स्वातंत्र्य दिन: चिरायू होवो

 भेल संकुलामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



  परळी वैजनाथ: प्रतिनिधी...

       येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित "भेल संस्कार केंद्रामध्ये" भारत सरकार आयोजित "हर घर तिरंगा" या अभियानाद्वारे तीन दिवसीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अगदी हर्षोल्लसात साजरा केला गेला.

      याप्रसंगी दिनांक 13/ 8/ 2023 रोजी डॉ. सतीश रायते  तर दिनांक 14/8/ 2023 रोजी  गिरीश ठाकूर  यांच्या हस्ते तर 15 ऑगस्ट 2023 रोजी परळी शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व  शांतीलाल जैन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.

      याप्रसंगी श्री. विकासराव डुबे, श्री.डॉ.सतीश रायते, श्री. राजेश्वर देशमुख, श्री. जीवनराव गडगूळ, श्री. गिरीश ठाकूर सर (प्राचार्य, सीबीएसई) श्री. एन. एस. राव सर (प्राचार्य, स्टेट) इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

          याप्रसंगी सर्वप्रथम संकुलातील श्री. राहुल सूर्यवंशी आणि त्यांचा समूह यांनी "जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले" हे समूहगीत सादर केले. त्यानंतर *एमकेसी* मधील चिमुकल्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली, ती उपस्थित सर्वांना इतकी आवडली की व्यासपीठावरील मान्यवरांनी ही त्यांची दखल घेतली व त्यांना बक्षीस देऊन त्यांचा यथोचित गौरव केला व प्रोत्साहित केले. नंतर संकुलातील सहशिक्षक श्री सचिन जाधव सर यांची इयत्ता सहावी सीबीएसई मधील मुलगी *कु.सई सचिन जाधव* हिने तर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत आजच्या या शुभ सकाळी उपस्थितांना हेलावून टाकले, यानंतर तिचेही मान्यवरांनी बक्षीस देऊन यथोचित सत्कार केला. यानंतर आजच्या दिवसाचे वाढदिवसाचे मानकरी यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते संकुलामध्ये *"वृक्षारोपणाचा कार्यक्रम"* सुद्धा यशस्वीपणे राबविला गेला. नंतर संपूर्ण शक्ती कुंज वसाहतीमध्ये एक प्रचंड अशी भेल संकुलाची *प्रभात फेरी वृक्षदिंडी* काढण्यात आली होती. तर या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाची धुरा इयत्ता दहावी (सीबीएसई)मधील विद्यार्थिनींनी समर्थपणे निभावली, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, पालक वर्ग, विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?