अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

 ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 'वृक्षरोपण व संवर्धन' कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आले रोप वाटप


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना..धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसा निमित्त नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे  यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या दि. ८ ते १५ जुलै शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम सप्ताहानिमित्त मिलिंद माध्यमिक विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते रोप वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.


१५ जुलै पर्यंत चालणाऱ्या विविध सांस्कृतिक,सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम सप्ताहाच्या आज दुसर्‍या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाथ शिक्षण संस्थेचे समन्वयक अतुल दुबे, ह. भ. प. आचार्य अर्जुन महाराज शिंदे, जि.प.कन्या शाळेतील जेष्ठ सहशिक्षका सौ.कुलथे  तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.कदरकर सर, प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक श्री.धायगुडे सर, सौ.नाकाडे  मंचावर उपस्थित होते.


जि.प.कन्या शाळेतील विद्यार्थीनींनी वृक्षरोपण व संवर्धन कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्या बद्दल मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते विविध पारजातींचे वृक्षरोप सदरील विद्यार्थीनींस भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे ह.भ.प.शिंदे महाराज यांचा सत्कार नाथ शिक्षण संस्थेचे समन्वयक श्री.अतुल दुबेसर यांच्या हस्ते शाल व पिंपळाचे वृक्षरोप देऊन करण्यात आला. सौ. कुलथे मॅडम यांचा सत्कार जेष्ठ सहशिक्षिका सौ.कोम्मावार मॅडम यांनी केला. मंचावर उपस्थित जेष्ठ सहशिक्षिका सौ.नाकाडे मॅडम यांचा सत्कार सौ.भोसले मॅडम यांनी केला. 


 नाथ शिक्षण संस्थेचे समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अतुल दुबे सर व ह.भ.प.शिंदे महाराज यांनी विद्यार्थ्यांस झाडांचे महत्व पटवून दिले व त्याच बरोबर विद्यार्थ्यांस वृक्षरोपण करून ते संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शक सुचना केल्या.

 

कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.नितीन व्हावळेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक श्री.धायगुडे सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या