तेली युवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी युवानेते पवन संगमेश्वर फुटके यांची निवड




परळी वैजनाथ दि.१० (प्रतिनिधी)

            येथे तेली समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी अध्यक्ष वैजनाथ बेंडे यांनी पवन संगमेश्वर फुटके यांची नुतन तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. या निवडीबद्दल पवन फुटके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

                येथील तेली समाजाची युवक संघटना आहे. या युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून वैजनाथ बेंडे यांनी गेले अनेक वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या कार्यकालात युवक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, धार्मिक, आरोग्यविषयक कार्य पारपडली. तसेच राज्य स्तरीय तेली समाज पालक परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, दरवर्षी श्री.शनी सिंगणापूर येथे खिचडी वाटप आदी कार्य हाती घेण्यात आली होती. वैयक्तिक कारणामुळे वैजनाथ बेंडे यांनी राजीनामा दिला होता. समाजाच्या वतीने रविवारी गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात वैजनाथ बेंडे यांनी युवानेते पवन फुटके यांची तेली युवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. पवन फुटके यांनी तेली समाजात पहिल्यांदा महिलांसाठी दांडिया महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले होते. तसेच अनेक सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होतात. यामुळे पवन फुटके यांना युवक संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. यानिवडीबदल त्यांचे समाजाच्या वतीने व मित्रमंडळाच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. पवन फुटके यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !