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे सह जिल्हा निबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क भरून पावती व हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी शासकीय फी ६०० रुपये व लाच म्हणून ९०० रुपयांची मागणी विनोद मुनेश्वर यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती. यावेळी जिल्हा सह निबंधक कार्यालयात सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विनोद मुनेश्वरला लाच घेताना पकडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !