पोस्ट्स

MB NEWS-देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत आषाढी एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली 🕳️ *संत जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रृंगारपुजा

इमेज
  देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत आषाढी एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली 🕳️ *संत जगमित्रनागा मंदिर येथे मनमोहक श्रृंगारपुजा परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..          देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत आषाढी एकादशी पर्वकाळात भाविकांची श्रद्धा ओसंडली असल्याचे पहावयास मिळाले.त्याचप्रमाणे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात काही दिंड्याही वैद्यनाथ नगरीत दाखल झाल्या होत्या.         एकादशी म्हटलं की परळीचा मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून जातो. वैद्यनाथ मंदिर,संत जगमित्रनागा मंदिर आदींसह शहरातील मंदिरात दर्शनासाठी परळीत पंचक्रोशीतील हजारो भाविक येतात.पण सध्या या देउळबंद अवस्थेत मंदिरांची दारं बंद असल्याने भाविकांची श्रद्धा पायरीला दर्शन घेऊन वाहिली जात आहे.आज वैद्यनाथ मंदिर, संत जगमित्रनागा मंदिर, विठ्ठल मंदिर अंबेवेस, जाजुवाडी विठ्ठल मंदिर आदी परिसरात हे चित्र बघायला मिळाले. या देऊळ बंद ने अनेक समस्या उभ्या केल्यात देवस्थानावरील अवलंबून असलेली छोटी मोठी व्यवसाय करणारी शेकडो शेकडो लोकांची घरे आता अस्वस्थ आहेत.         कोरोनाकाळात बारा ज्योतिर्लि

MB NEWS-(video)आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांनी काढली वृक्षदिंडी

इमेज
  आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांनी काढली वृक्षदिंडी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील शास्त्रीनगर भागातील बालगोपाळांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या प्रादूभावामुळे मंदिर व पंढरपूर वारी बंद असल्याने मंगळवारी (ता.२०) वृक्षदिंडी काढत झाडे लावण्याचा संदेश दिला. तर वैद्यनाथ मंदिर बंद असल्याने भाविक भक्तांनी मंदिराच्या पायरीवर आपला माथा टेकून दर्शन घेतले.                      वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीला मोठे महत्त्व आहे. मात्र गेल्या वर्षापासून संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमावर प्रतिबंध घातले आहेत. तसेच राज्यात मंदिरेही बंद करण्यात आली असल्याने वारकरी संप्रदायामध्ये सरकार विरोधात नाराजीचा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शास्त्रीनगर भागातील बालगोपाळांनी पारंपरिक पद्धतीने दिंडी काढत, हातात वृक्ष घेऊन झाडे लावण्याच्या संदेश दिला. झाडे लावा नैसर्गिक आँक्सीजन मिळवा अशा घोषणा देत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. तसेच विठ्ठलाचा जयघोष बाळगोपाळांनी केला. या अनोख्या दिंडीचे गल्लोगल्लीत स्वागत करण्यात आले. या दिंडी मध्ये

MB NEWS-आरोग्य सेवासप्ताह: उद्या सर्वरोग निदान शिबीर व कोव्हिशिल्ड लसीकरण मोहीम

इमेज
आरोग्य सेवासप्ताह: उद्या सर्वरोग निदान शिबीर व कोव्हिशिल्ड लसीकरण मोहीम परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये आज दि.२१ रोजी सकाळी ९ वा.पासुन सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कोव्हिशिल्ड लसीची लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.          लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आज बुधवार दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ९ वा.पासुन सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य सेवासप्ताह च्या माध्यमातून कोव्हिशिल्ड लसीची लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांना या शिबिरात सहभागी व्हावे व लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकरी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहराध्यक्ष सय्यद सिराज, महिला आघाडीच्या अ

MB NEWS-आरोग्य सेवासप्ताह: सर्वरोग निदान शिबीरात 1200 नागरिकांची तपासणी ; सेवाधारी कोविड योद्धयांचा सन्मान

इमेज
 _उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त_ * आरोग्य सेवासप्ताह: सर्वरोग निदान शिबीरात 1200 नागरिकांची तपासणी ; सेवाधारी कोविड योद्धयांचा सन्मान * परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये आज दि.२० रोजी सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 1200 नागरिकांची तपासणी करून नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मोफत औषधी वाटपही करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध स्तरांवर कोविड प्रतिबंधक उपाययोजना काळात सेवा बजावणार्या सेवाधारी कोविड योद्धयांचा सन्मान करण्यात आला.          लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे आज मंगळवार दिनांक २० रोजी सर्वरोग निदान शिबीर झाले. ड्रगीस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे परळी अध्यक्ष सतीश जगताप यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. आनंद टिंब

MB NEWS- *किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी ; पंचेचाळीस हजार रुपये लंपास*

इमेज
 *किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी ; पंचेचाळीस हजार रुपये लंपास*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            परळी- गंगाखेड रस्त्यावर असलेल्या एका किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने शटर व कुलपे तोडून आत प्रवेश केला. दुकानातील काउंटर व गल्ल्याची नासधुस केली तसेच गल्ल्या मधील रोख पंचेचाळीस हजार रुपये लंपास केले. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे.            याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उड्डाण पुलालगत परळी- गंगाखेड रस्त्यावर फिर्यादी गजानन गंगाधर चिद्रवार यांचे किराणा मालाची सुपर शाॅपी आहे. दिनांक 18 रोजी सायंकाळी चार वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान चार कुलुप लावून बंद केले. दुकान बंद करत असताना गल्यात पंचेचाळीस हजार रुपये रोकड व उधारीच्या नावं असलेल्या चिठ्ठ्या ठेवलेल्या होत्या. दिनांक 19 रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी आपले दुकान उघडण्यास गेले असताना कुलूप तोडलेले आढळले. दुकानात गेले असताना गल्ल्यातील पंचेचाळीस हजाराची रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास आले. या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असून एक अनोळखी मुलगा दुकानात शिरल्याचे यामध्ये दिसून येत आहे. याप्रकरणी

MB NEWS- *दिवसभरात आत्तापर्यंत तीन वेळा ट्राफीकजाम !*

इमेज
 *दिवसभरात आत्तापर्यंत तीन वेळा ट्राफीक जाम !*   *परळीच्या उड्डाण पुलावर सततची वाहतुक कोंडी बनली ज्वलंत समस्या!*  परळी वैजनाथ :प्रतिनिधी....      शहराचा मध्यवर्ती दुवा असलेल्या डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. आज दिवसभरात आत्तापर्यंत तीन वेळा वाहतुकीचा खोळंबा झाला होता हे चित्र दिसुन आले. उड्डाणपुलावर सकाळी,  दुपारी, सायंकाळी  तब्बल एक ते दीड तास वाहतूक जागेवरच ठप्प झाली होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास फारच अडथळे निर्माण झाले आहेत.नागरीकांना काही वाटले नाही फक्त नेहमीप्रमाणे कुचंबणा सहन करावी लागली इतकेच.निमुटपणे वाहतूक कोंडी विरुद्ध नेहमीचा संघर्ष नागरिक करताना दिसले.               उड्डाणपूल, बसस्टँड रोडवर इटके कॉर्नर पर्यंत उड्डाणपूलावर ट्राफिक जाम झाली होती.या ट्राफिक जाममुळे  वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतूकदार चांगलेच खोळंबलेले होते. शहरातला उड्डाण पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने एखादे वाहन जरी बंद पडले तरी त्याचा वाहतुकीवर  परिणाम होतो हे नेहमी अनुभवाला येणारे चित्र असते. त्यातच उड

MB NEWS-*🚩🚩भक्तीमय पंढरपूर; भाविकांविना संतांचे पालखी सोहळे वाखरी पालखी तळावर विसावले*

इमेज
  *🚩🚩भक्तीमय पंढरपूर; भाविकांविना संतांचे पालखी सोहळे वाखरी पालखी तळावर विसावले* ------------------------------------------  पंढरपूर  - गरिबांचा देव म्हणून परिचित असलेल्या विठुरायाची आषाढी एकादशी उद्या मंगळवारी आहे. माञ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे याञा सोहळ्यावर निर्बंध आले आहेत. मोजकेच भाविक व प्रमुख दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास  भाविकांविना  संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सह रुक्मिणी माता, सोपान काका, एकनाथ महाराज, चांगावाटेशवर, संत मुक्तबाई आदी पाच पालख्या वाखरी पालखी तळावर विसावले आहे.  याञा सोहळ्यातील शेवटचा मुक्काम वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज या प्रमुख संतासह अन्य संताच्या पालख्यांचा असतो. यामुळे प्रत्येकवर्षी लाखो भाविकांची गर्दी या पालखी तळावर असते. माञ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी विसावली. पालखी तळावर पालख्या आल्यावर सर्व भाविकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.त्यानंतर भाविक हिरव्यागार तळावर विसावा घेत आहेत. त्यानंतर भोजन, भजन कीर्तनात भावीक तल्लीन होत आहेत. भ

MB NEWS-गोदाकाठच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

इमेज
  गोदाकाठच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार 🕳️ राजेश विटेकर यांचा पाठपुरावा मुंबई दि.१९(प्रतिनिधी)सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या सतरा किलोमीटर च्या रस्त्यासाठी विषेश बाब म्हणुन निधी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या . सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या सतरा किलोमीटर रस्त्याच्या प्रश्नावर नागरीकांनी सातत्याने आंदोलन चालवले होते. या आंदोलनाची विषेश दखल घेऊन मा.जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी या रस्त्याच्या निधी साठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले होते. नुकत्याच झालेल्या पावसामुळे गोदाकाठच्या रस्त्याचा प्रश्न  पुन्हा ऐरणीवर आला होता. याची माध्यमातून मोठी चर्चा झाल्यानंतर या प्रश्नांची गंभीर दखल शासन दरबारी घेण्यात आली .या साठी राजेश विटेकर यांनी अजित पवार यांची भेट घेऊन या रस्त्यासाठी विषेश बाब म्हणुन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली त्यावर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना या सतरा किलोमीटर च्या रस्त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गोदाकाठ

MB NEWS-रक्तदाना सारखे उपक्रम समाजासाठी उपयोगी - अजय मुंडे*

इमेज
  रक्तदाना सारखे उपक्रम समाजासाठी उपयोगी - अजय मुंडे परळी (प्रतिनिधी)उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार  तसेच सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त परळी येथे सुरू असलेल्या आरोग्य सेवा सप्ताहांतर्गत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व दैनिक लोकमत वृत्तसमूहाच्या संयुक्त विद्यमाने 'महारक्तदान शिबिर' आयोजित रक्तदान शिबिर नक्कीच समाजासाठी उपयोगी उपक्रम आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद गटनेते अजय भाऊ मुंडे यांनी उदघाटन प्रसंगी केले.  यावेळी  जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव सर, शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या  पौळ, संचालक कृ.उ.बाजार समिती सुरेभान नाना मुंडे, सरचिटणीस अनंत इंगळे, जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग विनोद जगतकर सर, रा.काँ.उपाध्यक्ष सुरेश टाक, आयुब पठाण, युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवक शहराध्यक्ष सय्यद सिराज, विजय भोयटे, शंकर अटेपवार ,अनिल अष्टेकर, गोपाळ आंधळे, अन्वर मिस्किन , शंकर कापसे,वैजनाथ बागवाले,जयराज देशमुख,अल्ताफ पठाण,रवी मुळे,बळीराम नागरगोजे, शरद कावरे,नाजेर हुशेन,माहेबूब कुरेशी, गफ्फार काकर, अमर रोडे, आदी उपस्थि

MB NEWS-पंढरपूर वारी : ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; याचिका फेटाळली

इमेज
  पंढरपूर वारी : ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालया कडून दिलासा; याचिका फेटाळली आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रासह विविध राज्यांतून पंढरपुरात दिंड्या दाखल होतात. दिंड्यांमधून लाखो वारकरी पायी वारी करतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली होती. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. सर्वांना वारीची परवानगी देण्याची मागणी याचिकेत करण्यात आलेली होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील करोना स्थितीत लक्षात घेऊन हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.

MB NEWS-पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन*

इमेज
 * पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन*     बीड,दि.19 (जि.मा.का.):- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 20 जुलै 2021 रोजी विविध विभागाच्या बैठकीचे आयोजन केले आहे.              मंगळवार दि. 20 जुलै 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता कोविड -19 व लसीकरणाबाबत आढावा. दुपारी 1.00 वाजता पीक विमा/पीक कर्ज वाटप/कृषी विभागाचा आढावा.दुपारी 2. ते 2.30 राखीव.दुपारी 2.30 वाजता महावितरण कामकाज आढावा. दुपारी 3.00 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बीड जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा आणि दुपारी 4. 00 वाजता पुरवठा विभागाचा आढावा.  ******

MB NEWS- *मोहा गावचे जलसंधारण बाबतीत काम देशपातळीवर दिशा देणारे : अनिकेत लोहिया*

इमेज
 *मोहा गावचे जलसंधारण बाबतीत काम देशपातळीवर दिशा देणारे : अनिकेत लोहिया* *परळी वै : दि 19 प्रतिनिधी.........मागील अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात असलेल्या दुष्काळावर काम करणाऱ्या मानवलोक आंबेजोगाई येथील संस्थेचे कार्यवाहक अनिकेत लोहिया यांनी मोहा गावात केलेल्या कार्याचे कौतुक करत मोहा गावात करण्यात आलेले जलसंधारणाच्या बाबतीतील काम देशपातळीवर दिशा देणारे कार्य असून *गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार* हा उपक्रम मोहा गावातूनच सुरुवात संस्थेने केलेली आहे.निस्वार्थ व नि:पक्षपातीपणे केलेल्या कार्याची दखल उशिरा का होईना घेतली जाती असे मत आंबेजोगाई येथील मानव लोकचे कार्यवाहक अनिकेत भैया लोया यांनी केले.महाराष्ट्र शासनाकडून नुकताच मानवलोक या संस्थेला कै. शँकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहाचे संस्थापक सदस्य कॉ.बापूसाहेब अण्णा देशमुख यांच्या 19 स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून ते उपस्थित होते. महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य कॉ.बापूसाहेब अण्णा देशमुख यांच्या 19व्या स्मृती दिनाचा कार्यक्रम तालुक्यातील महाराष्ट्र माध्

MB NEWS-*🔴 मुख्यमंत्री स्वत:च गाडी चालविणार; पंढरपुरात दुपारनंतर दाखल होणार*

इमेज
  *🔴 मुख्यमंत्री स्वत:च गाडी चालविणार; पंढरपुरात दुपारनंतर दाखल होणार* सोलापूर - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सपत्नीक मुंबईहून वाहनाने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. उद्या मंगळवारी आषाढी एकादशी असल्याने पंढरपुरातील मंदिरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी ते उपस्थित राहणार आहेत. कोरोनामुळे ते स्वत: गाडी चालवित पंढरपुरात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.  आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. . ८ ते ९ तास गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रात्री सात ते आठच्या सुमारास पंढरपुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडणार आहे.  *◼️कोरोनामुळे ड्रायव्हर विना प्रवास* राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगची सक्ती सुरू आहे. प्रवासातही ठराविक प्रवाशांच मूभा देण्यात आली आहे. कोरो

MB NEWS-प्रभाग क्रमांक १३ च्या जनसंपर्क कार्यालयाचे गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या हस्ते उद्घाटन*

इमेज
 * प्रभाग क्रमांक १३ च्या जनसंपर्क कार्यालयाचे गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या हस्ते उद्घाटन* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       प्रभागातील नागरिकांना आपल्या समस्या व प्रश्न सुलभरितीने मांडता याव्यात यासाठी अॅड.मनजीत सुगरे यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या हस्ते करण्यात आले.         सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभाग क्र13 मध्ये प्रभागातील नागरिकांसाठी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन न.प.गट नेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जेष्ठ नेते सुरेशअण्णा टाक,नाथ प्रतिष्ठाणचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, जेष्ठ नेते विजय भाऊ गंडले व सहकारी परिवार उपस्थित होते.        दरम्यान हे जनसंपर्क कार्यालय नागरीकांना सोयीचे होईल व जनसेवेसाठी या कार्यालयातुन जनतेचे प्रश्न सोडवले जातील.नागरी समस्या मांडण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरेल असे याप्रसंगी वाल्मिक अण्णा कराड यांनी सांगितले.कार्यक्रमास प्रभागातील नागरिक , कार्

MB NEWS-बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धर्मापुरीत ग्रामीण पोलीसांचे पथसंचलन*

इमेज
 * बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धर्मापुरीत ग्रामीण पोलीसांचे पथसंचलन* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध सण उत्सव या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन दक्ष होते व पथसंचलन करून नागरिकांना दक्षता घ्यावी याचे दिग्दर्शन करते.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धर्मापुरीत ग्रामीण पोलीसांचे पथसंचलन करण्यात आले.       पोलीस स्टेशन परळी ग्रामीण चे हद्दीतील मौजे धर्मापुरी येथेआज रोजी बकरी ईद चे अनुषंगाने 03 अधिकारी, 24 अमलदार व 04 होमगार्ड यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनचे रायफल, हेल्मेट, ढाल, गॅस  गण ,12 बोर रायफल ,पीटर मोबाईल, एस एम एल वाहन  सह गावातील मुख्य रस्त्याने मुस्लिम वसाहतीतून पथसंचलन करण्यात आले. यामध्ये प्र.पोलीस निरिक्षक मारोती मुंडे यांच्या सह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

MB NEWS- (Video) भेटीलागे जीवा लागलिसे आस......एसटी बसने निघाली माऊली विठुरायाच्या भेटीला !

इमेज
  भेटीलागे जीवा लागलिसे आस......एसटी बसने निघाली माऊली विठुरायाच्या भेटीला !  आळंदी.......    यंदाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने एसटी बसने निघाली माऊली विठुरायाच्या भेटीला  निघाली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गांधीवाडा येथून पंढरपूर कडे सकाळी रवाना झाला.मोजक्या वारकरी मंडळी सोबत हरिनामाच्या गजरात सजवलेल्या एसटी बसने माऊली निघाली आहे.ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मार्गावर दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी केली.

MB NEWS-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार्या महापूजेच्या वेळी केवळ 45 ते 50 जणच राहणार उपस्थित*

इमेज
 * 🚩🚩मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार्या महापूजेच्या वेळी केवळ 45 ते 50 जणच राहणार उपस्थित* ------------------------------------------  कोरोनाच्या संकटात सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसह येणार असून यावेळी केवळ 45 ते 50 व्हीआयपी व अधिकारी मंदिरात उपस्थित असणार असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. आषाढी एकादशीच्या पहाटे म्हणजे 20 जुलै रोजी पहाटे मुख्यमंत्री दोन वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. यावेळी विठ्ठल गाभारा आणि चौखांबीमध्ये केवळ मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय , मानाचा वारकरी आणि मंदिरातील पुजारी एवढेच उपस्थित असणार असून मागे सोळखांबी मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिलेले व्हीआयपी , अधिकारी आणि मंदिर समिती सदस्य उपस्थित असतील . महापूजेस मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची RTPCR तपासणी केलेली असून केवळ रिपोर्ट निगेटिव्ह आलाय त्यालाच उपस्थित राहता येणार आहे . 

MB NEWS-आरोग्य सेवासप्ताह: जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या नेत्रतपासणी शिबिराचा २००० रुग्णांनी घेतला लाभ* 🌑 *परळीचा ऋणानुबंध व वैद्यनाथाच्या भुमीत सेवा हे भाग्य - पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने*

इमेज
 * आरोग्य सेवासप्ताह: जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या नेत्रतपासणी शिबिराचा २००० रुग्णांनी घेतला लाभ* 🌑 *परळीचा ऋणानुबंध व वैद्यनाथाच्या भुमीत सेवा हे भाग्य - पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       परळी आणि मी हे नातं वेगळच आहे.एकतर वैद्यनाथाची ही पावन भुमी,त्यात सासुरवाडी आणि इथल्या लोकांचा जिव्हाळा हा ऋणानुबंध आहे. मुंडे परिवाराशी असलेले कौटुंबिक संबंध व या भागाप्रतीची आत्मियता यामुळे नेहमीच परळीत येतांना आत्मिक भाव मनात असतो. आरोग्य सेवासप्तायांचे उत्कृष्ट नियोजन व शिबिराची शिस्तबद्ध व्यवस्था असत्याचे सांगुन वैद्यनाथाच्या भुमीत सेवा हे भाग्य आहे असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.आरोग्य सेवासप्ताहातील नेत्रतपासणी शिबिराचा २००० रुग्णांनी  लाभ घेतला.       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये आज दि.१८

MB NEWS-रान डुकराची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

इमेज
  रान डुकराची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू परळी वैजनाथ त.१८ (प्रतिनिधी)....         तालुक्यातील मरळवाडी येथील शहरात रोज दूध विक्री करणाऱ्या एका दुधवाल्याला आपल्या मोटारसायकलवरून दुध विक्री करण्यासाठी जात असताना रान डुकराची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.           मरळवाडी येथील दुध विक्रेते दररोज शहरात दुध विक्री करतात. दुध विक्रेते काशीनाथ श्रीरंग आघाव (वय ४५) रविवारी (ता.१८) सकाळी परळीकडे दूध घेऊन जात असताना त्यांच्या गाडीसमोर मरळवाडी जवळ असलेल्या पिराजवळ अचानक रानडुक्कर आडवे आले. या रानडुक्करची मोटारसायकलला जोराची धडक बसल्याने काशीनाथ आघाव दुचाकीवरून खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्री आघाव यांचे शवविच्छेदन करण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांकडे देण्यात आले. मरळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

