जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

भरती प्रक्रियेस मुदतवाढ द्या

 आरोग्य भरती प्रक्रियच्या वेबसाईटला तांत्रिक अडचण; भरती प्रक्रियेस मुदतवाढ द्या- भक्तराम फड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  आरोग्य विभागातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत विभागाची नुकतीच जाहिरात आली होती. दि.२९ ऑगस्ट ते दि.१८ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी, त्यात तांत्रिक अडचणी यामुळे लाखो उमेदवार पात्र असूनही भरतीस अर्ज भरता येत नाही. नेटवर्कच्या अडचणींमुळे वेबसाइट वारंवार हँग होत आहे, अर्ज भरता येत नसल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी  परिचारिका संघटनेचे अध्यक्ष भक्तराम फड यांनी केली आहे.

            सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क व ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत विभागाची नुकतीच जाहिरात आली. प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी, केमिकल असिस्टंट, मेडिकल सोशल वर्कर, व्यवसोपचार तज्ज्ञ, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या प्रक्रियेत १८ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी, त्यात तांत्रिक अडचणी यामुळे अनेक उमेदवार पात्र असूनही अर्ज भरू शकतील का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. भरतीची प्रक्रिया  अनेक वर्षापासून रखडलेली आहे. त्यामुळे पदभरती प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना या पदांसाठी अर्ज भरताना अडचणी येत आहेत. अर्ज भरण्यास तासनतास जात आहे. अशावेळी भरती प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी परिचारक संघटनेचे अध्यक्ष भक्तराम फड यांनी केली आहे.

-----------------------------------------------------

Click:■ नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?