पाणीटंचाईच्या झळा: चार दिवसांनी येणार नळाला पाणी

 पाणीटंचाईच्या झळा: चार दिवसांनी येणार नळाला पाणी


आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    संपूर्ण मराठवाड्यात पाऊस पाणी कमी झाल्याने दुष्काळाचे सावट पसरले आहे. जलसाठ्यांमध्ये पाणी कमी झाले आहे.मुबलक पाऊस  झाला नसल्याने आत्तापासूनच पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.या पार्श्वभुमीवर आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

     सध्याची दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता व जलसाठ्यांमध्ये वरचेवर कमी होत जाणारी पाणी पातळी लक्षात घेता उपलब्ध पाण्यासाठी पुढे उपयोग करण्यासाठी व संभाव्य पाणीटंचाई रोखण्याचे दृष्टीने पाणी कपातीचे धोरण राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच परळी शहरात ही आता चार दिवसांनी नळाला पाणी येणार असून याबाबतचे वेळापत्रक नगर परिषदेने तयार केले आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असून चार दिवस आड परळी शहरात वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी जपून वापरावे लागणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळून या परिस्थितीवर पाऊस पडेपर्यंत तरी मात करावी लागेल. या दृष्टीने आता परळी शहरात चार दिवसांनी नळाला पाणी सुटणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळून पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------

Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !