MB NEWS:मडव कंसल्टन्सी तयार करणार प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर विकास प्रकल्पाची संकल्प पत्रिका

 मडव कंसल्टन्सी तयार करणार प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर विकास प्रकल्पाची संकल्प पत्रिका


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) केंद्र व राज्य सरकार तथा अनेक देवस्थान तसेच विविध पर्यटन विकास कामांत सल्लागार असलेली मडव कंसल्टन्सी प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर विकास प्रकल्पची संकल्प पत्रिका तयार करणार आहे.


प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व मडव कंसल्टन्सी यांच्या शिष्टमंडळाची येथील राष्ट्रमाता जिजामाता उद्यानात एक प्राथमिक बैठक झाली. त्या आधी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन बैठक पार पडली.


यात प्रामुख्याने प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉरमध्ये कोणकोणते लोकोपयोगी उपक्रम असावेत याबाबत उहापोह करण्यात आला. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे;


१. कॉरिडॉरमध्ये प्रभू वैद्यनाथाबाबत असलेल्या पौराणिक कथा, आख्यायिका, इतिहास यांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने परळी वैजनाथ परिसरात जागोजागी त्यानुसार शिल्पे बसवण्यात यावी.


२. एम्ससारखे सुसज्ज हॉस्पिटल / सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल.


३. मेरू गिरी पर्वत रांगांमध्ये बोटॅनिकल / आयुर्वेदिक वानुस्पत्युद्यान.


४. आंतरराष्ट्रीय योग साधना / विपश्यना केंद्र.


५. भगवान शंकरांचे वाहन नंदी आहे त्यामुळे १० हजार गोवंश क्षमतेची गोशाळा.


६.  सिंह हे माता पार्वती देवीचे वाहन आहे त्याला अनुसरून भारताचे मानचिन्ह असलेला अशोक स्तंभ उभारणे.


७. भगवान कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील एकमेव असलेले मयूर अभयारण्य बीड जिल्ह्यात आहे तेच अधिक विकसित करून त्याला ग्लॅमर प्राप्त करून देणे.


८. भगवान शंकराच्या गळ्यात सर्प आहे तर गणपती बप्पाचे वाहन उंदीर आहे त्यामुळे अशा प्राण्यांवर संशोधन करण्यासाठी हाफकिन संस्थेसारखे संस्था कार्यान्वित करणे.


९. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, आष्टी ही शहर परळी वैजनाथ जंक्शनला जोडणे.


१०. एक राष्ट्रीय विमानतळ विकसीत करणे. प्रभू वैद्यनाथाचे भक्त तसेच योगेश्वरी मातेचे भक्त तसेच व्यापारी वर्गाला ही सुविधा खूप फायद्याची ठरेल.


११. भगवान शंकराला खेळ खूप प्रिय आहेत. तो खेळीया आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त सुसज्ज क्रिडा संकुल उभारणे.


१२. समुद्र मंथनाचा देखावा तसेच इतर आख्यायिका असलेला सुंदर लेजर शो निर्माण करणे.


१३. चांदपूर, नागापूर सारख्या ठिकाणी बोटिंग तसेच पाण्यासंबंधी थरारक खेळ सुरू करणे.


१४. मोहिनी अवतारबाबत प्रसिद्ध असलेले परभणी जिल्ह्यातील शेळगाव विकसित करणे.


१५. परळी वैजनाथ पंचक्रोशीतील मंदिराचा जिर्णोद्धार करणे.


१६. काल भैरव, बटू भैरव, अमृतकुपी, हरिहर तीर्थ, अर्धनारीच्या रूपातील काळरात्री देवी तथा १०८ तीर्थांचा विकास करणे.


१७. आरोग्य भवानी डोंगर तुकाई, सोमेश्वर, रतनेश्वर, हाकाऱ्या पुकाऱ्या आयुर्वेदिक माळ, विठ्ठल टेकडी यांचे संवर्धन.


१८. शेगांवसारखे दर्शन मंडप अन दर्शन बारी सुविधा.


१९. नटराजास संगीत प्रचंड प्रिय आहे. तो डोळे बंद करून ध्यानस्थ अवस्थेत गायन, वादन, नर्तन करतो त्यामुळे परळी वैजनाथ येथे 'संगीत विद्यापीठ' स्थापन करणे.


यांसह आदी मुद्दे अंतर्भूत करून प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर विकास समितीचे तांत्रिक सल्लागार 'मडव कंसल्टन्सी' हे संकल्प पत्रिका तयार करणार आहेत. लवकरच ही संकल्प पत्रिका राज्य व केंद्र सरकारला पाठविली जाईल.


कोण आहे मडव कंसल्टन्सी?

शेगांव येथील आनंद सागर प्रकल्प असेल किंवा मोझरी संस्थान वा नवी मुंबई येथील सेंट्रल पार्क, रायपूर येथील अटल पार्क असे अनेक दर्जेदार प्रकल्प हाताळणाऱ्या मडव कंसल्टन्सीबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास पुढील संकेतस्थळावर जावे https://www.madavconsultants.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?