परळीच्या गुरुजींचा होणार सन्मान:सौदागर कांदे यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार


परळी (प्रतिनिधी)

परळी तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळख असलेले सौदागर कांदे यांना महाराष्ट्र राज्य मानव विकास प्रतिष्ठानचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.


महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ. प.गहिनीनाथ महाराज औसेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे वैशालीताई देशमुख व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवार, दि.०९ जुलै रोजी दयानंद सभागृहात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.


सौदागर कांदे हे जिल्हा परिषद दगडवाडी येथे कार्यरत आहेत. एक उपक्रमशिल व अभ्यासू अशी त्यांची ओळख आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, सातत्याने विद्यार्थी विकासासाठी धडपड करणारे उपक्रमशील शिक्षक म्हणूनही त्यांची ओळख आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. ज्ञानरचनावादातून विद्यार्थ्यांना ते सतत मार्गदर्शन करतात. स्वखर्चातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वाचनालय निर्माण केले आहे. Think sharp फाऊंडेशन कडून E- learning साठी टिव्ही व अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. यंदाचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना घोषित करण्यात आला असून, रविवारी लातूर येथे त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार बहाल करण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार