श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ते कपीलधार पायी दिंडी सोहळा

 राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोअनुष्ठान समितीच्या वतीने श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ते कपीलधार दिंडी सोहळ्याचे स्वागत 


परळी वैजनाथ / प्रतिनिधी

वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या तपोअनुष्ठान समितीच्या वतीने कार्तिक पोर्णिमा व श्री मन्मथस्वामी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ते कपीलधार पायी दिंडी सोहळा श्री गुरू वेदांताचार्य, शिवाचार्यरत्न पुरस्कृत ष.ब्र.108 सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्री वैजनाथ नगरी परळी येथून निघालेल्या पायी दिंडीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.

श्री गुरुलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे विश्वस्त तथा वैजनाथ देवस्थानचे विश्वस्त श्री.विजयकुमार मेनकुदळे व राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या तपोअनुष्ठान समितीच्या वतीने अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या हस्ते व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत श्री गुरू वेदांताचार्य,शिवाचार्यरत्न पुरस्कृत ष.ब्र.108 सिध्दलिंग शिवाचार्य महाराज  साखरखेर्डेकर,ष.ब्र 108 सिध्दचैतन्य महाराज यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. 

आज सोमवार दि.20 नोव्हेंबर रोजी श्री.गुरूलिंग स्वामी मंदिर,बेलवाडी येथून श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र कपिलधार कडे ढोल ताशांच्या गजरात व गुरुराज माऊली मन्मथ स्वामी की जय च्या जयघोषात श्रीक्षेत्र कपिलधार कडे रवाना झाला आहे.

  रविवार दि.26 नोव्हेंबर रोजी कपीलधार येथे ही दिंडी पोहोचणार आहे. 

  या कार्यक्रमास  श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,पारायण प्रमुख दयानंद चौधरी,प्रसिद्ध व्यापारी वैजनाथअप्पा कोल्हे,कार्याध्यक्ष शाहूराव ढोबळे,रमेशअप्पा सपाटे,माजी नगरसेवक,सोमनाथ निलंगे वैजनाथ बागवाले,अनिल अष्टेकर,गिरीष बेंबळगे,सचिव संतोष पंचाक्षरी,नंदकुमार खानापुरे,अशोक नावंदे, सोमनाथ गोपनपाळे,सदानंद चौधरी, ओमप्रकाश बुरांडे,संजय खाकरे,वैजनाथ निलंगे,वैजनाथ शेटे,अॅड.गिरीष नरवणे, चंदूअप्पा हालगे,मकरंद नरवणे,सचिन काटकर, जगदीश मिटकर,रवी मिसाळ,अरविंद चौधरी, प्रा.अमर आलदे,कैलास रिकीबे,राजाभाऊ हलकंचे, रमेश चौधरी सर,उमाकांत काळे,गजानन हालगे,बाबासाहेब शिगे, रमेश काळे,प्रकाश खोत,संतोष चौधरी,चंद्रशेखर फुटके,वैजनाथ चौधरी, विश्वनाथअप्पा लव्हराळे,डॉ.योगीराज बर्दापुरे,संदीप तिळकरी सर,चंद्रकात अंदुरे,शिवशंकर नाईक,शिरीष सलगरे, अनिल चौधरी, नागेश अलबिदे,मन्मथ नरवणे, कपील चौधरी,शिवदीप चौंडे,संदीप चौधरी,मनोज बेंबळगे,संतोष जुजगर,अमोल घेवारे,रत्नेश बेलुरे,निरंजन गौरशेटे,अविनाश चौधरी, सतीश कापसे,नंदूअप्पा शेटे,अशोकअप्पा झाडे, जगदीश महागांवकर,आदेश हलकंचे,संजय कोरे व सर्व समाज समाजबांधवांचे योगदान आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?