MB NEWS:बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने संत गुरु रविदास यांची जयंती उत्साहात साजरी

 संत गुरु रविदासांना सामाजिक भेदभाव अमान्य होता-वैजनाथ माने




बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने संत गुरु रविदास यांची जयंती उत्साहात साजरी



परळी,(प्रतिनिधी):- संत गुरु रविदासांनी समाजवादाची तुतारी फुंकली होती. संत गुरु रविदास स्वतः चर्मकार जातीतून आले असले तरी त्यांना सामाजिक भेदभाव अमान्य होता. आपण सगळे एक आहोत, अशी त्यांची भावना होती. त्यांच्या अनेक दोह्यातूनही त्यांनी ती मांडली आहे. प्रत्येक जण आपल्या मेहनतीनेच जगतो. कर्म करणाऱ्यांना कुणाशी घाबरण्याचे काही कारण नाही. घाबरलात तर संपलात. गुलामी केलीत तर तुमच्यावर कुणीही प्रेम करणार नाही. अशी शिकवण संत गुरु रविदास यांनी दिली असल्याचे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे परळी शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी संत गुरु रविदास यांच्या जयंती दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी केले.


बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी अरुणोदय मार्केट येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात संत गुरु रविदास यांची 646 वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी संत गुरु रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे,  शहर प्रमुख वैजनाथ माने तालुका महिला आघाडी  यशोदा राठोड, गंगाबाई पवार, ज्येष्ठ नेते सय्यद निसार, युवासेना शहरप्रमुख गजानन कोकीळ, अॅङ संजय डिघोळे, विभाग प्रमुख विठल गायकवाड, जिवन शिंदे, गणेश चौरे, युवा सेना सर्कल प्रमुख आशुतोष शिंदे, अनिकेत माने आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संत गुरु रविदास यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना शहर प्रमुख वैजनाथ माने म्हणाले की, इथे कोणी छोटा मोठा नाही. मेहनतीला प्रभू भक्ती समजतो त्याचे जीवनच यशस्वी होत असते. रविदासांनी कर्म हीच ईश्वररसेवा मानली होती. 'मन चंगा तो कठोती में गंगा' मन चांगले असेल तर गंगा आपल्याजवळच असेल अशी शिकवण संत गुरु रविदास यांनी दिली. असेही माने म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेना शहर प्रमुख गजानन कोकीळ यांनी केले तर उपस्थितांचे आभारअनिकेत माने यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?