मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

परळीत पुन्हा दिवाळीची तयारी!

धनंजय मुंडेंचे गुरुवारी परळीत होणार स्वागत व सत्कार:मंत्री झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात होणार आगमन




*कड्यापासून परळीपर्यंत होणार जोरदार स्वागत*


*गहिनीनाथगडावर धनंजय मुंडे होणार नतमस्तक*


परळीत पुन्हा दिवाळीची तयारी!


*परळीत होणाऱ्या धनंजय मुंडेंच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष!*


परळी वैद्यनाथ (दि. 11) - उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते बीड जिल्ह्यात येत्या गुरुवारी (तारीख 13) प्रथमच येत असून या निमित्ताने परळी वैद्यनाथ येथे सायंकाळी भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ शहरात पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणे अपेक्षित आहे!


कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी (दि. 13) रोजी सकाळी मुंबई येथून निघून दुपारी 12 वा. आष्टी तालुक्यातील कडा येथे पोचतील, कड्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टी-पाटोदा-शिरूर कासार मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, युव आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह (बाळा) बांगर यांच्या पुढाकारातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या स्वागत-सत्काराची जोरदार तयारी केलेली पाहायला मिळत आहे.


धनंजय मुंडे यांच्या आगमनानंतर आष्टी मतदारसंघाच्या वतीने आ.बाळासाहेब काका आजबे यांच्यासह समर्थकांच्या वतीने कडा, आष्टी येथे जोरदार स्वागत करण्यात येईल, त्यानंतर धनंजय मुंडे हे त्यांचे आराध्य स्थळ असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ यांच्या समाधीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. 


त्यानंतर कुसळंब मार्गे पाटोदा येथे आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजहसिंह बाळा बांगर यांनी धनंजय मुंडे यांचे पाटोदा शहरासह विविध 11 ठिकाणी भव्य स्वागत आयोजित केले आहे. 


पुढे मांजरसुम्बा येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बप्पा शिंदे यांचे स्वागत झाल्यानंत बीड शहरात आगमन होईल, बीड येथे सभापती बळीराम अप्पा गवते यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व अन्य विविध स्थळी स्वागत-सत्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.


बीड नंतर वडवणी येथे ही जोरदार स्वागत होईल, तसेच तेलगाव येथे ज्येष्ठ नेते आ.प्रकाश दादा सोळंके यांची सदिच्छा भेट व सत्कार घेऊन, धारूर, केज अंबाजोगाई या मार्गाने धनंजय मुंडे हे परळीत दाखल होतील. 


सायंकाळी 6 वा. नाथ रोडवरील यात्रा मैदानात भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहतील. 


*परळीत पुन्हा दिवाळी!*


दरम्यान नेहमीप्रमाणे किंवा यावेळी त्यापेक्षाही अधिक उत्साहाने ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या आगमनानंतर स्वागताची व जाहीर सभेची जय्यत तयारी परळीत दिसून येत असून परळीकर आपल्या लाडक्या नेत्याच्या मंत्री पदाचा जल्लोष पुन्हा एकदा दिवाळी साजरी करून करतील, असे चित्र आहे. 


शहरात ठिकठिकाणी स्वागताचे होर्डिंग्ज लागले असून जत्रा मैदानात भव्य वॉटर प्रूफ मंडप उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. एकूणच परळी मतदारसंघासह सबंध बीड बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्या आगमन व स्वागताचा उत्साह शिगेला जाताना पाहायला मिळत आहे.


 दरम्यान राज्यात निर्माण झालेली एकंदरीत राजकीय परिस्थिती, राज्यातील सत्तेत सामील होण्याचा निर्णय यानंतर प्रथमच मंत्री होऊन स्वतःच्या मतदारसंघात आल्यानंतर धनंजय मुंडे आपल्या भाषणात काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....