MB NEWS:प्रा.अतुल दुबे यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सत्कार

 सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी यापुढेही कार्यरत राहणार-प्रा.अतुल दुबे


प्रा.अतुल दुबे यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सत्कार

प्रभू वैद्यनाथास रुद्राभिषेक, विविध मंदिरात महाआरती


परळी/प्रतिनिधी

परळी शहर आणि परिसरातील शिवसैनिकांपासून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानेच आपल्यावर मनापासून प्रेम केले असून या प्रेमाची शिदोरी घेत आपण कार्यरत आहोत. यापुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास शिवसेना प्रणित युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अतुल दुबे यांनी व्यक्त केला.दरम्यान आज रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी कार्यकर्त्यांनी प्रा.दुबे यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रभुवैद्यनाथ रुद्राभिषेक, विविध मंदिरात महाआरती व  उपजिल्हा रुग्णालय येथे अविरतपणे 30 कार्यक्रम त्यांचे सेवा वृत्त करण्याचा निश्चय करण्यात आला आहे.  कार्यकर्त्यांच्या वतीने  त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व केक कापून सत्कार करण्यात आला.

 युवा सेनेचे जिल्हा समन्वयक, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  तथा सामान्य नागरिकांत अतुल सर या नावाने प्रसिद्ध असलेले प्रा.अतुल दुबे यांचा वाढदिवस आज रविवारी परळी शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात  साजरा करण्यात आला. सकाळी श्री वैद्यनाथ मंदिर येथे श्रीं चे आशिर्वाद घेवून अतुल दुबे यांच्या आजच्या वाढदिवसाची सुरूवात झाली. निवासस्थानी आई-वडिलांचे त्यांनी आशिर्वाद घेतले. विविध ठिकाणी मंदिरात श्रीं ची महाआरती  करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . आज दिवसभर विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त प्रा.अतुल दुबे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलतांना प्रा.अतुल दुबे यांनी सांगितले की, परळी शहर आणि परिसरातील नागरिकांचे आपल्यावर मनापासून प्रेम असून मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांसाठी जे शक्य आहे ते काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले आशिर्वाद आणि सहकार्य माझ्या पुढील आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे असून यापुढेही आपल्या सेवेत अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास प्रा.अतुल दुबे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी विविध ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमास शिवसेना शिवाजी चौक विभाग  प्रमुख संजय सोमाणे, शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, युवा सेनेचे मोहन परदेशी, मनिष जोशी, लक्ष्मण मुंडे, सचिन लोढा, योगेश घेवारे, बजरंग औटी , सिद्धार्थ गायकवाड, बाळासाहेब सातपुते, नवनाथ वरवटकर, नरेश मैड,माऊली मुंडे, संस्कार पालीमकर,शिवम मोहिते,योगेश जाधव,प्रकाश देवकर,यांच्यासह शिवसेना, युवा सेना, जय महाराष्ट्र प्रतिष्ठान चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?