तिहेरी अपघातात अनेक जण जखमी 




धोंडराई.....


गेवराई -शेवगाव राज्य रस्त्यावरील धोंडराई कॅम्प येथे तिहेरी अपघात झाला आहे.आयशर टेम्पो, चारचाकी गाडी आणि बोलेरो पिक अप मध्ये हा अपघात झाला आहे.गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमापुर रोडवर मालवाहू आयशर टेम्पो चा स्टेरींग राॅड तुटल्याने समोरुन येणाऱ्या बोलेरो पिक‌‌‌अप व चारचाकी कारला धडक दिल्याने बोलेरो पिक‌‌‌अप पलटी झाला यामधील अंदाजे दहा ते बारा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांचा सामावेश आहे.जखमींना गेवराई व बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.गेवराई कडुन उमापुर कडे जाणाऱ्या मालवाहू आयशर टेम्पोची समोरुन येणाऱ्या चारचाकी कार व पिक अप ला जबर धडक बसली यामध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.जखमींना अपघातग्रस्त गाडीतुन बाहेर काढत त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी धोंडराई व धोंडराई कॅम्प परिसरातील विकास शिंदे, भागवत बरे,बालु साखरे,श्रिकांत गिते,अमोल गिते,अजय कदम,लल्लु जाधव,विलास शिंदे, यांच्या सह ग्रामस्थांनी मदत केली तर धोंडराई येथील सरपंच शितल साखरे ह्या देखील अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी आल्या होत्या.अपघात रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान घडला असल्याने उपजिल्हा रुग्णालयात एकच धांदल उडाली होती.अपघाताचा आवाज एवढा भिषण होता की संपूर्ण गाव जमा झाले होते सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही जखमींमधील सर्वजण वडगाव ढोक येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.


१०८ रुग्णवाहिकेची तत्पर सेवा


अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी १०८ या टोल फ्री क्रमांकावर दिल्यानंतर उमापुर १०८ रुग्णवाहिकेचे चालक विशालकुमार पाखरे,डॉ रमीज शेख,व गेवराई १०८ रुग्णवाहिकेचे चालक चंद्रकांत गजभार व डॉ एकनाथ पवार यांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी अपघात स्थळ गाठले व अपघातात जखमींना रुग्णालयात दाखल केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?