आनंदसोहळा:गावाच्या सुपुत्राला सन्मान

 फौजदार बनलेल्या युवकाची गाढे पिंपळगावात बैलगाडीतून जंगी मिरवणूक 



परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)

         तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा नुकत्याच लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) झाला असून आज गावकऱ्यांनी ढोलताशांच्या गजरात बैलगाडीतून मिरवणूक काढत नागरी सत्कार केला.

          गाढे पिंपळगाव हे चार हजार लोकसवस्तीचे परळी पासून १८ किलोमीटरवर असणारे व मुख्य व्यवसाय शेती असणारे गाव आहे. या गावातील अल्पभूधारक शेतकरी अच्युत राडकर यांची तीन एकर जमीन आहे. त्यांचे संपूर्ण घर शेती व्यवसायावर अवलंबून आहे. अच्युत राडकर हे अल्पशिक्षित असून त्यांच्या पत्नी शारदा ही अल्पशिक्षित आहेत. असे असताना शिक्षणाचे महत्त्व समजून घेऊन अच्युत राडकर यांनी स्वतः घरच्या परिस्थितीत मुळे शिक्षण घेता आले नाही म्हणून आपल्या मुलांना शिक्षण द्यायचे हा ध्यास मनाशी बाळगून त्यांना असलेल्या दोन्ही मुलांना पोटाला चिमटा देत तर कधी उसणवारी करत दोन्ही मुलांना शिकवले. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा सचिन हा साँप्टवेअर इंजिनिअर झाला आहे. याचाच पावलावर पाऊल ठेवत तीन वर्षांनी लहान असलेला दत्तात्रय उर्फ विशाल यांनेही आपली शैक्षणिक वाटचाल गावातून सुरू केली. १ ते ४ चे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण गावातील विवेकानंद विद्यालयात व ११ व १२ न्यु हायस्कूल सिरसाळा तर ग्रँजवेशन परळी शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले. ग्रँजवेशन सुरू असताना लातूर येथे खाजगी क्लासेस व अभ्यासला सुरुवात केली. ग्रँजवेशन पुर्ण होताच राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्यास सुरुवात केली. २०२० मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी असलेली परिक्षा दिली. यात तो प्री,मेन्स व ग्राउंड पुर्ण केले. पण कोरोनामुळे या परिक्षेचा निकाल लागला नाही. तो आता लागला यात खुल्या गटातून त्याची पोलीस उपनिरीक्षक (फौजदार) म्हणून निवड झाली. विशाल ने अत्यंत कठीण, मेहनतीने व गरीबीतून आपले शिक्षण पूर्ण करत या यशाला गवसणी घातली आहे. आपल्या शेतकरी बापाच्या कष्टाचे चीज केले आहे. यानंतर दोन वेळा परिक्षा झाली दोन्ही परिक्षेत तो प्रिलीयम पास झाला आहे. तर २०२१ च्या परिक्षेत मेन्ससह ग्राऊंड पुर्ण केले. तर २०२२ च्याही परिक्षेत प्रिलीयम पास झाला. तसेच मंत्रालयीन क्लार्कच्या परिक्षेत व औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील सुरक्षा विभागातील परिक्षाही पास झाला आहे. एकाचवेळी अनेक पोष्ट त्याला मिळणार आहेत. या यशाबद्दल गाढे पिंपळगाव येथील गावकऱ्यांच्या वतीने गुरुवारी (ता.०६) नागरी सत्कार आयोजित केला होता. गुरुवारी सकाळी विशालची गावाच्या वेशीवरुन बैलगाडीतून ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर ग्रामदैवत असलेल्या श्री.पापदंडेश्वर मंदिरात गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावात विविध पदावर काही युवक कार्यरत आहेत त्यांचीही यावेळी उपस्थिती होती.


-------------------------------------------------------





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !