इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

दुसऱ्याची जमीन हडपण्यासाठी गुरुजीची खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

 दुसऱ्याची जमीन हडपण्याचा  खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला  !

परळी वैजनाथ

दहा रुपयांच्या बाॅंडच्याआधारे दुसऱ्याच्या जमीनीचा विक्रीचा खोटा करारनामा तयार करून बनावट दस्तऐवज बनवून एकाची शेतजमीन हडपण्याचा कट करून  फसवणूक  केल्याच्या आरोपावरून परळी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात एका शिक्षकांसह अन्य एकाचा अटकपूर्व जामीन अंबाजोगाई येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

      याबाबत परळी येथील फिर्यादी प्रदिप पुरूषोत्तम नव्हाडे  यांनी दिलेल्या फिर्यादीत  7 ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांना अंबाजोगाई येथील न्यायालयाचे समन्स मिळाले तेव्हा त्यांना धक्का बसला कारण त्यांच्या मालकी व कब्जातील मौजे परळी शिवारातील जमीन सर्वे नंबर 245/2 मधील 1 हेक्टर 07 आर जमीनी विक्रीचा खोटा करारनामा सुभाष राजाराम नव्हाडे यांनी व इतरांनी आरोपी महमंद कलिमोददीन महमंद सलीमोददीन  व महंमद हलिमोददीन महमंद सलीमोददीन यांना करुन दिल्याबद्दल माहिती मिळाली.  त्याबाबत अंबाजोगाई येथील न्यायालयात खोटा दावा दाखल केला.फिर्यादीच्या जमीनीचे आपणच मालक असल्याचे दाखवून बनावट दस्तऐवज बनवून फिर्यादीची फसवणूक केली वगैरे मजकुरावर परळी ग्रामीण पोलिस स्टेशनला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा गु रं न 194/2023 गुन्हा कलम 420 468 467 471 34 भा दं वी अन्वये गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्यात वरील आरोपींनी अंबाजोगाई येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली.न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपींनी प्रथमदर्शनी गुन्हा केल्याचे दिसून येत असल्याने  आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.सरकारतर्फे अँड.लक्षमण फड तर फिर्यादी तर्फे अँड दत्तकुमार लांब यांनी काम पाहिले.

-----------------------------------------------------

Click:■ नाथ प्रतिष्ठाणचा वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!