सन्मान कर्त्वाचा : विशेष कार्यगैराव पुरस्कार

वै.प्रा.हरिश्चंद्र पंडीतराव गित्ते सर यांचा बारावा पुण्यस्मरण सोहळा


 सन्मान कर्त्वाचा :  विशेष कार्यगैराव पुरस्कारासह गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार

      परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

वै.प्रा.हरिश्चंद्र पंडीतराव गित्ते सर यांच्या बाराव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वा. राज्याच्या माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून, बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमास त्रिपुरा राज्याचे सचिव किरणकुमार गित्ते, उपजिल्हाधिकारी जिवराजजी डापकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर  ह.भ.प.श्री.केशव महाराज उखळीकर, ह.भ.प.श्री.अर्जुन महाराज लाड गुरूजी, ह.भ.प.श्री.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ह.भ.प.श्री.प्रभाकर महाराज (नाना) झोलकर, ह.भ.प.श्री.गोविंद महाराज मुंडे, ह.भ.प.श्री.सचिन महाराज गित्ते, ह.भ.प.श्री.जगदीश महाराज सोनवणे आदी मान्यवरांची या वेळेस प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या कार्यक्रमात  वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव बाबासाहेब देशमुख, नायब तहसिलदार बाबुराव रूपनर, वैद्यनाथ काँलेजचे प्राचार्य मा.डॉ.रमेश राठोड, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ.सतिश गुठे, संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सलिम चाऊस, लोकमतचे संजय खाकरे, दै.मराठवाडा साथीचे निवासी संपादक सतिश बियाणी, दै.दिव्य अग्नि संपादक मा.प्रकाश सुर्यकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल चाटे, पीसीएन न्युज चॅनलचे संपादक मोहनराव व्हावळे, संत वांड्‌:मयाचे संशोधक दत्तात्रय आंधळे व आयुष्कार मेन्स वेअरचे संचालक श्रीकृष्ण मोती यांचा विशेष सन्मानमुर्ती म्हणून सन्मान केला जाणार आहे 


गुरूवार दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प.भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांचे सुश्राव्य वाणीतून किर्तन होईल. या कार्यक्रमास पंचक्रोषीतील गुणीजण, भजणीमंडळ उपस्थित राहणार आहेत. तरी या ज्ञानामृताचा आवश्य लाभ घ्यावा अशी विनंती हरिसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेश हरिश्चंद्र गित्ते, धनंजय हरिश्चंद्र गित्ते, अजय हरिश्चंद्र गित्ते,  बलभिम हरिश्चंद्र गित्ते यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?