MB NEWS-*🚩 विठ्ठल मंदिरात फक्त ठाकरे फॅमिलीच; महापूजेला कोणालाही नाही प्रवेश*

इमेज
------------------------------------------  *🚩 विठ्ठल मंदिरात फक्त ठाकरे फॅमिलीच; महापूजेला कोणालाही नाही प्रवेश* ------------------------------------------  सोलापूर : पंढरपूर लाडक्या पांडुरंगाची आस लागलेल्या भाविकांना यंदाही आषाढी सोहळ्याला मुकावे लागणार आहे. प्रथेनुसार विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मंदिरात महापूजेच्या वेळी मंदिरात फक्त ठाकरे फॅमिलीच असतील. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशिवाय कोणाही राजकीय नेत्याला प्रवेश नसेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून शनिवारी मंदिर समितीचे अधिकारी, पदाधिकारी, सदस्य आणि कर्मचाऱ्यांची तुकाराम भवन येथे चाचणी करण्यात आली. हा अहवाल रविवारी प्राप्त होईल. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या सर्वांना मंदिरातील कार्यक्रमास प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाडी यांनी दिली. या महापूजेच्या निमित्ताने मंदिर समिती प्रशासनाची लगबग सुरू आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी, विठ्ठल सभामंडप, चौखांबी, सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, विठ्ठल व रुक्मिणी मातेच

MB NEWS-विविध मागण्या संदर्भात लाल बावटा चे तहसीलसमोर सोमवारी निदर्शने*

इमेज
 * विविध मागण्या संदर्भात लाल बावटा चे तहसीलसमोर सोमवारी निदर्शने* परळी वै : दि 17 प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लाल बावटा ) संघटनेच्यावतीने विविध मागण्या संदर्भात सोमवार दि 19 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. भूमिहीन शेतमजुरांना गेल्या कोविड १९ च्या  टाळेबंदी पासून अद्याप पर्यंत शेतमजुरांना रेशन मिळाले नाही.पेन्शन धारकांना जी पेन्शन मिळते त्यात त्यांचा उदरनिर्वाह होत नाही अनेकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही यात शासनाने अनेक जाचक अटी लावून सर्व गरिबांना शेतमजुरांना योजना मिळण्यापासून दूर ठेवण्याचे काम सरकारने व्यवस्थितपणे चालविले जात आहे .तेव्हा या विरुद्ध खालील मागण्यासाठी दि १९जुलै २०२१ रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. 1) विभक्त झालेल्या कुटुबांना तत्काळ रेशन वाटप करा. २) परळी तालुक्यातील प्रत्येक गावातील " ड " यादीमध्ये असलेल्या कुटुबांना तत्काळ घरकुल वाटप करा. ३) " ड " यादीमध्ये ज्या कुटुंबाचे नाव नाही त्या लोकांचा योग्य सर्वे करून त्यांचा घरकुला

MB NEWS-ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने कोव्हिड-योद्धा, गुणवंत कर्मचारी व लाभार्थी गौरव सोहळा*

इमेज
  *ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने कोव्हिड-योद्धा, गुणवंत कर्मचारी व लाभार्थी गौरव सोहळा* अंबाजोगाई (दि. 17) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा.ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई पंचायत समितीच्या वतीने कोव्हिड-योद्धा, गुणवंत कर्मचारी व विविध योजनेतील लाभार्थी यांचा गौरव सोहळा संपन्न झाला.  या कार्यक्रमास आ. संजयभाऊ दौंड जि.प. उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जि.प. गटनेते अजयजी मुंडे, गटविकास अधिकारी संदीप घोनसीकर, पं.स. सभापती अलिशान पटेल, मा.उपसभापती तानाजीभैय्या देशमुख, राष्ट्रवादी पक्षाचे ता.अध्यक्ष ताराचंद शिंदे, जि.प.सदस्य शंकरअन्ना उबाळे, जि.प. सदस्य बालासाहेब शेप, अंजलीताई पाटील आदि मान्यवर उपस्थित होतेया कार्यक्रमात दिव्यांग लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या उत्पन्नातील पाच टक्के राखीव निधीतून प्रत्येकी एकवीस हजार रुपये किमतीच्या आठ पिठाच्या गिरण्या देण्यात आल्या. पंचायत समिती अंतर्गत वैयक्तिक विहिरी मंजूर करण्यात आलेल्या 11 लाभार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात

MB NEWS-नांदेड विभागातून तीन डेमू लोकल धावणार ; 22 जुलै पासून परळी-अदिलाबाद पॅसेंजर होणार सुरू

इमेज
 * नांदेड विभागातून तीन डेमू लोकल धावणार ; 22 जुलै पासून परळी-अदिलाबाद पॅसेंजर होणार सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या रेल्वे सेवा आता हळुहळु सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून तीन डेमू लोकल धावणार आहेत. यामध्ये परळी मार्गावरील महत्त्वाची परळी-अदिलाबाद पॅसेंजर 22 जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे.             22 जुलै पासून गाडी क्र. 57554 अदिलाबाद- परळी डेमू लोकल अदिलाबाद येथून सकाळी 3.30 ला निघून अखेर परळी येथे दुपारी 12.40 ला पोहोचणार आहे. परतीत त्याचं दिवशी गाडी क्र. 57551परळी- अदिलाबाद डेमू लोकल परळी येथून दुपारी 3.45 वाजता निघून अखेर अदिलाबाद स्थानकावर रात्री 11.55 ला पोहोचणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या रेल्वे गाड्या मुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.परळी मार्गे धावणार्या अनेक गाड्या बंदच आहेत.मार्च २०२० पासून कोरोनामुळे बंद असलेल्या १२ पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. या रेल्वे सुर

MB NEWS-आरोग्य सेवासप्ताह: महिला व बालकांसाठीच्या आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ !* 🕳️ _आरोग्य सेवा हाच खरा धर्म -नगराध्यक्षा सौ.हालगे_ 🕳️ *आरोग्य सेवासप्ताह लोकोपयोगी- सभापती बालाजी मुंडे

इमेज
 * आरोग्य सेवासप्ताह: महिला व बालकांसाठीच्या आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ !* 🕳️ _आरोग्य सेवा हाच खरा धर्म -नगराध्यक्षा सौ.हालगे_ 🕳️ *आरोग्य सेवासप्ताह लोकोपयोगी- सभापती बालाजी मुंडे * परळी वैजनाथ, प्रतिनिधी....आरोग्य सेवा सप्ताहामध्ये आज दि.१७ रोजी महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.महिला व बालकांसाठीच्या आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लाभ झाला.शिबीरात मोठी गर्दी झाली होती. शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी आरोग्य सेवा हाच खरा धर्म असुन विविध आरोग्य सेवा गरजुंपर्यंत पोहचत आहेत ही मोठी उपलब्धी असल्याचे  नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे यांनी सांगितले.तर उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित आरोग्य सेवासप्ताह लोकोपयोगी असल्याचे पंचायत समिती सभापती बालाजी (पिंटु) मुंडे यांनी सांगितले.         राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालक

MB NEWS-मतदारसंघातील महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन यासाठी सदैव प्रयत्नशील - सौ. राजश्रीताई मुंडे बचत गटांमार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या 51 महिलांचा सौ. राजश्रीताईंच्या हस्ते गौरव संगम ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकासकामांचे सौ. राजश्रीताईंच्या हस्ते लोकार्पण

इमेज
  मतदारसंघातील महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन यासाठी सदैव प्रयत्नशील - सौ. राजश्रीताई मुंडे बचत गटांमार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या 51 महिलांचा सौ. राजश्रीताईंच्या हस्ते गौरव संगम ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विकासकामांचे सौ. राजश्रीताईंच्या हस्ते लोकार्पण परळी दि. (16) ---- : ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांना अधिकाधिक अर्थसहाय्य व उद्योगांना चालना देऊन परळी मतदारसंघातील महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी मी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील आहे. यासाठी महिलांना यासाठी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत आपण करणार असल्याचे सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.  परळी तालुक्यातील संगम येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या मार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या 51 महिलांचा सौ. राजश्रीताई मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संगम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या विविध विकासकामांसह येथील सभागृहाचे सौ. मुंडे ताईंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.    यावेळी बचत ग