MB NEWS:"वैद्यनाथ" मध्ये रस्तासुरक्षा उद्बोधन शिबिर

"वैद्यनाथ" मध्ये रस्तासुरक्षा उद्बोधन शिबिर  



 "अपघात टाळण्यासाठी चालकांनी दक्ष असावे !"---- परिवहन अधिकारी श्री निळेकर यांचे आवाहन

परळी वैजनाथ , दि.१६- 

           आज-काल दिवसेंदिवस रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढत असून ते टाळण्यासाठी वाहनचालकांनी सतत दक्ष व सतर्क राहावे. याकरिता  वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यामुळे स्वतःबरोबरच इतरांचीही जीवितहानी टळू शकते, असे प्रतिपादन जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री दिलीप निळेकर यांनी केले.

           राज्य शासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने आज (दि. १६) येथील वैद्यनाथ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा उद्बोधन शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून श्री निळेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही.मेश्राम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री शेखर आचार्य, परळी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पो. नि. श्री मारुती मुंडे, मोटार वाहन निरीक्षक श्री उंबरजे, श्री कांबळे व श्री पारशेट्टी उपस्थित होते.

       श्री निळेकर यावेळी म्हणाले- आजकाल मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. पण चालकांकडून नियमांचे मात्र नेहमीच उल्लंघन होत आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी मोठ्या संख्येने होत आहे. हे टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन यावेळी त्यांनी सुरक्षा पंचसूत्री विशद केली.             याच विषयावर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री शेखर आचार्य यांनी सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले - अलीकडच्या दोन वर्षात गाड्यांचा अमर्यादित वेग, मद्यपान, अवेळी प्रवास, बेल्ट न वापरणे, रस्त्यावरील वाहतुकीचे नियम न पाळणे, इत्यादीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहेत. चालकांना आपल्या जीविताची थोडीही काळजी वाटत नाही. यात दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. याकरिता चालकांनी नेहमीच काळजी घ्यावी असावी.

            याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री मुंडे, प्राचार्य डॉ. मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले तर आभार श्री शरद घनचेकर यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ. माधव रोडे,  प्रा. डॉ.बी.पी. गजभारे, कॅप्टन प्रा. जी. एस. चव्हाण, प्रा. एस. डी. माळी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?