माझं राजकीय करिअर संपवण्याचा डाव कुणाचा ?

 माझं राजकीय करिअर संपवण्याचा डाव कुणाचा ?


पंकजाताई मुंडे यांनी षडयंत्र रचणाऱ्यांना फटकारले


लाखो लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा ; खोटया बातम्यांमुळे लोकं संभ्रमात


मला कांही करायचं असेल तर "डंके की चोट पे" करेन


मुंबई ।दिनांक ०७।

मी सांगलीतील मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली अशा बातम्या येत आहेत. मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतलेली नाही. मी त्यांना वैयक्तिक ओळखतही नाही. माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा?” असा सवाल करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचणारांना चांगलेच फटकारले. लाखो लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, खोटया बातम्यांमुळे लोक संभ्रमात आहेत,  खोटया बातम्या देणाऱ्या वाहिनीच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे आज त्यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.


  मागील दोन-तीन दिवसांपासून  सुरू असलेल्या चर्चांवर  पंकजाताई मुंडे यांनी आपली भुमिका स्पष्टपणे  मांडली. त्या म्हणाल्या, “मी आज पत्रकार परिषद बोलवली आहे, कारण मला शेकडो कॉल येत आहेत. २०१९ मध्ये मी भाजपची उमेदवार होते. माझा पराभव झाला. त्यानंतर गेले चार वर्ष मी नाराज आहे. मी पक्ष सोडणार, अशा चर्चा सुरू झाल्या. मला स्वतःला सिद्ध करायच नाहीय. अनेक पक्षाचे नेते देखील बोलत होते की, पंकजा मुंडे आल्या तर त्यांना पक्षात स्थान देऊ. मी सर्व हे सहजतेने घेतलं”.


*माझं करिअर संपवण्याचा डाव कुणाचा?*

------

पण आता मी सांगलीतील मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली अशा बातम्या येत आहेत. मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतलेली नाही. माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा?” असा सवाल पंकजाताई मुंडे यांनी केला. तुम्ही प्रश्न चिन्ह लावून बातम्या देता? पण त्यामागची सत्यता तपासली पाहिजे. मी गेली २० वर्षे राजकारणात काम करत आहे. चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत. पंकजा मुंडे पात्र की अपात्र? हे पक्ष ठरवेल, मी कसं सांगू. पाठित खंजीर खुपसण्याचं रक्त माझं नाही. ज्या चॅनलने काँग्रेस नेत्यांची भेट घेतली ही बातमी दिली. त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार. त्यांच्याकडे पुरावे मागणार आहे?” असं त्या म्हणाल्या.


*मी ईश्वर साक्ष आज शपथ घेते की…..*

-----------

माझ्यावर अनेक आरोप झाले. मला पराभव पत्करावे लागले. मी ईश्वर साक्ष आज शपथ घेते की, मी कोणत्याही नेत्याला, कोणत्याही पक्षाला माझ्या पक्ष प्रवेशासाठी कधीही भेटले नाही. मी माझ्या आयुष्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले सुध्दा नाही” असं पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं. माझ्या भाषणाचे तुकडे काढून अर्थ लावले जातात. मला विधान परिषदेला दोन्ही वेळा फॉर्म भरायला सांगितला. पण ऐनवेळी सांगितलं गेलं की फॉर्म भरायचा नाही, मी काही बोलले नाहीं कारण तो पक्षाचा आदेश आहे” असं त्यांनी  सांगितलं.


*मी कुठलाही निर्णय 'डंके की चोट पर' करेन*

---------------

भाजपाचा विचार माझ्या रक्तात आहे. पक्ष हा सगळ्यात महत्वाचा आहे माझ्यासाठी.अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. मी मुद्द्यावर बोलते. मला काही करायचं असेल तर मी 'डंके की चोट पे करेन' असंही पंकजाताई मुंडे म्हणाल्या. 

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !