पोस्ट्स

अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन

इमेज
  गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ अनिता संजय कुकडे  परळी वैजनाथ /प्रतिनिधी गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरा मध्ये दिवसभरात अनेक वेळा वीज गायब होत असून हा विजेचा लपंडाव होऊ नये, याची काळजी वीज वितरण कंपनीने द्यावी अन्यथा नागरिक व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मा उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेविका सौ अनिता संजय कुकडे यांनी दिला आहे. हिंदू धर्मियांमध्ये  गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी-गणपती सणाच्या काळात विजेचा लपंडाव होऊ नये अशी गौरी व गणेश भक्तांची भावना असते. वीज गेल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान होते त्यामुळे वीज वितरण कंपनीने विजेचा लपंडाव होऊ नये यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सणासुदीत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा  परळी शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा सौ अनिता कुकडे यांनी दिला आहे. परळी शहरामध्ये सध्या वारंवार वीज पुरवठा कोणत्याही पध्दतीचे भारनियमन नसताना कोणतीही पूर्वसूचना न देता, नेहम

राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार

इमेज
  राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार  मुंबई: महाराष्ट्रामधील सर्व वीज ग्राहकांचे सर्व मीटर बदलले जाणार असून त्या ठिकाणी आता नवे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण २६ हजार ९२१ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. यासंबंधीत आज सहा टेंडर्सना मंजुरी देण्यात आली आहे. भांडुप, कल्याण, कोकण, बारामती, पुणे या भागातले मीटर अदानी ग्रुप कंपनीकडून बदलण्यात येणार आहेत. RDSS योजनेंतर्गत DBFOOT आधारावर महाराष्ट्र राज्यातील MSEDCL मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदात्याची नियुक्ती आज झाली. उर्जा मंत्रालयाकडून निर्देशानुसार, सरकार भारतातील आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सूचनेप्रमाणे काम करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात चडएऊउङ मध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदात्याच्या नियुक्तीसाठी सात निविदा मागवल्या होत्या. त्यापैकी सहा निविदा अंतिम झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने राज्यभरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या तयारीत केली आहे. वेळेवर बिल भरण्यात अयशस्वी झालेल्यांसाठी स्वयंचलित

पाणीटंचाईच्या झळा: चार दिवसांनी येणार नळाला पाणी

इमेज
  पाणीटंचाईच्या झळा: चार दिवसांनी येणार नळाला पाणी आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     संपूर्ण मराठवाड्यात पाऊस पाणी कमी झाल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे. जलसाठ्यांमध्ये पाणी कमी झाले आहे.मुबलक पाऊस  झाला नसल्याने आत्तापासूनच पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.या पार्श्वभुमीवर आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.      सध्याची दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता व जलसाठ्यांमध्ये वरचेवर कमी होत जाणारी पाणी पातळी लक्षात घेता उपलब्ध पाण्यासाठी पुढे उपयोग करण्यासाठी व संभाव्य पाणीटंचाई रोखण्याचे दृष्टीने पाणी कपातीचे धोरण राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच परळी शहरात ही आता चार दिवसांनी नळाला पाणी येणार असून याबाबतचे वेळापत्रक नगर परिषदेने तयार केले आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असून चार दिवस आड परळी शहरात वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी जपून वापरावे लागणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळून या परिस्थितीवर पाऊस पडेपर्यंत तरी मात करावी लागेल. या दृष्टीने आता परळी शहरात चार दिवसांनी

सणासूदीचे दिवस लक्षात घेत गाड्या रद्दचा निर्णय रेल्वे विभागाकडून मागे

इमेज
गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार   मध्य रेल्वे ने कळविल्यानुसार, या कार्यालयाने आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी प्रेस नोट क्र. 579 नुसार  नांदेड येथून सुटणारी गाडी गाडी क्र. 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस दिनांक 23 आणि 24 सप्टेंबर, 2023  आणि पुणे येथून सुटणारी गाडी क्र. 17629 पुणे-नांदेड एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 25 सप्टेंबर, 2023 ला रद्द करण्यात  आल्याचे कळविले होते.     मध्य रेल्वे ने या गाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे, नांदेड येथून सुटणारी गाडी गाडी क्र. 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस दिनांक 23 आणि 24 सप्टेंबर, 2023 ला  नियोजित वेळे नुसार धावेल.  तसेच , पुणे येथून सुटणारी गाडी क्र. 17629 पुणे-नांदेड एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 25 सप्टेंबर, 2023 ला नियोजित वेळेनुसार धावेल.या दोन्ही रेल्वे   नियोजित वेळा पत्रका नुसार धावतील. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.  अशी माहीती जनसंपर्क विभाग, रेल्वे  नांदेड यांनी दिली आहे. ----------------------------------------------------- Click: ■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात

मोठी बातमी : ऐन सणासूदीत रेल्वेगाड्या बंद

इमेज
 मोठी बातमी : ऐन सणासूदीत रेल्वेगाड्या बंद  मोठी बातमी : हैद्राबाद-पूर्णा-हैद्राबाद पाठोपाठ नांदेड-पुणे-नांदेड एक्सप्रेस रेल्वे रद्द मध्य रेल्वे, सोलापूर विभागातील दौंड-मनमाड सेक्शन मधील अकोलनेर- सारोळा दरम्यान दुहेरीकरण चे कार्य करण्या करिता नॉन-इंटर लॉक वर्किंग करिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्या :  1. नांदेड येथून सुटणारी गाडी गाडी क्र. 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस दिनांक 23 आणि 24 सप्टेंबर, 2023 ला रद्द करण्यात आली आहे.  2. पुणे येथून सुटणारी गाडी क्र. 17629 पुणे-नांदेड एक्स्प्रेस दिनांक 24 आणि 25 सप्टेंबर, 2023 ला रद्द करण्यात आली आहे. ----------------------------------------------------- Click: ■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा* Click: ■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम* Click: ■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला ! Click:  ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वत

8668945353 या क्रमांकावर सजावटीचे फोटो,व्हिडिओ व्हाट्सएप करा अन स्पर्धेत सहभागी व्हा

इमेज
  ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन 8668945353 या क्रमांकावर सजावटीचे फोटो,व्हिडिओ व्हाट्सएप करा अन स्पर्धेत सहभागी व्हा परळी - प्रतिनिधी दि.२१- सामाजिक सेवेसाठी ओळख निर्माण केलेल्या ॲड माधव  जाधव मित्र मंडळाकडून परळी येथे गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दि.२१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर असा या स्पर्धेचा कालावधी असणार आहे.व्हाट्सएपच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.या स्पर्धेत तीन विजेत्यांना निवडले जाणार असून पहिल्या तीन विजेत्यांना ७००१,५००१,३००१ असे रोख रकमेचे बक्षिस,तर उर्वरित सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. स्पर्धकाला मोफत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.गुरुवार दि.२१ सप्टेंबर सायंकाळी ७ पासून ते शनिवार २३ सप्टेंबर सायंकाळी ७ पर्यंत स्पर्धकाला सहभागी होता येईल.स्पर्धकाने व्हाट्सएपच्या माध्यमातून 866 894 5353 या क्रमांकावर आपल्या गौरी सजावटीचे २ फोटो आणि सजावटीचा १५ सेकंदाचा विडिओ पाठवायचा आहे.यासोबत आपले पुर्ण नाव आणि पत्ताही पाठवावा लागणार आहे.वरील वेळेतच आलेल्या फोटो व्हिडीओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरले

परळीच्या तिन्ही ठाणेदारांना आता नव्याखट गाड्या !

इमेज
  परळीच्या तिन्ही ठाणेदारांना आता नव्याखट गाड्या !  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळीतील तीनही पोलीस ठाण्यांसाठी आता पोलीस दलाच्या वतीने तीन नव्या कोऱ्या गाड्या देण्यात आल्या आहेत. परळीतील पोलीस ठाण्यांसाठी नवीन गाड्या उपलब्ध झाल्याने परळी पोलिसांना सेवा देणे आता आणखी सुलभ होणार आहे.          परळीतील शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाणे यांच्यासाठी नवीन तीन बोलेरो गाड्या देण्यात आल्या आहेत. या गाड्या परळीच्या तिन्ही ठाणेदारांकडे सुपूर्द करण्यात आल्या. गणेश चतुर्थीच्या दिवशी या गाड्या परळीच्या ठाण्यांमध्ये दाखल झाल्या. यावेळी तीनही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या नवीन गाड्यांची पूजा करून आपल्या दिमतीला आलेल्या नवीन वाहनांचे स्वागत केले. नवीन गाड्या उपलब्ध झाल्याने परळीच्या पोलीस दलाला आता जनसेवेचे काम करायला मदत व सुलभता येणार आहे. ----------------------------------------------------- Click: ■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा* Click: ■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्

बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम

इमेज
बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु. सपना गुट्टे  महाविद्यालयात प्रथम परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु. सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम  आली आहे. या यशाबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.        महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २०२३ निकाला मध्ये वैद्यनाथ इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग परळी वै. मधील बी. एस. सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ९१% निकाल लागलेला आहे. या निकाला मध्ये कु. गुट्टे सपना माणिक हिने ७९% गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम येत घवघवीत यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  डॉ. सुर्यकांत मुंढे, प्रशासकीय अधिकारी  शेख सर, प्राचार्या सौ. लिलावती हक्की , उपप्राचार्या सौ. गुणप्रिया चोपडे, सतीश सर, राम होळंबे, सौ. सोनाली फड  व सर्व शिक्षकवृन्दानी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ----------------------------------------------------- Click: ■ नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने Click: ■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळल

"चांद्रयान" सुंदर देखावा

इमेज
भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना:"चांद्रयान" सुंदर देखावा  परळी वैजनाथ (दिनांक: 19) भेल संकुलात गणेशमूर्तीची उत्साहात स्थापना. आज सर्वत्र गणेशोत्सवाची उत्साहात सुरुवात होत असताना परळी शहरातील टी. पी. एस कॉलनीतील भेल सेकंडरी स्कूल मध्ये प्रतीवर्षाप्रमाणे गणेशमूर्तीची उत्साहात प्रतीस्थापना करण्यात आली.यावर्षी प्रायमरी विभागातील शिक्षिकांनी "चांद्रयान" सुंदर देखावा साकारला आहे. आजची गणेशस्थापना पूजा व यजमान म्हणून विद्यालयातील सहशिक्षक नितीन मुंडे यांना मान मिळाला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ठाकूर सर,राव सर सर्व विभागप्रमुख व विद्यालयातील शिक्षक व शिक्षिका तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी भरपूर पाऊस पडू दे असे साकडे गणपती बाप्पानां घातले. ----------------------------------------------------- Click: ■ नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने Click: ■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला ! Click:  ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी Click:  ■ डोळ्यांच्या आजाराने

परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान

इमेज
  परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान परळी  , येथील न्यु हायस्कुल ,नवगण कॉलेज चे विद्यार्थी ,पुण्याचे उद्योजक अनिरुद्ध चव्हाण  यांना पुण्यात मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.    दि. १७ सप्टेंबर २०२३ बालगंधर्व रंग मंच पूणे येथे  मराठवाडा मुक्तिदिन अमृत महोत्सवा निमित्त  पूण्यामधील मराठवाडा समन्वय समीतीने " मराठवाडा भूषण उद्योजक " या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे ,यावेळी तरुण उद्योजक अनिरुद्ध चव्हाण यांना आंतरराष्ट्रीय संशोधक सुरज ऐनगाडे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, विवेकानंद भोसले यांच्या उपस्थितीत  पुरस्कार प्रदान करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर  मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, सचिव दत्ताजी त्र्यंबकराव मेहत्रे व इतरांच्या उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिरुद्ध चव्हाण यांचे परळी चे उद्योजक योगेश निर्मळे, माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ निर्मळ पाटील, परळी तील राजेश चव्हाण, मयूर मुळजकर,प्रा पवन मुंडे,भोजराज पालिवा ल व इतरांनी स्वागत केले आहे -------------

भरती प्रक्रियेस मुदतवाढ द्या

इमेज
  आरोग्य भरती प्रक्रियच्या वेबसाईटला तांत्रिक अडचण; भरती प्रक्रियेस मुदतवाढ द्या- भक्तराम फड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  आरोग्य विभागातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत विभागाची नुकतीच जाहिरात आली होती. दि.२९ ऑगस्ट ते दि.१८ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी, त्यात तांत्रिक अडचणी यामुळे लाखो उमेदवार पात्र असूनही भरतीस अर्ज भरता येत नाही. नेटवर्कच्या अडचणींमुळे वेबसाइट वारंवार हँग होत आहे, अर्ज भरता येत नसल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी  परिचारिका संघटनेचे अध्यक्ष भक्तराम फड यांनी केली आहे.             सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क व ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत विभागाची नुकतीच जाहिरात आली. प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी, केमिकल असिस्टंट, मेडिकल सोशल वर्कर, व्यवसोपचार तज्ज्ञ, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या प्रक्रियेत १८ सप्टेंबरपर्यंत

दुसऱ्याची जमीन हडपण्यासाठी गुरुजीची खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

इमेज
  दुसऱ्याची जमीन हडपण्याचा  खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला  ! परळी वैजनाथ दहा रुपयांच्या बाॅंडच्याआधारे दुसऱ्याच्या जमीनीचा विक्रीचा खोटा करारनामा तयार करून बनावट दस्तऐवज बनवून एकाची शेतजमीन हडपण्याचा कट करून  फसवणूक  केल्याच्या आरोपावरून परळी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात एका शिक्षकांसह अन्य एकाचा अटकपूर्व जामीन अंबाजोगाई येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.       याबाबत परळी येथील फिर्यादी प्रदिप पुरूषोत्तम नव्हाडे  यांनी दिलेल्या फिर्यादीत  7 ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांना अंबाजोगाई येथील न्यायालयाचे समन्स मिळाले तेव्हा त्यांना धक्का बसला कारण त्यांच्या मालकी व कब्जातील मौजे परळी शिवारातील जमीन सर्वे नंबर 245/2 मधील 1 हेक्टर 07 आर जमीनी विक्रीचा खोटा करारनामा सुभाष राजाराम नव्हाडे यांनी व इतरांनी आरोपी महमंद कलिमोददीन महमंद सलीमोददीन  व महंमद हलिमोददीन महमंद सलीमोददीन यांना करुन दिल्याबद्दल माहिती मिळाली.  त्याबाबत अंबाजोगाई येथील न्यायालयात खोटा दावा दाखल केला.फिर्यादीच्या जमीनीचे आपणच मालक असल्याचे दाखवून बनावट दस्तऐवज बनवून फिर्यादीची फसवणूक केली वगैरे मजकुरावर

बीड जिल्ह्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे निर्णय

इमेज
  नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने  जगमित्र कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार श्रींची स्थापना परळी वैद्यनाथ (दि. 18) - संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध असलेला व संपूर्ण राज्यभरात नावाजला जाणारा परळी वैद्यनाथ येथील नाथ प्रतिष्ठाण आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी राज्यात व बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय नाथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.  नाथ प्रतिष्ठाणच्या श्रींची स्थापना प्रतिवर्षी प्रमाणे मोंढा मैदान येथे न करता यावर्षी धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात उद्या सकाळी ठीक 11.30 वा. ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते साध्या पद्धतीने विधिवत पूजन करून करण्यात येणार आहे.  कृषिमंत्री धनंजय मुंडे व नाथ प्रतिष्ठाणचे कार्यवाह, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गणोशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी परळीकरांना अनुभवायला मिळते, मात्र यावर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकरी संकटात असल्याने, नाथ प्रतिष्ठ

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

इमेज
  तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी परळी-वै प्रतिनिधी         तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा दि. 16.09.2023 रोजी न्यु हायस्कुल (T.p.s Lolony) परळी-वै. येथे पार पडल्या. या मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.             त्यात 17 वर्षे वयोगटात 1) चि. प्रांशु श्रीपाद निसाद 400 मीटर धावणे मध्ये प्रथम. 2) 800 मीटर धावणे मध्ये चि. रचैय्या शांतचय्या स्वामी  द्वितीय,3. 1500 मीटर धावणे चि. विश्वराज भागवत गोरे  प्रथम क्रमांक 4.चि. आदित्य रंगनाथ घाडगे  3000 मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. 5. 4x100 मीटर रीले रेल मध्ये धावणे वरील सर्व  विद्यार्थ्यांनी  द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच या खेळाडूंची जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या त्यांच्या यशामध्ये मार्गदर्शक म्हणून शाळेतील क्रीडाशिक्षक श्री आनंद देशमानेव श्री सुरवसे रामकिशन सर यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचा यशाबद्दल शाळेचे संस्थाचालक व संस्था पदाधिकारी  यांनी विद्यालयाच्या वतीने सत्कार करून पुढील कार्याल शुभेच्छा दिल्या. -------------

न्यू हायस्कूल कॉलेज येथे मेरी माटी मेरा देश कार्यक्रम

इमेज
  न्यु हायस्कूल कॉलेज येथे मेरी माटी मेरा देश कार्यक्रम  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मेरी माटी मेरा देश कार्यक्रम अंतर्गत अमृत कलश संकलन, स्वच्छतेची शपथ, अमृत वाटिका, वृक्षारोपण, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, भित्ती पत्रकाचे विमोचन, चित्रकला स्पर्धेचे आयोजन दि.१७ सप्टेंबर रोजी करण्यात आले.                           मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश संकलनास गती देण्यासाठी दि.१७ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे अमृत कलश संकलनास प्रारंभ करण्यात आला. यानुसार मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात ७५ रोपांचे रोपण करून अमृत वाटिका तयार करण्यात आली. तसेच भित्तिपत्रकाचे विमोचन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसह न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स

डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

इमेज
  डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या   माजलगाव,प्रतिनिधी  डोळ्यांच्या आजाराने त्रस्त 65 वर्षीय वयोवृध्दाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजेदरम्यान घडली.    परमेश्वर नारायण स्वामी (वय 65 वर्ष) हे गेल्या काही दिवसांपासून शारीरिक आजाराने त्रस्त होते. आजारास कंटाळून रविवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदनानंतर लवुळ येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत परमेश्वर स्वामी यांच्या पश्चात एक मतिमंद मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. ----------------------------------------------------- Click: ■ नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने Click: ■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला ! Click:  ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी Click:  ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या Click: ■ खळबळजनक:लग्न

खा.डॉ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ बँकेची खेळीमेळीत वार्षिक सर्वसाधारण सभा

इमेज
  खा.डॉ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ बँकेची खेळीमेळीत वार्षिक सर्वसाधारण सभा  परळी (संजय क्षिरसागर)...... दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी वैद्यनाथ बँकेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व खा.डॉ. प्रितमताई मुंडे, यांच्या विशेष उपस्थितीत श्री विनोद सामत यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.                          वैद्यनाथ प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडलेल्या ह्या सभेच्या सुरवातीस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनोद खर्चे यांनी प्रास्ताविक केले. त्यापूर्वी बँकेचे माजी कार्यकारी संचालक कै.रत्नेश्वरआप्पा कोरे, सभासद कै.रामराव आघाव, कै.दिलीप झुंजे, कै. प्रशांत जोशी, कै.रंजित देशमुख, कै.गजानन डुबे बँक कर्मचारी कै.जयराज फपागिरे, मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मे व बँकेचे जे सभासद, बँक कर्मचारी तसेच भारतातील राजकीय, सामाजिक, सहकार, कला व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती बँकेचे ज्ञात-अज्ञात सभासद, हितचिंतक, ठेवीदार, खातेदार पंचतत्वात विलीन झालेले व देशाचे रक्षण करताना शहीद झालेले वीर जवा

हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांचे योगदान महत्वपूर्ण होते --डॉ. ओमशिवा लिगाडे

इमेज
  हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांचे योगदान महत्वपूर्ण होते --डॉ. ओमशिवा लिगाडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी....जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ.ओमशिवा लिगाडे यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यात महिलांचा योगदान महत्त्वपूर्ण होते असे मत प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. आर. डी राठोड ,प्रमुख वक्ते शिव जागृती महाविद्यालय नळेगाव येथिल इतिहास विभाग प्रमुख, डॉ.ओमशिवा लिगाडे, विद्या परिषद सदस्य व स्व.गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास संशोधन केंद्राचे सदस्य डॉ. पी एल कराड उपप्राचार्य प्रा.हरीश मुंडे, पर्यवेक्षक प्रा.मंगला पेकमवार, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा. उत्तम कांदे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के.शेप यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात निजाम राजवटीने केलेल्या अन्याय अत्याचार विषयी थोडक्यात माहिती दिली तर प्रमुख वक्ते यांचा परिचय प्रा रेड्डी वाय डी यांनी दिला. प्रमुख मार्गद