श्री संत जगमित्रनागा मंदिरात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात
श्री संत जगमित्रनागा मंदिरात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात
परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)
येथील श्री संत जगमित्रनागा मंदिरात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली असून मंगळवार (ता.०५) ते शनिवार (ता.०९) पर्यंत संपन्न होणार आहे.
दैनंदिन धार्मिक कार्यक्रमामध्ये पहाटे काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,भावार्थ रामायण,शिवलिला अमृत ग्रंथ,प्रवचन,भजन, धुप आरती, संध्याकाळी हरिकिर्तन आदि कार्यक्रम संपन्न होणार आहेत. हरिकिर्तना मध्ये मंगळवारी अँड दत्तात्रय महाराज आंधळे यांचे किर्तन संपन्न झाले. तर वैजनाथ महाराज खतगावकर, पांडुरंग देशमुख,बाळू महाराज लटपटे, महाशिवरात्रीला कृष्णकुमार महाराज सताळकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत जगमित्रनागा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा