भुजबळांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याची फोनवरुन धमकी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
      मंत्री छगन भुजबळ  यांच्या पाठोपाठ शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील आणखी एका मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे  यांना जीवे मारण्याची धमकी  आली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील संपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला होता. मला 50 लाख रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं दिली आहे. ,याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


मंत्री छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला. त्यापाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकी देण्यात आली आहे. काल (सोमवारी) मध्यरात्री 12 वाजता एका अज्ञात व्यक्तीनं लॅण्डलाईनवर फोन करुन धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मला पन्नास लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडे यांना जीवे मारिन, अशी धमती फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं दिली. धनंजय मुंडे यांच्या  परळी येथील संपर्क कार्यालयात असलेल्या लँडलाईनवर धमकीचा फोन आला होता. या प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, तपास सुरू केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !