MB NEWS:सराफा व्यापारी रमेश मुंडलिक धारासुरकर यांच्या वतीने भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांचा सत्कार
सराफा व्यापारी रमेश मुंडलिक धारासुरकर यांच्या वतीने भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांचा सत्कार
गंगाखेड, प्रतिनिधी....
प्रसिद्ध भागवत कथाकार भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज जोशी उखळीकर यांची सध्या धारासुर येथे भागवत कथा सुरू आहे. या कथेदरम्यान मूळ धारासुर येथील व परळीतील प्रसिद्ध सराफा व्यापारी रमेश मुंडलिक यांनी कथे दरम्यान महाराजांचा हृदय सत्कार केला.
धारासुर येथे हभप बाळू महाराज जोशी उखळीकर यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परळी येथील सराफा व्यापारी रमेश मुंडलिक हे मूळ धारासुर येथील असून त्यांनी या कथेदरम्यान भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन हृदय सत्कार केला. यावेळी धारासुर येथील भाविक, मित्र मंडळ, गावकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा