अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

 आदर्श शिक्षक सौदागर कांदे यांचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान


परळी (प्रतिनिधी)

परळी तालुक्यातील मौजे दगडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सौदागर आबाजीराव कांदे यांचा नुकताच मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. लातूर येथील दयानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. याअगोदर सौदागर कांदे यांना बीड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन तर कोल्हापूर येथील एका संस्थेने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

तालुक्यातील दगडवाडी येथील उपक्रमशिल व विद्यार्थीप्रिय शिक्षक सौदागर आबाजीराव कांदे यांचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. लातूर येथे रविवारी झालेल्या एका भव्य सोहळ्यात राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आ.अमित भैय्या देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मीणी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनात महाराज औसेकर, सहकार महर्षी व माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सौ.सुवर्णाताई देशमुख, सौ.गौरवीताई भोसले (देशमुख) शिक्षक आमदार विक्रम काळे, मानव विकास संस्थेचे वसंतराव घोगरे पाटील, सरोज घोगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सौदागर कांदे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या