अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम

 इथे पावलोपावली आहेत वाटेत काटे, रडू नको मुली तू शिकून घे कराटे - प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे




लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात महिला व बालविकास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न



परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)

          येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन मंगळवारी (ता.११) करण्यात आले होते. या शिबीरात विद्यार्थिनींना ज्युडो व कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबीरास विद्यार्थिनींचा प्रतिसाद मिळाला.

                 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्ताने राज्यातील विद्यार्थिनींसाठी राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महिला व बालविकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील या अभियानाची सुरुवात येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व महिला व बालविकास विभाग परळीच्या वतीने मंगळवारी करण्यात आली. राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, शिबीराचे उद्घाटन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक त्रिंबक कांबळे, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख,महिला व बालविकास विभाग तालुका अधिकारी मन्सुरी अन्सार निसार अहमद, समुपदेशीका सुनिता वरंगळकर, सखी केद्राच्या शांता खांडेकर, दिनेश आंधळे, प्रशिक्षक परमेश्वर होळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन संपन्न झाल्यानंतर मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी सांगितले की, विद्यार्थिनींसाठी आज स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे. तर समुपदेशीका सुनिता वरंगळकर  यांनी महिला व मुलीच्या संदर्भातील कायदे व समुपदेशन किती आवश्यक आहे. राजमाता जिजाऊ यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कार केले त्याच पध्दतीने आज मुले व मुलींवर संस्कारांची गरज आहे. तर, तालुका महीला व बाल विकास अधिकारी मन्सुरी अन्सार निसार अहमद  यांनी महीला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची व बाल विवाह ची सविस्तर माहिती दिली,प्राचार्या डॉ देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी आवश्यक गोष्टी सांगितल्या.  शांता खांडेकर यानंतर परमेश्वर होळकर यांनी विद्यार्थिनींना कराटे व ज्यूदोच्या माध्यमातून स्वसंरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ प्रविण दिग्रसकर , सुत्रसंचालन प्रा प्रविण फुटके, आभार प्रा. अरुण चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या