MB NEWS: स्व.श्यामराव देशमुख स्मृति समारोहाचे उद्घाटन:प्रभाकर साळेगावकर यांच्या आशयघन कवितेने रसिकांना केले मंत्रमुग्ध

 स्व.श्यामराव देशमुख स्मृति समारोहाचे उद्घाटन:प्रभाकर साळेगावकर यांच्या आशयघन कवितेने रसिकांना केले मंत्रमुग्ध






परळी, दि. 16/01/2023 (प्रतिनिधी)

येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिसमारोहाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या समारोहाचे उद्‌घाटन प्रख्यात विडंबनकार , कवी , विविध दूरचित्रवाहिन्यांवर अनेक कार्यक्रमांचे अनोखे सादरीकरण करणारे मा. प्रभाकरजी साळेगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. नंदकुमार ठाकूर यांच्या वतीने परळीतील संभाजीनगर विभागाचे पो .उ .नि .श्री सुरेशजी चाटे हे या सोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष , मा.संजयजी देशमुख हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे सचिव मा. रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख तसेच  संचालिका सौ . छायाताई देशमुख , सौ .विद्याताई देशमुख , श्री मंगेश देशमुख तसेच मा. हेमंतजी कुलकर्णी , मा. अॅड. गिरीशजी चौधरी , परळीतील नामवंत चिकित्सक डॉक्टर जे . जे .देशपांडे आणि विद्यार्थिनी संसदेच्या सदस्या  उपस्थित होत्या .

     कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री प्रभाकर साळेगावकर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये विद्यार्थिनींना अनमोल अशा प्रकारचे मार्गदर्शन केले . त्यात ते म्हणाले दिसण्यापेक्षा विद्यार्थिनींनी असण्याला महत्त्व देणं आवश्यक आहे .पंडित नेहरू म्हणत ,   '  'हमें अपने जीवन को कविता बनाना है।'  तुम्ही खूप मोठ्या व्हा ; पण मातापित्यांच्या विश्वासघात करू नका . भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून तुम्ही जगा . द्वेष मत्सर सोडा . अज्ञानाला ज्ञानाच्या ढालेने जिंका .असे वेगवेगळे प्रेरक विचार त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना व सर्व प्रेक्षकांना आपल्या शैलीदार भाषेतून दिले . *मी तुझ्या गाण्यात डोकावते* ,   *शाळेची घंटा घणाघणा वाजं , बंडू बाळाला होई दप्तराचं वझं* ,अशा अनेक ह्रदयस्पर्शी कविता आणि अनेक विडंबन कविता सादर करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली .त्यांची *माझ्या गं नळाला येईना पाणी* ही राजकीय विडंबनात्मक कविता तसेच पिंजरा या चित्रपटातील बैठकीच्या लावणीच्या धर्तीवर  असलेली राजकीय विडंबनात्मक कविता  श्रोत्यांची दाद घेऊन गेली .परळीकर श्रोतेमंडळी त्यांच्या विविध प्रकारच्या कवितांनी भारावून गेले तसेच अत्यंत खुमासदार विनोदी शैलीतून असलेलं त्यांचं वक्तव्य आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरलं . शेवटी महाविद्यालयातील मुली या राष्ट्रविकासाचा आधार बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . नंदकुमार ठाकूर यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित परळीतील संभाजीनगर पोलीस स्टेशन  येथील सुरेशजी चाटे यांनीही आपल्या वक्तव्यामध्ये महाविद्यालयात होत असलेल्या स्पर्धापरीक्षांच्या मार्गदर्शनासाठी मी ही अवश्य सहाय्य करेल असे प्रतिपादन केले .या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष मा श्री संजय जी देशमुख सर यांनी ' जे ज्याचं देणं असतं त्याचं देणं त्याला द्यावं ' आम्ही समाजाचे देणं देण्याचा प्रयत्न करत आहोत .परळीकरांनी जे आमच्यावर प्रेम केलं ते प्रेम फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत असे सांगून  महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास कसा होईल , उणिवा कशा दूर करता येतील याचा प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष देऊ .असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय समारोपपर भाषणामध्ये त्यांनी  केले . प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. मुंडे सर यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या *इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी* या वचनाचा आधार घेत महाविद्यालयाच्या यशाचा चढता आलेख, गुणवंतांचा नवनवीन उंची गाठणारा आलेख याचा आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून आढावा घेतला . स्थापनेपासून आजपर्यंत स्त्री शिक्षणाच्या तळमळीतून महाविद्यालय कसे स्थापन झाले इथपासून आज महाविद्यालयाचा झालेला वटवृक्ष ,या महाविद्यालयाच्या गुणवत्तेची झालेली यशस्वी वाटचाल अनेक घटनांच्या साह्याने प्राचार्यांनी वर्णन केली . त्यानंतर विद्यार्थिनी संसदेची प्रतिनिधी म्हणून माधुरी बडे या विद्यार्थिनीने विद्यार्थिनी संसदेचा अहवाल सर्व प्रेक्षकांच्या समोर प्रभावीपणे प्रतिपादन केला .

          याप्रसंगी महाविद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना सुद्धा गौरविण्यात आले. त्यात संस्कृत श्लोक पाठांतर स्पर्धेत कनिष्ठ विभागातून मयुरी रत्नपारखी प्रथम तर वैष्णवी केंद्रे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला . याच स्पर्धेत वरिष्ठ विभागातून तृप्ती तंवर प्रथम तर सायली चाटोरीकर द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली . सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये कनिष्ठ विभागातून थोरात प्रांजल प्रथम तर डोळे कावेरी द्वितीय  वरिष्ठ विभागातून चाटोरीकर सायली प्रथम तर कट्टे ऐश्वर्या द्वितीय पारितोषिकाची मानकरी ठरली . महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या कॅरम, बुद्धिबळ, गोळाफेक ,थाळीफेक या स्पर्धांमध्ये सर्वप्रथम व सर्वद्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थिनी अनुक्रमे उजगरे शुभांगी, बडे माधुरी, दाणेकर हर्षदा, राडकर क्रांती, खान जवेरिया,  गायकवाड माधुरी, केंद्रे वैष्णवी ,अस्मिता नागरगोजे या आहेत त्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले .क्रिकेट स्पर्धेत कर्णधार जोगदंड प्रेरणा हिच्या नेतृत्वात बी.एससी. च्या वर्गाने प्रथम क्रमांक पटकाविला तर कर्णधार  तरकसे पायल हिच्या नेतृत्वात बारावी कला या वर्गाने द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावलेल्या प्राध्यापकांचाही सन्मान प्रस्तुत प्रसंगी करण्यात आला .त्यात प्रा . डॉ .यल्लावाड राजकुमार ,प्रा शहाणे आर .पी, प्रा .डॉ .अरुण चव्हाण प्रा .डॉ .शिवनारायण वाघमारे, प्रा . प्रवीण फुटके यांचा समावेश आहे . महाविद्यालयातील विद्यार्थिनी संसदेच्या विविध वर्गाच्या व विभागांच्या प्रतिनिधी म्हणून

बडे माधुरी , मुंडलिक संध्या ,सांगळे समृद्धी ,पवार मंजुषा, गित्ते रोहिणी, मुंडे तेजस्विनी, शिंदे वैशाली ,गरडकर पायल, सावंत नेहा, तंवर तृप्ती ,पवार संध्या, उजगरे शुभांगी, पवार निकिता, डोळे कावेरी, गोरे मयुरी, किरवले किरण, दराडे अश्विनी या विद्यार्थिनींना कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गौरविण्यात आले.

 याअत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे मराठी विभाग प्रमुख प्रा .डॉ .यल्लवाड व इतिहास विभाग प्रमुख प्रा .डॉ विनोद जगतकर यांनी केले .तर आभार प्रा . प्रवीण फुटके यांनी मानले .या स्मृती समारोहाच्या उद्घाटन सोहळ्यास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी . सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि  महाविद्यालयावर प्रेम करणारे परळी आणि परळी परिसरातील अनेक नामवंत विचारवंत महानुभावांची उपस्थिती लाभली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?